मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजल्यानंतर

 शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी सोशल मिडीयावर प्रतिक्रीया व्यक्त करताना आता जनताच आता न्याय करणार असून मशाल धगधगणार असल्याचे म्हटले आहे.

आदित्य ठाकरे यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, “ज्या क्षणाची महाराष्ट्रातले आपण सर्वजण वाट पाहत होतो तो क्षण जवळ आला आहे. २० नोव्हेंबर हा मतदानाचा दिवस आहे. गेल्या २ वर्षात महाराष्ट्राला लुटणाऱ्या शिंदे-भाजपला हुसकावून लावण्यासाठी आपल्याला बदल घडवायचा आहे. आम्ही न्यायसंस्थेकडून न्यायाची वाट पाहत होतो, पण आता जनताच न्याय करणार आणि मशाल धगधगणार,” असा विश्वास आदित्य यांनी व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *