कल्याण :   डोंबिवली एमआयडीसी निवासी भागात आज रविवारी सकाळी साडे दहा वाजल्यापासून विज पुरवठा खंडित झाला होता.  उच्च दाबाच्या वाहिन्यांवर झाडाच्या फांद्या पडल्यामुळे किंवा स्पर्श झाल्याने स्फोट होऊन वीज पुरवठा खंडित होत होता. शिवाय हेवी करंट मुळे मेन फिडरचा लग आणि उच्च दाबाच्या वाहिन्यांवरील कंडक्टर तुटल्याने तसेच ट्रान्सफॉर्मर लायटिंग अरेस्टर फुटल्याने असे अनेक प्रकाराच्या समस्या या पावसामुळे आल्याने आज रविवारचा सुट्टीचा दिवस रहिवाशांना विजेविना काढावा लागला.
सकाळ साडे दहा वाजल्यापासून ते संध्याकाळ पाच वाजेपर्यंत लाईटचा खेळखंडोबा सुरू होता. गेलेले लाईट कधी अचानक मधूनच यायचे आणि ताबडतोब जायचे पण. काही ठिकाणी वीज पुरवठा डीम आणि चढउतार  होत असल्याचे तक्रारी बऱ्याच रहिवाशांनी केल्या आहेत. त्यात एमआयडीसी पाणी खात्याकडून मेसेज आला की दुपारी बारा वाजल्यापासून ते सायंकाळ पर्यंत पाणी पुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिक वैतागले होते.
एमआयडीसी निवासी रहिवाशांच्या रविवार सुट्टीचा दिवशी टिव्ही, वायफाय असे करमणुकीचे साधने बंद राहिल्याने त्यांचा हिरमोड झाला होता. सायंकाळी पाच वाजता बहुतेक ठिकाणी वीज पुरवठा सुरू झाला. वीज पुरवठा चालू करण्यासाठी महावितरण कर्मचाऱ्यांनी यासाठी जोराचा पाऊस असूनही मेहनत घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *