Month: January 2026

इथेही मित्र बनले शत्रू

इथेही मित्र बनले शत्रू गेली अनेक वर्षे सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती प्रत्येक आघाडीवर एकत्र काम करायचे; परंतु गेल्या काही वर्षांमध्ये परिस्थिती बदलली आहे. त्यांच्यातील अविश्वासाची दरी इतकी रुंदावली,…

धनश्री, आचल, केतकीची फलंदाजीत चमक

महिला लीग क्रिकेट स्पर्धा धनश्री, आचल, केतकीची फलंदाजीत चमक मुंबई: दोन शतकी भागीदारींच्या जोरावर भारत क्रिकेट क्लबने ग्लोरियस क्रिकेट क्लबचा सात फलंदाज राखून पराभव करत मुंबई क्रिकेट संघटनेच्या महिला लीग क्रिकेट…

 मैदान गाजवलं! महाराष्ट्राचा झंझावात प्रतिस्पर्ध्यांची दाणादाण!

५८ वी वरिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा मैदान गाजवलं! महाराष्ट्राचा झंझावात प्रतिस्पर्ध्यांची दाणादाण! काझीपेठच्या रेल्वे ग्राउंडवर थरारक लढती; विजयी संघांची दिमाखात पुढील फेरीत झेप काझीपेठ (तेलंगणा):  येथील रेल्वे ग्राउंडवर सुरू…

 घुफ्रान – आकांक्षा विजयी                   

जॉली जिमखाना कॅरम स्पर्धा घुफ्रान – आकांक्षा विजयी विद्याविहार (पश्चिम) येथील घाटकोपर जॉली जिमखान्याच्या वतीने तसेच महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व मुंबई उपनगर जिल्हा कॅरम संघटनेच्या मान्यतेने ३ री घाटकोपर जॉली…

एमआयटी-एडीटी विद्यापीठात क्रिकेट सामन्यांची रोमांचक सुरुवात

लोगो विश्वनाथ स्पोर्ट्स मीट एमआयटी-एडीटी विद्यापीठात क्रिकेट सामन्यांची रोमांचक सुरुवात एमआयटी एसओसी, मॉडर्न लॉ कॉलेजची विजयी सलामी लोणी काळभोर : एमआयटी आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठ, विश्वराजबाग, पुणे यांच्या वतीने आयोजित आठव्या विश्वनाथ स्पोर्ट्स मीट…

बिनविरोध निवडीविरोधात आज हायकोर्टात सुनावणी

  मुंबई : बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेवकांच्या विरोधात मनसे नेते अविनाश जाधव यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर तातडीची सुनावणी बुधवारी होणार आहे. मुख्य न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर या याचिकेवर  सुनावणी होणार आहे.  या याचिकेच्या माध्यमातून जे नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत त्यांच्यावर स्थगिती देण्यात यावी आणि जोपर्यंत सुनावणी पूर्ण होत नाही तोपर्यंत स्थगिती कायम ठेवण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.  मुंबई उच्च न्यायालयाने मनसेचे म्हणणे मान्य केलं, तर सर्व बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेवकांच्या निवडीवर स्थगिती येऊ शकते. दरम्यान, मनसेकडून दुबार मतदारांची यादी फोटोसहीत तयार असल्याचे अविनाश जाधव यांनी सांगितले. त्यामुळे मतदानाला असे मतदार आल्यानंतर त्यांची मनसेकडून चांगल्या प्रकारे स्वागत केलं जाईल, असा इशारा देखील अविनाश जाधव यांनी दिला. निवडणुका बिनविरोध जिंकण्यात भाजपने आघाडी घेतली असून आतापर्यंत पक्षाचे ४४ उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. त्याखालोखाल शिंदेंच्या शिवसेनेने दुसरा क्रमांक मिळवला असून त्यांचे २२ नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत. कल्याण-डोंबिवली महापालिकेत भाजपचे सर्वाधिक १५ तर शिवसेनेचे ७ उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत. याशिवाय अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे २ उमेदवार, तर मालेगावमधून इस्लाम पार्टीचा १ आणि एका अपक्ष उमेदवाराचाही बिनविरोध विजय झाला आहे.

खिशात नाही आणा अन् मला बाजीराव म्हणा… मुख्यमंत्री फडणवीसांची उपमुख्यमंत्री अजित पवारांवर जहरी टिका

पुणे, प्रतिनिधी : महानगर पालिकेच्या निवडणूकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील शिवाजीनगर परिसरात महायुतीतील मित्रपक्ष असणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवारांव सडकून जहरी टिका केली.  खिशात नाही आणा अन् मला बाजीराव म्हणा… अशी अजित पवारांची अवस्था…

नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांचा अत्यावश्यक सेवासुविधांवर भर

नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांचा अत्यावश्यक सेवासुविधांवर भर मुकुंद रांजणे माथेरान :पर्यटक आणि नागरिकांना भेडसावत असणाऱ्या अडीअडचणी, समस्या त्याचबरोबर प्रलंबित प्रश्नांची उकल करण्यासाठी विद्यमान नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांनी अत्यावश्यक सेवासुविधांवर लक्ष केंद्रित केले असून गावातील विविध ठिकाणी जाऊन ज्या ठिकाणी शौचालयांची बिकट परिस्थिती निर्माण झाली आहेत त्याबाबत पाहणी करून ती अद्ययावत करण्याबाबत संबंधित अधिकारी वर्गाला सूचना केल्या आहेत. मुख्य पॉईंट असणाऱ्या एको पॉइंट वर पर्यटकांची मोठया प्रमाणावर गर्दी असते त्याठिकाणी वनखात्याच्या अंतर्गत शौचालय बांधण्यात आलेले आहेत परंतु त्या शौचालयांची अवस्था अत्यंत दयनीय झालेली आहे.त्यामुळे ती वापर करण्यास अयोग्य आहेत. याचा नाहक त्रास पर्यटकांना विशेष करुन महिला पर्यटकांना प्रकर्षाने जाणवत आहे. अन्य पर्यटनस्थळांच्या तुलनेत सुविधांचा अभाव याठिकाणी भासू नये यासाठी खुद्द नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांनी नगरपरिषदेच्या संबंधित अधिकारी, कर्मचारी वर्गासोबत प्रत्यक्ष जागेवर भेट देऊन संपूर्ण माहिती घेतली आहे.वनखात्याच्या संबंधित अधिकारी वर्गास सुध्दा त्यांच्या अखत्यारीत असलेल्या शौचालयांची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी असे सूचित केले आहे. प्रशासकीय राजवटीत अनेक महत्वपूर्ण कामे पूर्ण होऊ शकलेली नाहीत.त्यामुळे नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.कार्यक्षम नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांच्या माध्यमातून नागरिक आणि पर्यटकांना भेडसावत असणाऱ्या समस्या मार्गी लागतील असा नागरिकांनी विश्वास व्यक्त केला आहे. ———————————————- जनतेने आमच्यावर विश्वास ठेवून शिवसेना भाजप युतीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी केलेले आहे. प्रथम नागरिक या नात्याने आम्हाला समस्त नागरिकांची सेवा करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.आमच्या कार्यकाळात कोणत्याही प्रकारची महत्वपूर्ण कामे यामध्ये पर्यटक आणि नागरिकांना अभिप्रेत असणारी कामे,सेवासुविधा प्रलंबित न राहता ती युद्धपातळीवर पूर्ण करण्यासाठी आम्ही आमच्या सर्व सदस्यांसोबत प्रयत्नशील आहोत. चंद्रकांत चौधरी—नगराध्यक्ष माथेरान

नाशिक जिल्ह्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांपुढे संकट

नाशिक जिल्ह्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांपुढे संकट अजूनही अनेक विद्यार्थी ‘अपार आयडी’ च्या प्रतिक्षेत हरिभाऊ लाखे नाशिक : बारावी उत्तीर्ण झाल्यावर विद्यार्थी वेगवेगळ्या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतात. त्यातही सध्या व्यावसायिक अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा अधिक ओढा आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना सीईटी विभागामार्फत घेतली जाणारी परीक्षा देणे आवश्यक असते. परंतु, त्यासाठी विद्यार्थ्यांना ‘ऑटोमेटेड परमनंट अकॅडमिक अकाउंट रजिस्ट्रेशन’ (अपार) आयडी काढणे बंधनकारक आहे. परंतु, नाशिक जिल्ह्यात अजूनही मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांचे अपार आयडी तयार नसल्याने या विद्यार्थ्यांसमोर वेगळाच धोका निर्माण झाला आहे राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० अंतर्गत अपार आयडी ही संकल्पना पुढे आली आहे. अपार आयडी संकल्पनेनुसार विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाचा डिजिटल मागोवा घेण्यात येणार आहे. केंद्र सरकारने यासंदर्भात काही निर्देश दिले आहेत. त्यानुसार ३१ जानेवारी २०२६पर्यंत शाळांतील सर्व विद्यार्थ्यांचे अपार आयडी तयार करण्याची कार्यवाही पूर्ण करण्याचे आदेश महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषदेकडून देण्यात आले आहेत. राज्यात २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात एकूण २ कोटी १५ लाख ४५ हजार १९४ विद्यार्थी नोंदणीकृत आहेत. सीईटीसह कोणत्याही प्रवेशपूर्व परीक्षेचा अर्ज अपार आयडी असल्याशिवाय विद्यार्थ्यांना भरता येणार नाही. नाशिक प्रमाणेच मुंबई महानगर प्रदेश विभागातही मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी प्रक्रियेबाहेर राहिल्याने शिक्षण विभागाने शाळास्तरावर विशेष मोहिमा राबविण्याचे आदेश दिले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रत्येक विद्यार्थ्यांचा अपार आयडी आवश्यक झाला आहे. अपार आयडी प्रक्रियेत काही अडथळे निर्माण होत असल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे. आधार प्रमाणीकरण हा सर्वात मोठा अडथळा असल्याच्या तक्रारी शिक्षकांकडून करण्यात येत आहेत. राज्यभरात साडेपाच लाखापेक्षा अधिक अर्ज काही त्रुटींअभावी अपार अयाडीसाठी पात्र ठरलेले नाहीत. आधार पडताळणी न होणे, नाव आणि जन्मतारीख न जुळणे, पालकांची संमती न मिळणे, अशा काही प्रमुख कारणांचा त्यात समावेश असल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे. राज्यात पुढील महिन्यात म्हणजे फेब्रुवारीमध्ये बारावीची राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीने घेण्यात येणारी परीक्षा होणार आहे. त्यानंतर मार्च महिन्यापासून विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांना सुरुवात होईल. बारावीनंतर विद्यार्थ्यांकडून देण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमांसाठी अपार आयडी असणे बंधनकारक करण्यात आल्याने विद्यार्थ्यांवरील ताण वाढलेला आहे. नाशिक जिल्ह्यात अजूनही अपार आयडीविना बारावीचे आठ हजारपेक्षा अधिक विद्यार्थी बाकी आहेत. विद्यार्थ्यांना ज्या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घ्यावयाचा असेल, त्या अभ्यासक्रमासाठी असलेल्या प्रवेश परीक्षा अर्ज भरण्यापर्यंत अपार आयडी तयार न झाल्यास विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षेला मुकावे लागण्याची भीती आहे. मार्च ते मे या महिन्यांदरम्यान सीईटी परीक्षा होण्याची शक्यता आहे. या परीक्षेसाठी अपार आयडी असणे बंधनकारक करण्यात आले आहे. नाशिक जिल्ह्यातील बारावीच्या ८९.१६ टक्के विद्यार्थ्यांचे अपार आयडी तयार झाले आहेत. परंतु, अजूनही आठ हजारपेक्षा अधिक विद्यार्थ्यांचे अपार आयडी तयार होणे बाकी आहेत. अपार आयडी तयार करण्यासाठी ३१ जानेवारी ही मुदत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण परिषदेकडून देण्यात आली आहे. अपार आयडी तयार करण्याच्या कामात राज्यभरात होणाऱ्या महापालिका निवडणूक कामांचा अडथळा आल्याचा शिक्षकांचा दावा आहे.

 राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयात १६ जानेवारी रोजी ‘क्लिनिकल मीट’

मनोरुग्णता विषयक अपंगत्व प्रमाणपत्र प्रक्रियेवर राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयात १६ जानेवारी रोजी ‘क्लिनिकल मीट’ ठाणे  : मनोरुग्णता क्षेत्रात अपंगत्व प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया अधिक शास्त्रीय, व्यावहारिक आणि कायदेशीरदृष्ट्या सक्षम व्हावी, या उद्देशाने राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, कळवा यांच्या वतीने बॉम्बे सायकियाट्रिक सोसायटीच्या सहकार्याने विशेष क्लिनिकल मीटचे आयोजन करण्यात आले आहे. “मनोरुग्णतेतील अपंगत्व प्रमाणपत्र प्रक्रिया (Disability Certification in Psychiatry)” या विषयावर आधारित ही शैक्षणिक कार्यशाळा शुक्रवार, दिनांक १६ जानेवारी २०२६ रोजी दुपारी २.०० वाजता, राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या दुसऱ्या मजल्यावरील मेडिसिन लेक्चर हॉल येथे आयोजित करण्यात आली आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. स्वप्नाली सौरभ कदम, तसेच बॉम्बे सायकियाट्रिक सोसायटीच्या अध्यक्ष व भाभा अणुसंशोधन केंद्राच्या मनोरुग्णता विभागाच्या प्रमुख डॉ. शोभा नायर असणार आहेत. कार्यक्रमाचे उद्घाटन दुपारी २.०० वाजता होणार असून त्यानंतर शैक्षणिक सत्रांना सुरुवात हाेणार आहे. उद्घाटनानंतर  डॉ. अमेय पुसाळकर “अपंगत्व – ओळख व कायदेशीर चौकट” या विषयावर मार्गदर्शन करणार असून, मनोरुग्णतेतील अपंगत्वाची संकल्पना व विद्यमान कायदे व नियमावली यांची माहिती दिली जाणार आहे. या सत्राचे अध्यक्षपद डॉ. स्वप्नाली कदम व डॉ. शोभा नायर भूषवणार आहेत. तद्नंतर डॉ. आश्लेषा ढोले  यांचे “मानसिक आजारांचे मूल्यमापन व प्रमाणपत्र प्रक्रिया” या विषयावर व्याख्यान होणार असून, प्रमाणित मोजमाप पद्धती, दस्तऐवजीकरण व प्रक्रिया यांवर भर दिला जाणार आहे. तसेच डॉ. शीतल मेश्राम “न्यूरोडेव्हलपमेंटल डिसऑर्डर्ससाठी मूल्यमापन साधने” या विषयावर सादरीकरण करणार आहेत. तसेच यावेळी “अपंगत्व प्रमाणपत्र प्रक्रियेत येणाऱ्या दैनंदिन अडचणी” या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे.