वाहनांना अपघाताची भीती
ठाणे : आजा पर्वात, डेहणे, वाल्मिकी नगर वरपडी गाव कडे जाणाऱ्या रस्त्याला प्रवास करणाऱ्या प्रवाशी, विद्यार्थी यांना खड्क्यांमुळे जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. पावसाच्या पाण्याने हे खड्डे पूर्णपणे भरल्याने त्यांचा अंदाज येत नसून अपघाताचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. प्रवासी, शाळकरी विद्यार्थी, रुग्ण तसेच नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
डोलखांब विभागातील बहुतांश नागरिक या मार्गाचा वापर करतात. रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खडूचांकडे संबंधित प्रशासनाने पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती न झाल्याने खड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. अनेक वाहनांचे नुकसान होत असून अपघाताची शक्यता कायम निर्माण झाली आहे.
या समस्येचा सर्वाधिक फटका शाळकरी विद्यार्थी, नोकरदार, रुग्णवाहिका सेवा, वयोवृद्ध तसेच हजारो प्रवाशांना बसत आहे. दरवर्षी पावसाळ्यात हीच परिस्थिती निर्माण होत असल्याने तात्पुरत्या डागडुजीऐवजी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
डेहणे रोडच्या समस्या आता नवीन राहिलेली नाही. तांबर दहरड असेल पुढे वाल्मिकी नगर वरपडी दरवर्षी पावसाळ्यात याच ठिकाणी मोठे खड्डे पडतात पावसाळ्यापूर्वीच दुरुस्ती केली असती तर आजची परिस्थिती टळली असती. प्रशासनाने तातडीने खड्डे भरून रस्ता सुरक्षित करावी आणि या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी गुंडे -डेहणे ग्रामपंचायतचे सदस्य राजू लोखंडे यांनी केली आहे.
