टॅप-टू-पे दरम्यान उजळणाऱ्या LED तंत्रज्ञानासह आधुनिक पेमेंट अनुभव; स्मार्ट रिवॉर्ड्स वर भर

मुंबई, १५ एप्रिल २०२६ :
भारताची आघाडीची क्रेडिट मॅनेजमेंट प्लॅटफॉर्म चेकु ने एयू स्मॉल फाईनान्स बँक यांच्या भागीदारीत देशातील पहिले को-ब्रँडेड LED क्रेडिट कार्ड ‘चेकु एयू क्रेडिट कार्ड लॉन्च केले आहे. या अभिनव कार्डद्वारे पेमेंट अनुभव अधिक सुलभ, आकर्षक आणि तांत्रिकदृष्ट्या प्रगत करण्याचा उद्देश आहे.
हे कार्ड टॅप-टू-पे व्यवहाराच्या वेळी इन-बिल्ट LED लाईटमुळे उजळते, ज्यामुळे व्यवहार यशस्वी झाल्याची त्वरित दृश्य पुष्टी मिळते. विशेष म्हणजे ही LED लाईट POS टर्मिनलमधील NFC फील्डमधूनच ऊर्जा घेते, त्यामुळे वेगळ्या बॅटरीची गरज भासत नाही.
नव्या युगातील डिजिटल ग्राहकांना लक्षात घेऊन डिझाइन केलेल्या या कार्डमध्ये सुलभ ऑनबोर्डिंग, सहज पेमेंट अनुभव आणि एकसंध रिवॉर्ड्स इकोसिस्टम देण्यात आली आहे.
१५ दशलक्षांहून अधिक क्रेडिट कार्ड्स आणि ४ दशलक्ष वापरकर्त्यांच्या अभ्यासावर आधारित या कार्डमुळे सध्याच्या क्रेडिट प्रणालीतील त्रुटी—जसे विखुरलेले रिवॉर्ड्स, गुंतागुंतीची रिडेंप्शन प्रक्रिया—यावर उपाय शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
आदित्य सोनी, संस्थापक व सीईओ, चेकु म्हणाले, “क्रेडिट कार्डसारख्या दैनंदिन वापराच्या उत्पादनात फारसा बदल झालेला नाही. आम्ही वापरकर्त्यांच्या गरजा समजून घेत हा अनुभव अधिक सोपा आणि दृश्यात्मक करण्याचा प्रयत्न केला आहे. LED हा छोटा बदल असला तरी तो पेमेंट अनुभव अधिक स्पष्ट करतो.”
तसेच संजय अग्रवाल, संस्थापक, एमडी आणि सीईओ, एयू स्मॉल फाईनान्स बँक यांनी सांगितले की, “चेकु सोबतची भागीदारी ही ग्राहक-केंद्रित बँकिंगला नवा आयाम देणारी आहे. या LED क्रेडिट कार्डद्वारे आम्ही नावीन्यपूर्ण, स्मार्ट आणि आधुनिक वित्तीय सेवा देण्याचा प्रयत्न करत आहोत.”
या लॉन्चद्वारे चेकु ने केवळ बिल पेमेंट प्लॅटफॉर्मच्या चौकटीतून बाहेर पडत क्रेडिट कार्ड इश्यूअन्स आणि रिवॉर्ड्स-आधारित कॉमर्स क्षेत्रातही पाऊल टाकले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *