राजीव चंदने

 

 

मुरबाड : तालुक्यातील बळेगाव ग्रामपंचायत हद्दीतील नेहरू वाडीतील आदिवासी वस्तीला अनेक वर्षांपासून रस्ता नसल्यामुळे तेथील शालेय विद्यार्थी,ग्रामस्थ गरोदर महिलांची मोठी कुचंबना होत आहे, देश स्वातंत्र होऊन अठ्ठ्याहत्तर वर्ष झाले  परंतु या कातकरी आदिवासी, वाडीला रस्ता नसल्यामुळे तेथील ग्रामस्थांना अनेक समस्यानां तोंड दयावे लागत आहे, मुरबाड तहसीलदार यांच्या कडे अनेकदा रस्ता आणि स्मशाना संदर्भात निवेदन दिले परंतु त्यावर कुठल्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळे अखेर बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे ठाणे जिल्हा अध्यक्ष दिनेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी वाडीतील ग्रामस्थांनी मुरबाड तहसील कार्यलयावर बिऱ्हाड मोर्चा काढत सोबत जनावरे, अन्न धान्य, कपडे  घेऊन तहसील कार्यलयाच्या पटांगणात आपले संसार मांडून प्रशासनाच्या कामचुकारपणा बाबत खंत व्यक्त केली,
या बिऱ्हाड मोर्चेला ठाणे जिल्हा परिषदचे मा. उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी भेट दिली असता, आपण केलेली मागणी रास्त असून मी जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांच्याशी चर्चा करून रस्ता व स्मशानासाठी लवकरच निधी उपलब्ध करून रस्त्याची व स्मशानाची समस्या येत्या सात दिवसात सोडवण्यासाठी प्रयत्न करेन,आणि आपण मोर्चेला पूर्णविराम दयावा. अशी ग्रामस्थांना विनंती केली,
बिऱ्हाड मोर्चेला अनेक राजकीयपक्षांनी दिलेला पाठिंबा पाहता मुरबाड तहसीलदार अभिजित देशमुख यांनी लेखीपत्र देत सात दिवसाची मुदत मागण्यात आली व मोर्चा थांबविण्यासाठी विनंती केली याबिऱ्हाड मोर्चेत पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव सतिश बनसोडे, शहापूर तालुका सचिव मन्सूर शेख, ता. अध्यक्ष मारुती वाघ, चिंतामण भांगरथ आमआदमी पार्टीचे शरद पवार, जिजाबाई दंवड, लक्ष्मण खंडवी, प्रसाद वाघमारे, भीमा वाघ, व ई. कार्यकर्ते यांनी सहभाग घेतला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *