
नवी मुंबई : स्पोर्ट्स असोसिएशन, वाशी येथे सुरु असलेल्या ६० व्या वरिष्ठ राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत पुण्याच्या संघाने ठाण्याच्या संघाचा २-१ असा पराभव करून या गटाचे विजेतेपद पटकावले. पुण्याच्या अनिल मुंढे व रहीम खान जोडीने ठाण्याच्या पंकज पवार व समीर अंसारीला २५-१३, १६-१३ असे सरळ दोन सेटमध्ये हरवून आपल्या संघाला चांगली सुरुवात करून दिली होती. परंतु ठाण्याच्या झैद अहमद फारुकीने पुण्याच्या अभिजित त्रिपनकरवर पहिला सेट ९-२५ असा गमावूनही पुढील दोन सेट २५-१२, २३-१० असे जिंकून सामन्यात बरोबरी केली व सामना सामना १-१- असा झाला. मात्र माजी विश्व् विजेत्या पुण्याच्या योगेश परदेशीने आपल्या अनुभवाच्या जोरावर नवोदित कुणाल राऊतला तीन सेटनंतर ८-२५, २५-८ व २५-१२ असे चीत करून आपल्या संघाला विजय मिळवून दिला. या गटातील तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत रत्नागिरीने बाजी मारली. रत्नागिरीने मुंबई संघाला २-१ असे हरवून तिसरा क्रमांक प्राप्त केला. मुंबईच्या प्रशांत मोरेने एकमेव विजय नोंदवताना रत्नागिरीच्या अभिषेक चव्हाणला २३-८, १५-१५ असे हरवले. मात्र रत्नागिरीच्या अनुभवी रियाझ अकबर अलीने मुंबईच्या विकास धारियाला ११-२४, २०-११ व २५-७ असे हरवले. तर रत्नागिरीच्या राहुल भस्मे व योगेश कोंडविलकर जोडीने मुंबईच्या गिरीश तांबे व निलांश चिपळूणकर जोडीवर ०-१८, २४-२३ व १९-५ अशी मात केली.
पुरुष एकेरी तिसऱ्या फेरीचे निकाल पुढील प्रमाणे
सलमान खान ( मुंबई ) वि वि इम्तियाझ हुन्नरे ( पुणे ) २४-९, २५-७
चांद युसूफ शेख ( पुणे ) वि वि प्रवीण माढवी ( पुणे ) २५-२, २५-०
भरत कोळी ( मुंबई ) वि वि स्वप्नीलराजे शिंदे ( रत्नागिरी ० २५-०, २५-१०
महम्मद घुफ्रान ( मुंबई ) वि वि राहुल कुटे ( मुंबई उपनगर ) २५-११, २५-०
वयस्कर एकेरी ५ व्या फेरीचे निकाल पुढील प्रमाणे
मिलिंद वाडकर ( मुंबई उपनगर ) वि वि बाळकृष्ण लोकरे ( पुणे ) १८-२, २४-१०
फय्याझ शेख ( पुणे ) वि वि सुधाकर शिर्के ( मुंबई ० २३-१०, २५-१
नूर महम्मद शेख ( मुंबई ) वि वि पवन मेस्त्री ( मुंबई ) २३-१३, २२-२
गिरीधर भोज ( मुंबई उपनगर ) वि वि अनिल बोढारे ( पालघर ) १-२५, २५-१३, २५-०
संजय थिटे ( पुणे ) वि वि राजकुमार ठाकूर ( पुणे ) २५-५, ०-२५, २५-७
शब्बीर खान ( मुंबई उपनगर ) वि वि अशोक गायकवाड ( ठाणे ) १३-२५, २५-७, २५-०
सत्यनारायण दोंतुल्ला ( मुंबई ) वि वि महम्मद जावेद खान ( ठाणे ) २५-९, १२-२५, २४-१०
०००००००
