केतन खेडेकर
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मुंबई महिला अध्यक्षा आरतीताई साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली सीएसटी रेल्वे स्थानकावर नोकरी करणाऱ्या महिलांसाठी हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या समारंभाला चाकरमानी महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी महिलांनी एकमेकांना तिळाचे लाडू भरून तसेच गुलाबाचे फुल देऊन त्यांच्यासोबत हळदीकुंकू आणि मकर संक्रांति साजरी केली. आम्ही दरवर्षी महिलांसाठी हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करत असतो या वर्षी देखील आम्ही उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या हळदी कुंकू समारंभाचे आयोजन केले आहे. महिलांना कामानिमित्त तसेच नोकरी निमित्त हळदी कुंकू समारंभामध्ये भाग घेणे जमत नाही त्यासाठी आम्ही दरवर्षी सीएसटी रेल्वे स्थानकावर येऊन महिलांसोबत हळदीकुंकू समारंभ साजरा करतो यापुढे देखील आम्ही हा हळदी कुंकू समारंभ साजरा करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मुंबई महिला अध्यक्ष आरती ताई साळवी यांनी दिली.यावेळी दक्षिण मुंबई जिल्हा अध्यक्षा स्मिता अंजेरकर, सुरेखा मेहेर, ज्योती कांबळे आणि इतर मान्यवर मंडळी उपस्थित होती.
00000
