रमेश औताडे
मुंबई :धनगर समाजाला आरक्षणाचे लेखी आश्वासन दिले होते. परंतु आमचा विश्वासघात करण्यात आला आहे. मात्र आचारसंहितेच्या अगोदर जीआर काढायला सरकार अपयशी ठरलेले आहे. येणाऱ्या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीने काहीच न केल्यामुळे धनगर समाजातील लोकांनी उमेदवार पाडण्याच ठरवले असून ओबीसी बहुजन आघाडीतील उमेदवारांना पाठिंबा देण्याचे आम्ही ठरवले आहे. असे ओबीसी नेते प्रकाश आण्णा शेंडगे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
जेथे धनगर तिथे तेथे धनगर उमेदवार, लिंगायत तिथे लिंगायत ,आदिवासी तेथे आदिवासी असे उमेदवार आम्ही देणार आहेत. ओबीसी बहुल अशी ही निवडणूक होताना पाहायला मेळेल.  महाराष्ट्रात ओबीसी पर्याय म्हणून आम्हाला पसंती मिळणार आहे. मराठा ओबीसी वाद पाहता बीड जिल्ह्यातला ओबीसी संतापलेला आहे ४६ पैकी २५ उमेदवार तयार झालेले आहेत, येणाऱ्या २० तारखेला आम्ही उमेदवार जाहीर करणार आहे.
पश्चिम महाराष्ट्रात १०, उत्तर महाराष्ट्र ५ आणि विदर्भातही आमच्याकडे ओढा आहे .जरांगे फॅक्टर जे जे उमेदवार उभे करतील, तर त्यांचे लेबल लावलेले कुठल्याही पक्षाचा असू द्या तो प्रत्येक उमेदवार ओबीसी समाज पाडल्याशिवाय राहणार नाही. १६० आम्ही पाडू आणि १६० निवडून आणू. अनेक जण आता ओबीसींचे उमेदवार शोधत आहेत, यावेळी या निवडणुकीत ओबीसी दलितांच्या हिताचे बोलेल तोच राज्यावर राज्य करणार आहे. ४ ते ५ दिवसांमध्ये चिन्ह मिळणार असून ते चिन्ह चहाची किटली असेल आम्ही त्याचीच मागणी केली आहे असे शेंडगे म्हणाले.
00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *