नवी दिल्ली- न्याय यापुढे आंधळा असणार नाही असा प्रतिकात्मक संदेश देत भारतातील न्यायव्यवस्थेसाठी प्रतिकात्मक असलेल्या न्यायदेवतेच्या डोळ्यावरील काळी पट्टी आता हटवण्यात आली आहे. सरन्यायाधिश डी. वाय. चंद्रचुड यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या नव्या शिल्पात न्यायदेवेतेच्या डोळ्यावरील ही पट्टी काढून टाकण्यात आली असून हातातील तलवारीएवेजी आता संविधानाचे पुस्तक देण्यात आले आहे. न्यायाधीशांच्या लायब्ररीमध्ये हा नवीन स्वरूपाचा पुतळा बसवण्यात आला आहे.

या नव्या पुतळ्याचा रंग पांढरा आहे. पुतळ्यामध्ये न्यायदेवतेचे भारतीय पोशाखात चित्रण करण्यात आले आहे. न्यायदेवता साडीत दाखवली आहे. डोक्यावर एक सुंदर मुकुट देखील आहे. कपाळावर बिंदी, कानात आणि गळ्यात पारंपरिक दागिनेही आहेत. न्यायदेवतेच्या एका हातात तराजू आहे. तर दुसऱ्या हातात संविधान धरलेले दाखवले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *