रमेश औताडे
मुंबई : लोकशाहीमध्ये आंदोलन लहान असो वा मोठे, त्याचे महत्त्व कमी होत नाही. लोकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने आवाज बुलंद करणे हेच खऱ्या लोकशाहीचे बळ आहे. आंदोलन करणारा नेता असो किंवा सामान्य नागरिक, लोकशाहीत प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार आहे आणि आंदोलन हेच लोकशाहीतील सर्वात प्रभावी हत्यार असल्याचे मत आंबेडकरी रिपब्लिकन मोर्च चे राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे यांनी व्यक्त केले.
अभिजीत दिपके यांच्या निवासस्थानी अभिनंदन मार्च लवकरच काढण्यात येणार आहे असे आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा चे संभाजीनगर अध्यक्ष चंद्रकांत सोनवणे यांनी जाहीर केले. मराठवाडा प्रदेश अध्यक्ष बापु सय्यद सलीम, सुनीता धाबडे, प्रा.रमेश दुपारे, यांनी नवयुवकांचे अभिनंदन केले.
लोकशाही व्यवस्थेत जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटितपणे आणि शांततेच्या मार्गाने केलेले आंदोलन नेहमीच परिणामकारक ठरते. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे लोकशाहीवरील विश्वास अधिक दृढ झाल्याचेही बागडे यांनी यावेळी सांगितले.
0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *