कल्याण: के. व्ही. पेंढरकर महाविद्यालयाच्या प्राणिशास्त्र विभागातील पीएचडी विद्यार्थी अनिकेत मराठे यांच्या संशोधनाअंतर्गत गोगलगायींच्या प्रजातींचे सहज आकलन व्हावे ह्या उद्देशाने एक उपकरण विकसित केले आहे. ह्या उपकरणासाठी त्यांना राष्ट्रीय पेटंट प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आहे. अनिकेत मराठे हे शांतारामभाऊ घोलप कला, विज्ञान आणि गोटीरामभाऊ पवार वाणिज्य महाविद्यालय, शिवळे येथे प्राणिशास्त्र विभागात सहा. प्राध्यापक असून पेंढरकर महाविद्यालयातील डॉ. शरद महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पी.एच.डी करीत आहेत. कॅ.डॉ. वर्षा नरवडे आणि अर्जुन शाहू यांचेदेखील पेटंट यशस्वीपणे नोंद होण्यासाठी सहकार्य लाभले आहे.

डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षल लवंगारे ह्यांनी डॉ.  महाजन व त्यांच्या सहकाऱ्यांचा सत्कार केला. विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी अधिकाधिक संशोधनाभिमुख व्हावे ह्यासाठी प्रयत्न करावा असे आवाहन संस्थेच्या वतीने करून संस्थादेखील सर्वतोपरी मदत करेल असेही त्यांनी सांगितले.  याप्रसंगी डहाणूकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विनय भोळे हे देखील उपस्थित होते.

0000000000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *