मुंबई : मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या सौजन्याने मीरा-भाईंदर कुस्तीगीर संघ संचालित श्री गणेश आखाडा भाईंदरचे वस्ताद गुरुवर्य वसंतराव पाटील यांना त्यांनी गेल्या ३० वर्षात क्रीडा (कुस्ती) , सामाजिक , शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या भरीव कामगिरीबद्दल पिराजी थोरावडे सामाजिक संस्था व अखिल भारतीय स्वाभिमानी संघर्ष सेना महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ” छत्रपती राजर्षी शाहू महाराज समाजभूषण पुरस्कार २०२४ ” हा पुरस्कार नुकताच राज्याचे माजी मंत्री प्रा.मच्छिंद्र सकटे संस्थापक अध्यक्ष दलित महासंघ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला .
यावेळी .आयु पिराजी थोरावडे , पत्रकार नितीन वायदंडे , विनोद बल्लाळ , छत्रपती पुरस्कार विजेते पैलवान नजरुद्दीन नायकवडी , लेंगरे गावचे वस्ताद साहेबलाल शेख ही मान्यवर मंडळी उपस्थित होती.
यावेळी वसंतराव पाटील यांच्या हस्ते देखील काही पुरस्कार देण्यात आले .पुरसकार वितरण सोहळा राजमनी हॉल , निनाई नगर , ताकारी रोड , इस्लामपूर येथे संपन्न झाला . हा पुरस्कार मिळाल्या बद्दल सर्व स्तरांतून पाटील यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
000
