ठाणे : मतदान हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे. या लोकसभा निवडणुकीत मतदान करून आपली लोकशाही बळकट करायला हवी.कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता निर्भयपणे आपण मतदानाचा अधिकार बजवायला हवा असे आवाहान स्वीप टीम कडून करण्यात आले. या वेळी प्रभाग समिती कार्यालयात 50 हून अधिक कर्मचारी उपस्थित होते. यावेळी उपस्थित कर्मचारी वर्गाला लोकशाहीत मतदानाला किती महत्व आहे व मतदान का करावे? याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
148 ठाणे विधानसभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती उर्मिला पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी उथळसर प्रभाग समिती कार्यालयात मतदान जनजागृती कार्यक्रम पार पडला.
या मतदान जनजागृती कार्यक्रमात सहभागी असणाऱ्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना मी मतदान करणारंच…. आपण ही आपल्या मतदानासाठी सज्ज रहा. या आशयाचे मजकूर असलेले व त्यावर मतदान दि.20 नोव्हेंबर 2024 असे दर्शविणारे माहितीपत्रकाचे ही वाटप करण्यात आले.
निवडणूक प्रक्रियेत मतदान हा एक महत्त्वाचा टप्पा असतो. हा टप्पा अधिक बिनचूक व पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांनी मतदान प्रक्रिया सहभागी व्हायला पाहिजे, असे प्रतिपादन उथळसर प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांनी केले.
लोकशाहीच्या उत्सवात मतदानाच्या दिवशी देशाच्या भविष्यासाठी मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट करावी आणि सर्वानी न चुकता दि.20 नोव्हेंबर 2024 रोजी अवश्य मतदान करावे, असे आवाहान सर्व कर्मचारी वर्गाला करण्यात आले. सर्व कर्मचाऱ्यांनी मतदानाची सामूहिक शपथ घेऊन मतदान जनजागृती अभियानाच्या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
