अशोक गायकवाड

 

 

रायगड : भारत निवडणूक आयोगाने १ जुलै २०४० रोजीच्या अर्हता दिनांकाच्या आधारे मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाचे सुधारित वेळापत्रक निश्चित केले असून आता विधानसभा निवडणुकीत मतदानासाठी २० ऑगस्टपर्यंत मतदार नोंदणी करता येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे यांनी दिली आहे.
भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्राच्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यांमधील मतदार याद्या अद्ययावत करण्याचा कार्यक्रम घोषित केलेला आहे. भारत निवडणूक आयोगाने २० जून २ च्या पत्रान्वये १ जुलैच्या अर्हता दिनांकाच्या आधारावर राज्यात मतदारयाद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम (दुसरा) बाबतचे वेळापत्रक निश्चित केले होते. भारत निवडणूक आयोगाने २४ जुलैच्या पत्रान्वये या कार्यक्रमाच्या वेळापत्रकात बदल केला करून सुधारीत कार्यक्रम जाहीर केला होता. या कार्यक्रमात निवडणूक आयोगाने बदल केला आहे. त्यानुसार प्रारूप मतदार यादी ६ ऑगस्टला प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतर दावे व हरकती ६ ते २० ऑगस्ट या कालावधीत सादर करता येतील. मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडून २९ ऑगस्ट पर्यंत दाखल दावे व हरकती निकाली काढल्या जातील. मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी ३० ऑगस्टला होणार आहे. जिल्ह्यातील मतदारांनी व सर्व संबंधितांनी याबाबत नोंद घ्यावी, असे आवाहन जावळे यांनी केले आहे.
0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *