Month: June 2026

 शिष्यवृत्ती व आर्थिक घोटाळ्यांप्रकरणी ‘झुरळ फेको’ आंदोलन करण्याचा इशारा

सेव्ह एज्युकेशन सोसायटीचे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकाऱ्यांना पत्र कल्याण : डोंबिवली येथील के. व्ही. पेंढारकर महाविद्यालयातील शिष्यवृती व आर्थिक घोटाळ्यांप्रकरणी माहिती दडपणे, चौकशी टाळणे, तक्रारदारावर पुरावे सादर करण्याचा दबाव आणणे याबाबत निषेध व्यक्त करण्यासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालया समोर झुरळ फेको आंदोलन करण्याचा इशारा सेव्ह एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष रोहिदास सुरवसे यांनी प्रकल्प अधिकाऱ्यांना पत्राद्वारे दिला आहे. प्रकल्प विकास अधिकाऱ्यांनी सुरवसे यांच्याकडून कथित शिष्यवृती घोटाळ्याबाबत पुरावे व विद्यार्थ्यांची यादी सादर करण्यास सांगितले आहे. हि बाब अत्यंत गंभीर, कायदेशीरदृष्ट्या चुकीची व प्रशासनिक जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न दर्शविणारी आहे. सुरवसे यांनी वेळोवेळी के. व्ही. पेंढारकर महाविद्यालय, डॉबिवली येथील आदिवासी वि‌द्यार्थ्यांच्या शिष्यवृती, आर्थिक अनियमितता, निधी अपहार, वि‌द्याथ्यांच्या हक्कांचे उल्लंघन तसेच विविध प्रशासकीय गैरप्रकारांबाबत शासनाकडे तक्रारी दाखल केलेल्या आहेत. तसेच माहितीचा अधिकार अधिनियम, 2005 अंतर्गत अनेक आरटीआय अर्ज करुन संबंधित माहिती मागविण्यात आलेली आहे. मात्र आजपर्यंत संबंधित विभाग व महावि‌द्यालयाकडून कोणतीही संपूर्ण, सत्य व कायदेशीर माहिती उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. विशेष बाब म्हणजे, सेव एज्युकेशन सोसायटी व सेव पेंडरकर कॉलेज संदर्भातील विविध आर्थिक अनियमितता, गैरव्यवहार, प्रशासकीय गाँधळ व गंभीर घोटाळ्यांबाबत गेल्या दीड वर्षांपासून शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आलेला आहे. या तक्रारींची गंभीरता लक्षात घेऊन शासनाने स्वतः के. व्ही. पेंडरकर महाविद्यालयावर प्रशासकाची नियुक्ती केलेली आहे. शासनाने काढलेल्या प्रशासक नियुक्ती आदेशामध्ये देखील संस्थेमध्ये गंभीर अनियमितता व प्रशासकीय बिघाड असल्याचे स्पष्टपणे नमूद करण्यात आलेले आहे. अशा परिस्थितीत देखील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या वतीने प्रत्यक्ष चौकशी करण्याऐवजी तक्रारदारालाच “तुम्ही पुरावे द्या, मग आम्ही कारवाई करू” असे सांगितले जात आहे, ही बाब अत्यंत धक्कादायक, निषेधार्ह व संशय निर्माण करणारी आहे. माहिती अधिकार अंतर्गत माहिती न देणे आणि त्यानंतर तक्रारदाराकडूनच पुरावे मागणे हे वस्तुतः माहिती दडपण्याचा व चौकशी टाळण्याचा प्रयत्न असल्याचा गंभीर संशय निर्माण करणारे आहे. त्यामुळे तक्रारदाराकडून अशक्य स्वरूपाचे पुरावे मागण्याऐवजी संबंधित सर्व अभिलेख स्वतः ताब्यात घेऊन निष्पक्ष चौकशी करण्यात यावी. सन २०१० पासून आजपर्यंतच्या सर्व शिष्यवृत्ती निधीचे विशेष लेखापरीक्षण करण्यात यावे. उपयोगिता प्रमाणपत्रांची सत्यता तपासणी करण्यात यावी, व मंजूर व वितरित शिष्यवृत्तीची तुलना रिपोर्ट द्यावा.  माहिती दडपणाऱ्या संबंधित अधिकारी, कर्मचारी व संस्थांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. आदिवासी वि‌द्यार्थ्यांच्या शैक्षणिक व आर्थिक हक्कांशी संबंधित या गंभीर प्रकरणाची स्वतंत्र उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, व माहिती अधिकार अंतर्गत मागविलेली सर्व माहिती तात्काळ उपलब्ध करून देण्याची मागणी सेव्ह एज्युकेशन सोसायटीच्या वतीने करण्यात आली आहे. या गंभीर प्रकरणात निष्पक्ष व प्रभावी कारवाई न झाल्यास दिनांक २० जून  रोजी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, शहापूर येथील प्रकल्प अधिकारी यांच्या दालनासमोर समोर झुरळ फेको आंदोलन करण्याच्या इशारा रोहिदास सुरवसे यांनी दिला आहे. 00000000000 त होते. 000000000

दिवा शहरातील नालेसफाई कामांबाबत मनसेची तीव्र नाराजी

दिवा, दि. 3 जून (आरती परब) : महाराष्ट्र नवनिर्माण सेना दिवा शहराचे शहराध्यक्ष तुषार पाटील यांनी दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त यांना निवेदन देऊन दिवा शहरात सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामांबाबत…

भगवान बुद्ध भारत-म्यानमार संबंधांचा अध्यात्मिक दुवा

 – राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचे प्रतिपादन अशोक गायकवाड मुंबई : ‘भारत आणि म्यानमार या दोन्ही देशांमध्ये ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि आर्थिक संबंधांचे दृढ बंध असून या संबंधांना अधिक बळकटी देण्यासाठी आपण भारत…

मान्सूनपूर्व नालेसफाईची ९० टक्के कामे पूर्ण; उर्वरित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश

नालेसफाईनंतरचा गाळ व कचरा तात्काळ हटविण्याबाबत आयुक्तांची सूचना मिरा-भाईंदर : आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मिरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील नालेसफाईची कामे नियोजनबद्ध, गुणवत्तापूर्ण आणि निर्धारित मुदतीत पूर्ण करण्यासाठी प्रशासनाकडून विशेष प्रयत्न सुरू आहेत. या…

कल्याण-मुरबाड महामार्गावरील भीषण अपघातात

दोन तरुणांचा मृत्यू कल्याण : टिटवाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कल्याण-मुरबाड महामार्गावर वरप येथे मंगळवारी पहाटे झालेल्या भीषण अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. अपघातानंतर टिटवाळा पोलिसांनी कंटेनर चालकाला ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे. टिटवाळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकेश ढगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी पहाटे सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास एक कंटेनर मुरबाडच्या दिशेने जात होता. त्याचवेळी त्याच्या पाठीमागून येणारी बर्कमन गाडी कंटेनरच्या मागील भागावर जोरात आदळली. धडक इतकी भीषण होती की गाडीतील तीनपैकी दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. मृतांची ओळख पवन गुप्ता (वय २८, रा. चोप्रा कोर्ट, उल्हासनगर) आणि राजू गुप्ता (वय २२, रा. वरप) अशी झाली आहे. अपघातात जखमी झालेल्या तिसऱ्या व्यक्तीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच टिटवाळा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि मदतकार्य सुरू केले. अपघातग्रस्त वाहन बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. तसेच कंटेनर आणि त्याच्या चालकाला ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकेश ढगे म्हणाले, “वरप परिसरात पहाटे झालेल्या या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे. कंटेनर चालकाला ताब्यात घेण्यात आले असून अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे. पुढील कायदेशीर कार्यवाही करण्यात येत आहे.”

