डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त
उल्हासनगर: उल्हासनगरातील कॅम्प नंबर -४ परिसरातील सुभाष टेकडी येथे भारतीय संविधानाचे जनक, विश्वरत्न ,महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त हंसराज जामणीक व सुरेश तायडे यांच्या वतीने भीम अनुयायी यांना मोफत पाणीपुरी वाटप ठेवण्यात आले होते.
उल्हासनगरातील कॅम्प नंबर -४ परिसरातील सुभाष टेकडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात या ठिकाणी मोफत पाणीपुरी वाटप हा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील हंसराज जामणी व सुरेश तायडे या दोघांनी मिळून जयंतीनिमित्त सुमारे ५००० पाणीपुरी भीम अनुयायी यांना वाटप केली. पाणीपुरी खाण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. सुरेश तायडे यांची सुभाष टेकडीत पाणीपुरीची गाडी आहे. त्या ठिकाणी ते गेले अनेक वर्षापासून पाणीपुरीचा व्यवसाय करीत असतात. पण दरवर्षी जयंती निमित्त मात्र भीम अनुयायींसाठी ते मोफत पाणीपुरीचा कार्यक्रम ठेवत असतात. यावेळी ठेवण्यात आलेल्या कार्यक्रमाला उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला.
००००००००
