केतन खेडेकर
दहीहंडी म्हणजे केवळ उत्सव नाही, तर उत्साह, एकजूट आणि सामूहिक प्रयत्नांची ऊर्जा अनुभवण्याचा क्षण आहे. याच उत्साहात माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत वरळी येथील जांबोरी मैदानावर भाजपा मुंबईचे पदाधिकारी अॅड. संतोष पांडे यांच्या पुढाकाराने आयोजित ‘परिवर्तन दहीहंडी उत्सव २०२६’ मध्ये नाशमुक्तीची दहीहंडी फोडण्यात आली. यावेळी गोविंदा पथकांचा उत्साह वाढवत त्यांना मनापासून शुभेच्छा दिल्या. उंचच उंच मानवी मनोरे रचताना दिसणारी त्यांची जिद्द, मेहनत आणि एकजूट खरोखरच प्रेरणादायी आहे. याप्रसंगी भाजपा मुंबई अध्यक्ष आमदार अमित साटम, विधानपरिषदेचे उपसभापती सचिन अहिर , सांस्कृतिक मंत्री अॅड. आशिष शेलार यांसह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *