शासनाकडून प्रतिनियुक्तीवर आलेल्यांची चलती
 मनपा प्रशासनाच्या कामकाजाचा अनुभव नसणारयांची खोगीर भरती   
कल्याण : कल्याण डोंबिवली मनपाचा नगररचना विभाग या ना त्या कारणाने वादाच्या भोवर्यात सापडत असल्याचा प्रत्यय पुनश्च आला आहे. तीन वर्ष सहाय्यक नगररचनाकार पदावर काम केलेल्या प्रतिनियुक्तीवर आलेला अधिकारी पुनश्च या महापालिकेत नगररचनाकार पदावर नेमणूक करण्यात आल्याने त्यांची सहाय्यक नगररचनाकार म्हणून ढिसाळ कामगिरी पाहता, नगररचनाकार पदावर नेमणूक कशी कोणाच्या अशिवार्दाने झाली. या मागचा सूत्रधार कोण, अशा आरोपाच्या चर्चा महापालिका वुर्तळात रंगल्या असल्याने नगररचना विभाग वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.
पालिका वुर्तळात संचालक नगरचना संतोष डोईफोडे, सहाय्यक नगररचनाकार स्वप्नील दळवी यांची भ्रष्टाचाराची रात्रीस खेळ चाले ही व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाली होती.  यांची खमंग चर्चा पालिका वुर्तळात धुमाकूळ घालत असताना स्वप्नील दळवी हे मागील तीन वर्ष सहाय्यक नगररचनाकार म्हणून केडीएमसीत कार्यरत होते. मागील तीन वर्षातील त्यांची सुमार कामगिरी पाहता, मनपाच्या हिताच्या दृष्टिकोनातून त्यांनी कोणतेही भरीव कामगिरी केली नाही, तरी देखील त्यांची बदली पुन्हा मनपात करण्यात आली आहे.
यामध्ये  त्यांची मागणी मनपाने केलेली नसताना पुन्हा त्यांची वर्णी नगररचनाकार म्हणून नेमणूक होते.  यामागे संचालक नगररचना डोईफोडे यांचा अदृश्य हात आहे का असा गंभीर आरोप जाणकारांकडून होत आहे.  महापालिकेच्या प्रशासकीय कामकाजावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी मनपा आयुक्त, सर्व साधरण सभेला असताना, मनपाच्या प्रशासकीय सेवेमध्ये दळवीसाठी  अशी मागणी संचालक नगररचना यांचेकडे कोणी केली   याबाबत संपूर्ण चौकशीपुर्ण होईपर्यंत दळवी यांना महापालिका सेवेमध्ये हजर करून घेण्यात येऊ नये अशी मागणी होत आहे. डोईफोडे यांनी जर दळवी यांच्यासाठी मागणी केली असेल तर डोईफोडे यांना परत शासनाकडे पाठविण्यात यावे,अशी मागणी यानिमित्ताने जोर धरू पाहत आहे. केडीएमसी  नगररचना विभाग संचालक नगररचना संतोष डोईफोडे अकार्यक्षम असल्याच्या चर्चा होत आहेत.
डोईफोडे यांचे सुरू असलेल्या कार्यकाळात मनपाचे नगररचना विभागाचे अर्थिक उद्दिष्ट २०० कोटींनी घसरले. वास्तु शिल्पकार व विकासक यांचे प्रस्ताव विहित कालावधीत मंजूर न झालेबाबत तक्रारी, बाह्यवळण रस्ता अथवा आरक्षणाच्या,भुसंपादनात दुर्लक्ष केल्यामुळे शहाराचा विकास भकास, मनपाच्या पैशाची उधळपट्टी सुमारे २५ कोटीची कामे ठाण्याच्या एकाच संस्थेस दिली. त्यांच्या कार्यकाळात नगररचना विभागात सर्वात जास्त प्रतिनियुक्तीवरील अधिकारी भरणा, सहाय्यक संचालक नगररचना यांच्यासह सर्वच अधिकारी यांना नवीन मनपा प्रशासनाचा अनुभव नाही.
क्लस्टर योजना कागदावरच असून याची  अमंलबजावणी मात्र शून्य ठाण्यातील संस्थेस कंत्राट दिले संस्थेचे काम मात्र शुन्य. मनुष्यबळ नाही, तरी देखील कोट्यवधीची बीले, यातच भर म्हणून कलस्टर योजना अमंलबजावणीसाठी नगररचनाकार कृष्णा शिंदे या प्रतिनियुक्तीवर आलेल्या अधिकारी यांची वर्णी लावली. संचालक पुणे नगररचना यांचेकडून महापालिका प्रशासानाचे सहाय्यक नगररचनाकार दळवी यांना नगर रचनाकार पद्दोतीने नेमणूक दिली असून डोईफोडे व दळवी यांचे भ्रष्टाचार व्हिडीओक्लिप काही महिन्यांपूर्वी व्हायरल झाली होती.
या सर्व चर्चा पाहता केडीएमसीचा नगररचना विभाग वादाच्या भोवऱ्यात सापडला असून यासर्व वादग्रस्त कर्मचाऱ्यांबाबत स्थायी समिती अथवा महासभेने दखल घ्यावी अशी मागणी यानिमित्ताने जाणकारांकडून होत  असल्याचे चित्र दिसत आहे. याबाबत संचालक नगररचना संतोष डोईफोडे यांच्याशी दळवी यांच्या नगररचनाकार नियुक्ती  संदर्भात विचारले असता त्यांनी सांगितले की, हा सामान्य प्रशासनाशी निगडित विषय असून माझा संबंध असण्याचा प्रश्नच नाही. अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता दळवी यांची नेमणूक सामान्य प्रशासन विभागाने केली नसल्याचे सांगितले.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *