मुंबई : रक्तदान हेच सर्वात श्रेष्ठ दान असून नागरिकांनी रक्तदान जरूर करावे असा सामाजिक संदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार पक्षाच्या मुंबई महिला अध्यक्षा आरतीताई साळवी यांनी अजित दादा पवार यांच्या प्रथम जयंतीनिमित्त गोरेगाव येथील केशव गोरे स्मारक हॉल येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात दिला. त्या पुढे म्हणाल्या रक्तदान हे सर्वात श्रेष्ठदान असून प्रत्येक नागरिकाने किमान सहा महिन्यातून एकदा तरी रक्तदान करावे आणि अनेकांचा जीव वाचवावा. कारण आपण दिलेले रक्त फुकट जात नसून ते रक्त पुन्हा शरीरात २४ तासांमध्ये निर्माण होते. त्यामुळे आपल शरीर देखील तंदुरुस्त राहते त्यामुळे आपण आवर्जून रक्तदान करावे. मी स्वतः रक्तदान करून अजितदादा यांना एक भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली असल्याची माहिती साळवी यांनी यावेळी दिली. या रक्तदान शिबिरांमध्ये महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन मोठ्या संख्येने रक्तदान केले.
आरतीताई साळवी यांचे काम आम्ही अनेक वर्षापासून पाहत आलो आहे. त्यांचे समाजकार्य अतिशय चांगले असून त्यांनी समाजात विविध कार्य करून एक अलौकिक असे आपले स्थान प्राप्त केले आहे. त्यांनी रक्तदानाचा एक उत्सव साजरा केला असून त्यांचे रक्तदानाबाबत जनजागृती फार मोठी आहे त्यामुळे मी त्यांचे मनापासून आभार मानते आणि यापुढे देखील त्यांना रक्तदान शिबिर आयोजित करण्याची ईश्वर प्रेरणा देऊन त्यांच्या हातून चांगले कार्य करून घेईल अशी माहिती भायखळा तालुका अध्यक्षा सुवर्णा हांडे यांनी या कार्यक्रमात दिली. या रक्तदान शिबिरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पूजा पवार, स्नेह कुऱ्हाडे, सीमा कुलकर्णी, ममता ठाकूर, विविध पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विद्यार्थीनि मोठ्या संख्येने उपस्थित होते.
