मुंबई : रिपब्लिकन पक्षाने (खोरिपा) लोकसभा निवडणुकीत संविधान आणि लोकशाही वाचविण्यासाठी महविकास आघाडीला पाठिंबा दिला होता महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मा शरदचंद्र पवार साहेब यांना प्रत्यक्ष भेटून मा आ उपेंद्रजी शेंडे यांनी पाठिंबा देण्याचा निर्णय सांगितला होता त्यानंतर राज्यभरात रिपब्लिकन पक्ष (खोरिपा) च्या कार्यकर्ते यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार केला होता त्यामुळेच महाविकास आघाडीचे ३१ उमेदवार निवडून आले होते ह्या विजयात रिपब्लिकन पक्ष (खोरिपा)चा खारीचा वाटा आहे आता राज्यात विधानसभा निवडणुका जवळ आल्या आहेत अशावेळी आम्ही राज्यातील महाविकास आघाडीच्या घटक पक्षांच्या नेत्यांना भेटण्याचा प्रयत्न करत आहोत मात्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या भेटीसाठी प्रयत्न केले तसेच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या भेटीसाठी सुद्धा प्रयत्न केले आहेत मात्र कार्यबाहुल्यामुळे त्यांच्या भेटी होत नाहीत त्यामुळे जर महाविकास आघाडीला रिपब्लिकन पक्षाची (खोरिपा) गरज नसेल तर तसे कळवावे परंतु रिपब्लिकन पक्षाला गृहित धरू नये असे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा आ उपेंद्रजी शेंडे यांनी सांगितले आहे
रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक सरचिटणीस तसेच राज्यसभेचे माजी उपसभापती दिवंगत नेते बैरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांचा जन्मशताब्दी सोहळा २५ सप्टेंबर रोजी नागपूर येथे आयोजित करण्यात आला आहे ह्या जन्मशताब्दी सोहळाचा प्रचार करण्यासाठी आज मुंबईत आझाद मैदान येथे पक्षाच्या कार्यालयात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा आ उपेंद्रजी शेंडे साहेब यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली होती त्यानंतर पत्रकार परिषदेत पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भाऊ निरभवणे यांनी सांगितले की दि १२ सप्टेंबर पासून विदर्भाचा दौरा करणार आहेत ह्या दौऱ्यात पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याबरोबर बैठक घेऊन चर्चा करण्यात येणार आहे ह्यावेळी बैरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांचा जन्मशताब्दी सोहळा यशस्वी करण्यासाठी करावयाच्या उपाययोजनाबाबत सुचना करण्यात येणार आहे त्याचबरोबर विधानसभा निवडणुकीबाबत काय भूमिका घ्यायची याचा आढावा कार्यकर्त्यांबरोबर चर्चा करून घेण्यात येणार आहे.
विधानसभा निवडणुकीबाबत भूमिका बैरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यात जाहीर करण्यात येणार असल्याचे सुद्धा भाऊ निरभवणे यांनी सांगितले पत्रकार परिषदेत पक्षाचे मुंबई प्रदेश अध्यक्ष भागवत कांबळे, सरचिटणीस विक्रांत पाटील, उपाध्यक्ष सलीम सय्यद, फरहाना ताई पठाण, इस्माईल मनियार उपस्थित होते अशी माहिती पक्षाचे मुंबई प्रदेश अध्यक्ष भागवत कांबळे यांनी दिली आहे.