लाडकी बहीण योजनेत ८० लाख महिलांना अपात्र ठरवणे म्हणजे विश्वासघात : वर्षा गायकवाड

निवडणुकी वेळी निकष आठवले नाहीत का?; महायुती सरकारवर काँग्रेसचा हल्लाबोल मुंबई : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत सुमारे ८० लाख महिलांना अपात्र ठरवण्याचा निर्णय हा राज्यातील महिलांच्या विश्वासाचा घात असल्याची टीका मुंबई…

सिंहस्थात धावणार साडेचार हजार बसेस

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळा २०२७ दरम्यान नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे येणाऱ्या कोट्यवधी भाविकांचा प्रवास सुरक्षित, नियोजनबद्ध आणि सुलभ व्हावा, यासाठी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या माध्यमातून व्यापक…

ठाण्याच्या सी. डी. देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्याची सीबीएसई अध्यक्षपदी नियुक्ती

ठाणे : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) अध्यक्षपदी 2001 बॅचचे वरिष्ठ आयएएस अधिकारी प्रशांत सीताराम लोखंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे प्रशांत लोखंडे हे ठाणे महानगरपालिकेच्या कै. सी.…

वाशी व तुर्भे भागात महापौर व उपमहापौर यांच्या उपस्थितीत विशेष जल तपासणी मोहीम

अशोक गायकवाड नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या मोरबे धरणाची पाणी पातळी आज ७१.५. मीटर इतकी असून १५.७४ टक्के जलसाठा वापरण्यायोग्य आहे. हा जलसाठा जुलै अखेरपर्यंत पुरवठा करता येईल इतका आहे. मात्र आसपासच्या शहरांमधील पाणी टंचाईची भीषण परि‍स्थिती लक्षात घेता तसेच हवामान खात्याच्या अंदाजानुसार यावेळी पावसाचे प्रमाण कमी आहे हे लक्षात घेता नवी मुंबईकरांनी पाण्याचा अत्यंत काळजीपूर्वक वापर करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त करीत नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील यांनी आपल्याकडून पाण्याचा कोणत्याही प्रकारे अपव्यय होणार नाही याची प्रत्येक नवी मुंबईकर नागरिकाने काळजी घ्यावी असे आवाहन केले. दोन दिवसाच्या शटडाऊनमध्ये जलवाहिन्या कोरड्या झाल्याने त्यांच्या आतील भागात खाली बसलेला बारीक गाळ पाणीपुरवठा पूर्ववत सुरु झाल्यानंतर जलकुंभापर्यंत आला व गढुळ पाण्याच्या तक्रारी प्राप्त होऊ लागल्या. या अनुषंगाने महानगरपालिका पाणी पुरवठा विभागामार्फत शहराच्या विविध भागामध्ये मोठया प्रमाणात जलतपासणी मोहीम हाती घेण्यात आली. त्याचप्रमाणे महापौर, उपमहापौर यांचे समवेत नगरसेवकांनीही विविध विभागांमध्ये जाऊन जलतपासणी चाचणीची पाहणी करण्यास सुरुवात केली. या पाहणीमध्ये आंतरराष्ट्रीय आयएसआय मानकानुसार पाणी नमुन्यातील पीएच, टिडीएस, टर्बिडिटी व क्लोरिनचे प्रमाण तपासण्यात आले. या ठिकठिकाणच्या तपासणीमध्ये पाणी पिण्यायोग्य असल्याचे आढळून आले. तरीही नागरिकांना आपल्या घरातील पाणी दूषित असल्याची शंका असल्यास तक्रार करण्यासाठी १८००२२२३०९ हा टोल फ्री विनामूल्य क्रमांक जाहीर करण्यात आला. आता तक्रारींचे प्रमाण अत्यंत कमी झाले असून पाणी पूर्वीसारखे स्वच्छ मिळू लागले आहे. तरीही काही ठिकाणी जलवाहिन्यांमध्ये लिकेजेस असल्याने नळाव्दारे मिळणारे पाणी गढूळ असल्यास लिकेजेस शोधून ते त्वरीत दुरुस्त करुन घेण्याचे निर्देश महापौर सुजाता पाटील यांनी आजच्या तुर्भे, वाशी भागातील पाणी नमुने तपासणी विशेष मोहिमेच्या पाहणी प्रसंगी दिले. यावेळी उपमहापौर दशरथ भगत, क प्रभाग समिती अध्यक्ष प्रकाश मोरे व ड प्रभाग समिती अध्यक्ष शैला पाटील, नगरसेवक शशिकांत राऊत, दयावती शेवाळे, शशिकला पाटील, अंजली वाळुंज, सुनिल कुरकुटे, शशिकला औटी, शिल्पा ठाकूर, प्रिती भगत तसेच अतिरिक्त शहर अभियंता अरविंद शिंदे, कार्यकारी अभियंता शंकर जाधव व संतोष उनवणे व इतर अधिकारी उपस्थित होते. यावेळी महापौर महोदयांनी तुर्भे से. येथील मलप्रक्रिया केंद्र व टर्शिअरी ट्रिटमेंट प्लान्टचीही पाहणी केली. याप्रसंगी विशेषत्वाने गावठाण भागातील जलवाहिन्या जुन्या झाल्या असल्याने त्यामध्ये मोठया प्रमाणात लिकेजेस असल्याचे सांगत नगरसेवकांनी त्या वाहिन्या बदलण्याची गरज असल्याचे सांगितले. काही नागरिकांनी महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेली १०% पाणी कपात ही सध्या सगळीकडे जाणवत असलेली पाण्याची कमतरता लक्षात घेता २० % पर्यंत करावी अशी सूचना केली. त्याचप्रमाणे काही नागरिकांकडून अशा पाणी टंचाईच्या काळातही नवी मुंबईत मुबलक पाणी मिळत असल्याने गाडया धुण्यासाठी पाईप लावून पाण्याचा अनाठायी वापर करत असल्याचे निदर्शनास येत असल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी अशीही मागणी याप्रसंगी उपस्थित नागरिकांकडून करण्यात आली. यावेळी मोठया कालावधीसाठी शटडाऊन घेण्यात आल्याने पाणी गढूळ असण्याच्या तक्रारी अधिक प्रमाणात आल्या. आता पाण्याची स्थिती जवळजवळ पूर्ववत झाल्याचे आढळून येत असून महानगरपालिकेमार्फत पाण्याच्या चाचण्या सुरुच ठेवल्या जाणार आहेत. 00000000000

