मुंबई : घाटकोपर पश्चिममधील हिंदुस्थान कंपोजिटसच्या कामगारांना थकीत महागाई भत्ता- डिए मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला.गेली ३० वर्षे न्यायालयात चाललेल्या लढाईपुढे कामगार हतबल झाले.शेवटी कामगारांनीच कंपनी व्यवस्थापनाशी आऊट ऑफ कोर्ट सामजस्या करार करण्यास सहमती दर्शवली.यामुळे गेल्या ३० वर्षापासून अपेक्षित असलेली थकीत महागाई भत्त्याची रक्कम ११०० कामगारांना मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
यासंदर्भात नुकतीच एक सर्वसाधारण सभा विक्रोळी येथील संदेश विद्यालयात कामगारांनी बोलविली होती.
गेल्या अनेक वर्षापासून भिजत पडलेला डीएचा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे,असे शिवसेनेचे माजी उपविभाग प्रमुख नंदकुमार आंबोकर हे या सभेत म्हणताच, हा महागाई भत्त्याचा प्रश्न कोर्टाबाहेर तडजोड करुन सोडवा,असे आवाहन कामगारांनी हात उंचावून केले.
आता लढाई थांबवा, कंपनीकडून डीएचे पैसे घ्या असे आवाहन पुन्हा कामगारांनी करतात सर्वसाधारण सभेला उपस्थित असलेल्या सर्वच कामगारांनी या आवाहनाला सहमती दिली.सुरवातीला औद्योगिक न्यायालय नंतर उच्च न्यायालयात कामगार संघटना कंपनीशी या प्रश्नावर लढली.परंतु कोणताही निर्णय न झाल्याने कामगार युनियनही हतबल झाली. आणि ते लढ्यापासून दूर झाले. या पार्श्वभूमीवर नंदकुमार आंबोकर यांच्या विशेष प्रयत्नाने आणि वर्किंग कमिटीचे सुधीर पाटील,एल.जी.नाईक यांच्या उपस्थित कामगारांची सभा विक्रोळीत पार पडली.
हिंदुस्थान कंपोजिटस लि.ही कंपनी सध्या बंद आहे.मात्र ही कंपनी १९९२ मध्ये आर्थिक दृष्ट्या तंगीत आली.तेंव्हा कंपनीने कामगारांचा डीए १९९४ मध्ये बंद केला. १९९४ ते २००६ या काळातील डीएची थकीत रक्कम ११०० कामगारांना मिळणे अपेक्षित आहे.या ११०० मधील ४०० कामगार मयत झालेले आहेत.तर बहुसंख्य कामगार हे वयोवृद्ध झालेले आहेत.कंपनी कोर्ट लढाईतून माघार घेत नाही.यामुळेच कामगारांनी आता पुढाकार घेऊन आपल्या डिएची थकीत रक्कम कंपनीकडून सामजस्याने घेण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी नंदकुमार आंबोकर यांनी विशेष प्रयत्न केलेले आहेत.
रेल्वेचे पोलीस आयुक्त डाॅ.रवींद्र शिसवे, इओडब्ल्यूचे संयुक्त आयुक्त प्रवीण कुमार पडवळ यांचेही सहकार्य हा डीएचा प्रश्न सोडण्यासाठी लाभले.तसेच याकामी अॅडव्होकेट पिरजादा यांच्या मार्गदर्शनाखाली हा महागाई भत्त्याचा प्रश्न निकाली काढला.याबद्दल अधिकारी रविंद्र शिसवे,प्रविण पडवळ,अॅड पिरजादा यांचे आभार कामगारांनी मानले आहेत.
