ओढे नाले तुडुंब, नद्यांनी धोक्याची पातळी ओलंडली   
कल्याण : कल्याण तालुक्यात गेल्या दोन दिवसापासून पावसाच्या धुवाधार बँटिग मुळे ओढे, नाले, तुडुंब झाले. तर उल्हास, काळू, भातसा या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने सखल भागात पाणी शिरले. कल्याण तालुक्यातील टिटवाळा, खडवली, वाळकस, म्हारळ, वरप,कांबा, रूंदे,नडगाव आदी ग्रामीण परिसरात गत दोन दिवसापासून पावसाचे धुमशान पाहता नाले, ओढे, तुडुंब भरून वाहत होते. तर नद्यांनी देखील धोक्याची पातळी ओलंडल्याने ग्रामीण परिसरातीलसखल भागात पाणी शिरल्याने जन जीवन विस्कळीत झाले.
काळू नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने कल्याण तालुक्यातील रुंदे पूल,भातसानदीवरील वाळकस पूल वाहतूकीसाठी बंद करण्यात आला होता. तर खडवली भातसा नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने जु गावाला पुराचा पाण्याचा वेढा वाढत असल्याने ज्युगावाकडे जाणारा पूल वाहतूकीसाठी बंद करण्यात आला. उल्हासनदीची धोक्याची पातळीपाहता रायते जुना पुल वाहतूकीसाठी बंद करण्यात आला.
बल्याणी ते टिटवाळा रस्ता दरम्यान रस्ता खचल्याने रस्त्यावर मोठे भगदाडपडले, या संदर्भात स्थानिक माजी नगरसेवक यांनी यासंदर्भात प्रशासनानेरस्त्या दुरूस्ती संदर्भात पाठपुरावा करून देखील दुर्लक्ष केले. आता तरीप्रशासनाने लक्ष देऊन संदर्भीत रस्त्याची दुरूस्ती करावी, असे संपर्कसाधला असता सांगितले., तर मोहिली पाणीपुरवठा केंद्र पाण्याखाली गेल्याने केडीएमसी पाणीपुरवठा वितरण व्यवस्थावर यांचा फटका बसल्याने अ, ब, प्रभागासहटिटवाळा, परिसरातील पाणी पुरवठ्यावर परिणाम होणार असल्याचे प्रशासकीय सूत्रांनी सांगितले.
तर जु गावाला पाण्याचा वाढणारा वेढापाहता गावातील गावकरी यांचा अन्न धान्य साठा जीवन आवश्यक वस्तू सुरक्षित ठिकाणीगावकऱ्यांनी हलविले असल्याचे तसेच, पुराच्या पाण्याचा  संभाव्य धोका पाहता, प्रशासनची पथकेघडामोडी पाहता परिस्थितीवर लक्ष ठेवून उपाययोजना करीत असल्याचे कल्याण तहसीलदारविकास गारूडकर यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *