ठाणे येथील ज्ञानसाधना महाविद्यालयातील अर्थशास्त्र शिकविणारे लोकप्रिय प्रा. डाँ श्रीरंग कुडुक सर नुकतेच निवृत्त झाले असून त्यांच्या निवृतीनिमीत्ताने एका विविधरंगी कार्यक्रमाचे नियोजन पारसिकनगर कळवा येथे करण्यात आले होते ! आपल्या शांत आणि मनमिळाऊ स्वभावामुळे ते विद्यार्थी वर्ग , मित्रमंडळी, राजकीय नेते मंडळी, सामाजिक क्षेत्रात फार लोकप्रिय होते. अनेक मित्रमंडळी त्यांचा अजातशत्रू म्हणून उल्लेख मोठ्या सन्मानाने करीत करतात .
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले होते , खेडेगावातील झाडाच्या पारावर भरणाऱ्या शाळेत चौथी पर्यंत शिक्षण घेत पुढे स्वकष्टाने त्यांनी अनेक हाल अपेष्ठांचा सामना करीत त्यांनी आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. वेळ प्रसंगी गवताची कापणी केली तर विद्यार्थी दशेत अर्थांजनासाठी कँन्टीन चालविण्याचे काम ही केले , एकच वही इयत्ता पास झाल्यानंतर ती नदीच्या पात्रात धुवून पुन्हा दुसर्या इयत्तेत त्यांना वापरावी लागली हे वास्तव त्यांनी मनात जपून ठेवले आहे .
या सर्व गोष्टींचा बाऊ न करता उत्तरोत्तर प्रगती करत त्यांनी यशाचे शिखर सर केले आहे , या सगळ्या संधर्षमय आयुष्यात त्यांना त्यांच्या मातोश्री श्रीमती मालनबाई यांचा आशीर्वाद आणि सुविद्य पत्नी जेष्ठ कवयित्री प्रा. नलिनी कुडुक यांची फार मोलाची साथ लाभली हे ते मोठ्या मनाने कबुल करतात . कुडुक दापत्यांचे सामाजिक क्षेत्रात सुध्दा योगदान असुन अनेक यशस्वी कामे त्यांनी कुठल्याही प्रसिद्धच्या मागे न लागता पार पाडली !
त्यांच्या निवृतीनंतरच्या समारंभात त्यांच्या मातोश्रींचा नव्वदीचा वाढदिवस सुद्धा साजरा करण्यात आला , कलाक्षेत्र , राजकीय क्षेत्र , सामाजिक , साहित्यिक , शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी या समारंभात उपस्थित होती , या समारंभाच्या निमित्ताने स्वागतपर भाषणे , कराओके संगीत मेजवानी , लावणीनृत्य , अशा विविधरंगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . शेकडो कुडुकप्रेमी लोकांनी या कार्यक्रमात आपला सहयोग नोंदवला ! या कार्यक्रमाचे नियोजन , सूत्रसंचालन ठाणे जिल्हा कोकण मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष जेष्ठ कवि लेखक बाळ कांदळकर यांनी केले तर स्वत: प्रा डाँ श्रीरंग कुडुक आणि प्रा. नलिनी कुडुक यांनी सर्वांचे आभार मानले.
00000