स्वतःसाठी एक तरी झाड लावा – उद्धव बाबर

मुंबई / रमेश औताडे जगापुढे आज उभा ठाकलेला सर्वात भीषण आणि गहन प्रश्न म्हणजे वाढते जागतिक तापमान होय. औद्योगिकीकरण, बेसुमार वृक्षतोड, वाढते प्रदूषण, जलस्रोतांचा ऱ्हास आणि नैसर्गिक संसाधनांचा होत असलेला अतिरेकी वापर यामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळत असून त्याचे गंभीर परिणाम संपूर्ण मानवजातीला भोगावे लागत आहेत. अशा परिस्थितीत प्रत्येक नागरिकाने पर्यावरण संवर्धनासाठी पुढाकार घेत “एक तरी झाड लावा… स्वतःसाठी!” हा संकल्प अंगीकारावा, असे आवाहन महाराष्ट्र शासनाच्या कृषी भूषण सेंद्रिय शेती पुरस्कारप्राप्त आणि पर्यावरणप्रेमी उद्धव बाबर यांनी जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर केले आहे. उद्धव बाबर म्हणाले, गेल्या काही दशकांमध्ये पृथ्वीच्या सरासरी तापमानात सातत्याने वाढ होत आहे. या तापमानवाढीमुळे ऋतुचक्रात मोठे बदल होत असून अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, दुष्काळ, उष्णतेच्या लाटा, पूर आणि वादळांसारख्या नैसर्गिक आपत्तींची तीव्रता वाढली आहे. याचा थेट परिणाम शेती, जलसंपदा, जैवविविधता आणि मानवी आरोग्यावर होत आहे. ग्रामीण भागातील शेतकरी वर्गाला हवामान बदलाचे सर्वाधिक चटके बसत असून कृषी क्षेत्र मोठ्या संकटाला सामोरे जात आहे. ते म्हणाले, जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने प्रत्येकाने निसर्गाशी आपले नाते अधिक दृढ करण्याचा संकल्प करावा. वाढत्या तापमानाला आणि पर्यावरणीय ऱ्हासाला रोखण्यासाठी वृक्षारोपण व संवर्धन हा सर्वात प्रभावी आणि शाश्वत मार्ग असून, “एक तरी झाड लावा… स्वतःसाठी, आपल्या कुटुंबासाठी आणि भविष्यातील पिढ्यांसाठी”, असा संदेश उद्धव बाबर यांनी दिला. 0000000