ठाणे : ठाण्यातील लक्षभेदी सामाजिक संस्थेच्या वतीने पाचपाखाडी भागातून आषाढी एकादशी निमित्त पालखी दिंडी काढण्यात आली . लक्षभेदी सामाजिक संस्थेच्या अध्यक्ष व भाजपा ठाणे शहर जिल्हा सचिव माधुरी मेटांगे यांच्या पुढाकाराने पाचपाखाडी भागातून आषाढी एकादशी निमित्त काढण्यात आलेल्या पालखी दिंडीचा शुभारंभ भाजपाचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष संजय वाघुले यांच्या हस्ते झाला यावेळी वाहतूक शाखा नौपाडा विभाग पोलीस निरीक्षक रामचंद्र मोहिते,आयोजिका माधुरी मेटांगे आदींसह मान्यवर उपस्थित होते. यावेळी दिंडीमध्ये सहभागी झालेल्या मुलांनी विठ्ठल रखुमाई ची आकर्षक वेशभूषा करुन तसेच विविध संताच्या वेशभूषा परिधान करुन पाचपाखाडी परिसरातून काढलेल्या दिंडीतील मुलांनी  विठ्ठल नामाचा जप करीत परिसर दणाणून टाकला.टेकडी बंगला,रायगड गल्ली,ठाणे महापालिका ,कलावती आई मंदिर,मार्गावरून फिरून ज्ञानराज सभागृह येथे पालखी दिंडीचा समारोप झाला. या दिंडित परिसरातील मुले, पालक व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचा भाग असणारी आषाढी एकादशी हा सोहळा आहे. या दिवशी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील भाविक विट्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरला पायी जातात व चंद्रभागेंत स्नान करुन विट्ठलाचे दर्शन घेतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानला जातो.तसेच पंढरपूर पायी जान्याची परंपरा ही फार जूनी असून भक्ताची श्रद्धा या वारीशी जूळलेली आहे. खऱ्या अर्थाने पंढरपूर वारीची परंपरा समाजातील भेदभाव दूर करण्यासाठी वारीला सुरुवात झाली. यात विविध जातीपातीचे लोक सहभागी होतात.हीच संस्कृती व परंपरा भावी पिढीपर्यंत पोहचवण्याच्या हेतूने  या  दिंडीचे आयोजन केल्याचे आयोजिका माधुरी मेटांगे यांनी सांगितले.
0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *