गुणगौरव समारंभात कपिल पाटलांचा विद्यार्थीना सल्ला
राजीव चंदने
मुरबाड : ध्येय डोळ्या समोर ठेऊन मेहनत घेतल्यास निश्चित पणे यश मिळते असा कानमंत्र माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी मुरबाड येथिल विध्यार्थी गुणगौरव समारंभात विद्यार्थ्यांना दिला.
भारतीय जनता पार्टी मुरबाड तालुका व कपिल पाटील फाउंडेशन यांच्या वतीने दहावी बारावी, पदवी व कला क्रीडा क्षेत्रात विशेष यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गुण गौरव समारंभ मुरबाड मधील माऊली गार्डन येथे मंगळवारी संपन्न झाला. त्यावेळी पाटील हे बोलत होते.
याप्रसंगी,माजी मंत्री जगन्नाथ पाटील, भाजपा तालुका अध्यक्ष जयवंत सूर्यराव, भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष मधुकर मोहपे, हरेश खापरे,नारायण गोंधळी,उल्हास बांगर, सुभाष घरत,माजी नगराध्यक्ष किसन अनंत कथोरे, दिपक खाटेघरे, भाजपा महिला मोर्चा अध्यक्ष शीतल तोंडलीकर,संजय हंडोरे,महेंद्र पवार, आदी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलतांना पाटील म्हणाले की ठाणे जिल्ह्या सारख्या ग्रामीण भागातही विदयार्थ्यां मध्ये प्रचंड प्रमाणात गुणवत्त्ता आहे, मात्र विदयार्थ्यांनी प्रशासकीय सेवेत जाणे गरजेचे आहे, डॉक्टर, ईजींनीयर, यासारख्या तत्सम पदव्या घेऊन ही विदयार्थ्यांनी त्यावरच अवलंबून न राहता यु पी एस सी, एम पी एस सी, यासारख्या परीक्षा देऊन लोकसेवा करावी, यावेळी विदयार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात करियर कसे उज्वल करावे याबाबत पुणे येथील करियर व्याख्यात्या ऍड.अदिती निटूरे यांनी विदयार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच त्यावेळी शेकडो विदयार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले, यावेळी गुणवंत विदयार्थ्यांना प्रशस्तीपत्र व सन्मान चिन्न देऊन गौरविण्यात आले.
0000
