एका बाजूला पाणीटंचाई, तर दुसरीकडे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शुद्ध पाणी वाया
कल्याण: कल्याण-डोंबिवलीतील अनेक भागांमध्ये नागरिकांना अपुरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होत असताना, दुसरीकडे केडीएमसीच्या टिटवाळा येथील मोहिली जलशुद्धीकरण केंद्रात दररोज लाखो लिटर शुद्ध पाण्याची नासाडी होत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
केडीएमसीच्या पाणीपुरवठा व्यवस्थेतील महत्त्वाचे केंद्र असलेल्या मोहिली जलशुद्धीकरण केंद्रात गळती, तांत्रिक बिघाड आणि देखभालीअभावी मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जात असल्याचा आरोप होत आहे. एकीकडे शहरातील अनेक भागांत नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे, तर दुसरीकडे जलशुद्धीकरण केंद्रातूनच शुद्ध पाण्याची नासाडी होत असल्याने प्रशासनाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली जात आहे. पाण्यासारख्या अत्यावश्यक नैसर्गिक संसाधनाची होणारी ही नासाडी तातडीने थांबवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. मोहिली केंद्रातील गळती व तांत्रिक समस्या त्वरित दूर करून नियमित देखभाल आणि देखरेख व्यवस्था मजबूत करण्याची गरज आहे.
0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *