मुंबईत २५ वर्षानंतर ठाकरेंची सत्ता संपुष्टात
मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणावर दुरागामी परिणाम करणाऱ्या या २९ महानगर पालिकेच्या निवडणूकीत भाजपा महायुतीने आपाला विजयी अश्व चौखुर उधळलाच पण मुंबईत शिंदेंच्या शिवसेनेसह सत्ताही आणली. तब्बल २५ वर्षानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची सत्ता भाजपाने संपुष्टात आणली तर एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात एकहाती सत्ता आणली. मुंबईत भाजपा तर ठाण्यात एकनाथ शिंदेंची शिवसेना नंबर १ ठरली.
मुंबईत शिवसेनेच्या पक्षफुटीनंतर होणाऱ्या या महानगर पालिकेच्या लढतीकडे अवघ्या देशाचे लक्ष होते. उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने २० वर्षातील आपले वाद मिठवित एकत्र येत ही निवडणूक लडवल्यामुळे लढत चुरशीची झाली. पक्ष आणि चिन्ह दोन्ही हिरावून घेतलेल्या उद्धव ठाकरेंनी मुंबईत भाजपा महायुतीला चुरशीची लढत दिली. पुणे आणि पिंपरीत पवार घराण्याची वाताहत होत असताना त्यातुलनेत ठाकरेंनी मुंबईत आपला गड राखण्याचा कसोशिनेने प्रयत्न केला. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने ६६ तर मनसेने ६ जागां जिंकत कडवी झुंज देत भाजपाल एकहाती मुंबईची सत्ता घेण्यापासून ८८ जागांवर रोखले. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या २८ जागांमुळे मुंबईत आता भाजपाचा महापौर असेल.
मुंबईत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला जबर नुकसान सहन करावे लागले. २०१७ साली एकत्रित शिवसेनेकडे ८७ जागा होत्या. त्या तुलनेत पक्ष आणि चिन्ह आणि भाजपाची साथ असूनही एकनाथ शिंदे यांना फक्त २८ जागाच जिंकता आल्या. घराणेशाहीचा फटका शिंदेंना मुंबईत बसला. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे माजी आमदार सदा सरवणकर यांचा मुलगा आणि मुलगी. माजी खासदार राहुल शेवाळेंची वहीणी, खासदार रवींद्र वायकर यांची मुलगी, आमदार मंगेश कुडाळकर यांचा मुलगा पराभूत झाला.
याउलट ठाण्यात एकनाथ शिंदे यांनी एकहाती सत्ता आणत गेल्यावेळेपेक्षा अधिक नगरसेवक निवडूण आणले. ठाणे म्हणजे एकनाथ शिंदे हे समिकरण या निवडणूकीमुळे पुन्हा एखदा दृड झाले.
