रमेश औताडे
मुंबई : रमाबाई घाटकोपर शहिद भीम सैनिक स्मृतीला २९ वर्ष झाले आणि त्याचे राजकीय भांडवल सुद्धा भरपूर झाले. परंतु शहिदांचा परिवार कसा जगत आहे. त्यांना मरणारे आजही मोकाट आहेत. त्यांना कोणाचे संरक्षण आहे. ती समीक्षा करणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन आंबेडकरी चळवळीचे खंदे पुरस्कर्ते उत्तमराव गायकवाड यांनी केले.  शहिद भीम सैनिक स्मृती दिनानिमित्त आयोजित आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा मुंबई प्रदेशच्या वतिने समिक्षा अभियान प्रारंभ करताना बोलत होते.
अभियानात प्रामुख्याने स्मारक समितीचे अध्यक्ष अशोक हिरे, मुंबई प्रदेश अध्यक्ष विकास काटे, रिपब्लिकन नेते मंगेश पगारे, चिंतामण गांगुर्डे, काका गांगुर्डे, झुंजार गवळी प्रफुल्ल इंगोले,गुडु रंगारी उपस्थित होते.  मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण राज्यभरात राबविण्यात येणार आहे. आम्ही सर्व सहन करू शकतो परंतु आंबेडकरी अस्मितेच्या प्रश्नावर ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्यांच्या सन्मानार्थ हा लढा आहे असे मत विकास काटे यांनी मनोगत भाषणात व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *