उल्हासनगर : उल्हासनगर महानगरपालिकेत २२ जुलै ते २६ जुलै रोजी मालमत्ता कर वरील शंभर टक्के दंड माफ करण्यासाठी अभय योजना तसेच २७ जुलै रोजी राष्ट्रीय लोकअदालत आयोजन करण्यात आले असून जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन उल्हासनगर महापालिका आयुक्त अजीज शेख यांनी केले आहे.
उल्हासनगर महापालिकेकडून येत्या २२ जुलै ते २६ जुलै या दरम्यान अभय योजना तसेच २७ जुलै रोजी राष्ट्रीय लोक अदालत भरविण्यात येणार आहे. लोकन्यायालयात मालमत्ता करावरील विलंब शास्ती माफ, मालमत्तांचे कर निर्धारण व आकारणी संदर्भात वाद, दुबार नोंद व इतर कारणास्तव असलेल्या नोंदी रद्द करुन त्यावरील कर आकारणी निर्लेखित करण्याबाबतच्या प्रकरणांचा निपटारा करण्यात येणार आहे. तसेच अभय योजना आणि राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन देखील करण्यात आले असून नागरिकांनी जास्तीत जास्त या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन आयुक्त अजीज शेख आणि कर निर्धारक व संकलन अधिकारी नीलम कदम – बोडारे यांनी केले आहे.
