काँग्रेस नगरसेवक, गटनेते अश्रफ आजमी यांची मागणी

केतन खेडेकर
मुंबई : महापालिकेच्या अर्थसंकल्पीय अंदाज- ‘अ’ आणि ‘ब’ २०२६-२७ हयांस स्थायी समितीने मंजुरी दिलेली आहे. सदर अर्थसंकल्पात इतर पक्षांच्या आणि भाजपच्या नगरसेवकांना जास्त निधी देण्यात आला आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षांच्या नगरसेवकांना फक्त २५ लाख निधी दिला असून  इतर पक्षांचे नगरसेवकांना २ कोटी पेक्षा जास्त आणि इतर पक्षाच्या गटनेत्यांना २० ते ३० कोटीची निधी देण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नगरसेवकांमध्ये भेदभाव केला गेला आहे.
त्यामुळे नगरसेवकांना आपल्या प्रभागामध्ये नागरिकांकरिता सार्वजनिक कामे आणि प्रभागाचा करणे शक्य होणार नाहीत.  भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस पक्षांच्या नगरसेवकांना सदर निधी अत्यंत अपुरा आणि प्रभागच्या नागरिकांवर अन्याय करणारा आहे. त्यामुळे या कृत्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. तरी काँग्रेसच्या सर्व नगरसेवकांना कोणताही भेदभाव न  करता सदर निधी वाढवून देण्यात यावा. अशी मागणी काँग्रेसचे गटनेते अशरफ आजमी यांनी महापौरांना पत्र देऊन केली.
0000000000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *