
स्वाती घोसाळकर
मुंबई : मराठी मनाचा हुंकार म्हणून ओळख असणाऱ्या शिवाजीपार्कवर म्हणजेच शिवतिर्थावरून आज तब्बल २० वर्षांनी उद्धव ठाकरें आणि राज ठाकरे यां ठाकरें बंधूनी अवघ्या महाराष्ट्राला साद घातलीय. आता चुकलात तर कायमचे संपलात…. अरबी समुद्रालाही लाजवेल अशा शिवतिर्थावरील जमलेल्या शिवसैनिक आणि मनसैनिकांच्या गर्दीला ठाकरे बंधूंनी भावनिक साद घातली. मुंबई ही महाराष्ट्राची आहे. मराठी माणसाची आहे, कुणी कितीही गमजा मारल्या तरी येथे शब्द मराठी माणसाचाच चालणार असा आवाज आज ठाकरेंनी दिला आणि टाळ्यांच्या कडकडाटाने अवघा आसमंत दणादणून गेला. शिवतिर्थावरील ही गर्दी येणाऱ्या महानगर पालिकेच्या निवडणूकीत निर्णायक ठरणारी असेल असे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे.
मेवाभाऊंना मुंबईचे पुन्हा बॉम्बे
करायचेय – उद्धव ठाकरे
मुंबई : टिव्हीवर लाडक्या बहीणींचा देवा भाऊ अशी जाहिरात चालते. हा धागा पकडत हे देवाभाऊ नव्हे तर अडाणींकडून मेवा घेणारे मेवाभाऊ असल्याची टिका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली. मेवा भाऊ तुम्ही आम्हाला काय शिकवताय, हे सगळं अडानीकरण चाललंय. आमच्या मुंबादेवीवरुन मुंबईचं नाव ठेवलं आता त्या मुंबईचं नाव बॉम्बे करण्याचा तुमचा डाव चालला आहे. असा आरोपही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला.
तब्बल 20 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर शिवतीर्थावर ठाकरे बंधूंची एकत्र शिवगर्जना झाली. या सभेत ठाकरेंनी फडणवीस यांचा चांगलाच समाचार घेतला. फडणवीस यांनी एक आवाहन दिलं की, उद्धव ठाकरेंचं विकासाचं एक भाषण दाखवा त्यांना मी हजार रुपये देतो. मात्र मला त्यांचा चोरीचा पैसा नकोच. पण देवेंद्र फडणवीस मी तुम्हाला आवाहन देतो की, मोदींपासून ते तुमचं आणि तुमच्या खालच्या चेल्या-चंपाट्यांचं अगदी वर्गातल्या मॉनिटरची निवडणूक असली तरी हिंदू-मुस्लिम नं करता केलेलं भाषण दाखवा आम्ही सर्व मिळून तुम्हाला एक लाख रुपये देतो. अशी बोचारी टीका शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंनी केलीय.
राज ठाकरे यांनी
शिवतिर्थावरील आपल्या भाषणात आज राज यांनी आज उत्तम मांडणी केली. एवढं पोट तिडकीने सांगितलं, मात्र नुसतं पोटला तड लागून होणार नाही, तर डोक्याला तिडक गेली पाहजे. आणि जर ती जाणार नसेल तर आपल्याला शिवरायांचे नाव घेण्याचा अधिकार नाही. असेही उद्धव ठाकरे म्हणाले. अनेक जण प्रश्न विचारात होते हि ठाकरेंच्या अस्तित्वाची लढाई आहे का? आमचं अस्तित्व संपवणारं नेतृत्व अजून जन्माला आलं नाही, आमचं अस्तित्व तुमच्या समोर आहे. मराठीसाठी एकत्र आलोय, आमच्यातील वाद आम्ही गाडून एकत्र आलोय आणि मुंबईसाठी, मराठी माणसासाठी आणि हिंदूंसाठी एकत्र आलोय. अशी गर्जनाही उद्धव ठाकरेंनी यावेळी केली.
000
मुंबई वाचवायचीय, ही शेवटची लढाई, त्वेषाने लढा- राज ठाकरे
मुंबई : मुंबई वाचवायचीय, ही शेवटची लढाई, त्वेषाने लढा, आज हरलात तर संपून जाल, अशा शब्दात राज ठाकरे यांनी शिवतिर्थावरील शिवसेना आणि मनसेच्या संयुक्त शिवगर्जना सभेत मुंबईकरांना आवाहन केलं. तसेच, आपल्या भाषणात लाव रे तो व्हिडिओ म्हणत राज ठाकरेंनी २०१४ ते २०२४ या गेल्या १० वर्षात उद्योगपती गौतम अदानींच्या वाढलेल्या संपत्तीचा लेखाजोखाच मांडला.
मुंबई महानगरपालिकेच्या अनुषंगाने मुंबईकरांना आज ऐतिहासिक क्षण पाहायला मिळाला. ठाकरे बंधूंची पहिली संयुक्त सभा आज शिवतीर्थावर मोठ्या उत्साहात पार पडली. सभास्थळी एलईडी स्क्रीन्सही आधीच लावण्यात आल्या होत्या, त्यामुळे अपक्षेप्रमाणे राज ठाकरेंनी आपल्या लाव रे तो व्हिडिओ शैलीत सत्ताधाऱ्यांचा समाचार घेतला. भाषणाच्या सुरुवातीलच, मी या व्यासपीठावर लहान असताना अनेकदा आलो, सेनेची स्थापना झाल्यानंतर माझे आजोबा माझे वडील श्रीकांत ठाकरे आणि माँ उपस्थित होत्या. खरतर आज माझे आजोबा प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, माँ हे चित्र पाहायला हवे होते, आम्ही जो लढा उभारलाय ते वरतून पाहत असतील, अशी भावनिक साद राज ठाकरेंनी दिली.
एमआयएमसोबत युती, पैशांचा अमाप वापर, बिनविरोध निवडणुकांसाठी दबाव, ड्रग्ज विक्रेत्याला नगराध्यक्षपदाचं तिकीट दिलं जातंय, बाल लैंगिक अत्याचारातील आरोपीला नगरसेवक केलं जातंय, असे म्हणत राज ठाकरेंनी भाजपवर हल्लाबोल केला.
आज खूप काही घेऊन आलोय… पोट भरून घरी जा… काही जण तिकीट वाटपात नाराज झाले, त्यांची दिलगिरी व्यक्त करतो. आपलेच आहेत, परत येतील… आत्ताच आहे ते जातील. गेलेले तर परत येतीलच, असे म्हणत राज ठाकरेंनी पहिल्यांदाच जाहीर व्यासपीठावरुन दिलगिरी व्यक्त केली. मी आणि उद्धव एकत्र आलो मुंबईवर आलेला हे संकट… एक डाव या सरकारकडून रचला जातोय. हिंदी सक्ती करत होते, मी कडाडलो आणि उद्धवही कडाडला. हिंदी सक्ती फक्त मराठी माणसाला चाचपडण्यासाठी होती. आली कुठून हिम्मत? कोणाला विचारायचं नाही, जनतेची किंमत काय, पैसे दिले की आम्ही विकत घेऊ, आला कुठून विश्वास. गृहीत धरून टाकलय तुम्हाला… बोगस वोटर आणि ईव्हिएम मशीनचे तंत्र यांच्या जोरावरच ही मुजोरी सुरु आहे , असे म्हणत राज ठाकरेंनी मतदान प्रक्रियेवर हल्लाबोल केला.
अकोटमध्ये भाजपने MIM सोबत युती केली, अंबरनाथमध्ये भाजपने काँग्रेस सोबत युती केली. तुळजापुरात विनोद गंगणे नावाच्या माणसाला तिकीट भाजपने दिले, ड्रग्ज रॅकेटमधला माणूस त्याला तुमच्या नाकावर टिच्चून तिकीट दिले. बदलापूरमध्ये बलात्कारातील आरोपी असलेल्या तुषार आपटेला नगरसेवक केलं, येथे कुठून तुम्हाला हिम्मत? असा सवाल राज ठाकरेंनी विचारला.
जे विधानसभेला केलं ते हे आत्ता सुद्धा करणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी छगन भुजबळ यांना जेलमध्ये टाकलं होतं, आतां मांडीला मांडी लावून बसले. अजित पवार यांचे बैलगाडीभर पुरावे यांनी आणले होते. मग, द्या ना ते पुरावे कोर्टात. परवा उत्तर भारतातला कोणीतरी म्हणाला बीएमसी मध्ये उत्तर भारतीयांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजे, कोल्हापूर-सातारा ह्या बाहेरच्या लोकांना येथे नोकऱ्या नको म्हणतात. कोल्हापूर, सातारामधले लोक तुम्हाला बाहेरचे लोक वाटतात. यांचा नेता कृपाशंकर सिंह म्हणतो उत्तर भारतीय महापौर बसेल, पण तुम्ही बोलू शकता का तिकडे जाऊन? मुंबईत रसमलाई आली होती… म्हणतो मुंबई आणि महाराष्ट्राचा काय संबंध? भडव्या तुझा काय संबंध आहे येथे यायचा? अशा शब्दात राज ठाकरेंनी अण्णामलाईचा समाचार घेतला. बाळासाहेब ठाकरे म्हणायचे हटाव लुंगी बजाव पुंगी ते यासाठीच. आम्ही एकटे असलो तरी काफी आहोत.
आज हे संकट तुमच्या उंबरठ्यावरती आलाय… कोकण पट्टी रिकामी करताय. कुठे चाललीये बुलेट ट्रेन, माझा त्यावेळी सुद्धा विरोध होता. बुलेट ट्रेनचे शेवटचे स्टेशन बघा. तुमचं अस्तित्व नसेल तर काय चाटायच्या महापालिका. तुमची काय किमत करून ठेवली या माणसांनी, कारण पैसे फेकले की हा विकला जातो. बोली लावणारे कोण? आमचेच काय परिस्थिती आलीये. मराठी माणसासाठी ही शेवटची निवडणूक आहे, आज चुकला तर मुकलात. ह्या मराठीसाठी महाराष्ट्र साठी एक व्हा. इतक्या लोकांच्या तपस्याने मुंबई मिळाली आहे. हे पुतळे काय म्हणतील, आमचा मराठी माणूस बेसावध राहायला आणि मुंबई गमावली, असे म्हणत राज ठाकरेंनी भावनिक साद दिली.
