
कलाश्रमने स्वतंत्र भारताचा ऐंशीवा वर्धापन दिन साजरा केला. योगायोग म्हणजे ‘मी पाऊस पहिला’ हे ऐंशी पानांचे पुस्तक प्रकाशित होत आहे. ऐंशीव्या पुष्पात निसर्गकवी ना. धों. महानोर कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांना गीतांजली अर्पण केली जाणार. ऐंशीवे प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेता पंकज विष्णू उपस्थित रहाणार.
स्वातंत्र्यसैनिक डॉ. परशुराम पाटील कला केंद्राच्या अंतर्गत ‘कलाश्रम’ ही संस्था गेली नऊ वर्षे ‘अभियान सन्मान’ हा उपक्रम प्रत्येक महिन्याला राबवत असते. दिवंगतांचे स्मरण आणि तसे कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान असे या उपक्रमाचे स्वरूप असते. सोमवार, ३१ ऑगस्ट, दुपारी ३ वाजता, पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, रवींद्र नाट्यमंदिर, तिसरा मजला, लघु नाट्यगृह, प्रभादेवी येथे या उपक्रमाचे ८० वे पुष्प म्हणजे काव्य सादरीकरण नृत्य, गायन, वादन यांना प्राधान्य देणारा कार्यक्रम होणार आहे. स्पर्धक कवी आणि इतर कलाकार असे चाळीस कलाकार आपला रंगमंच अविष्कार येथे घडवणार आहेत. अभिनेते पंकज विष्णू हे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित रहाणार आहेत. विशेष म्हणजे या संस्थेने १५ ऑगस्ट निमित्ताने स्वतंत्र भारताचा ८० वा वर्धापन दिन साजरा केला. परंतु योगायोग म्हणजे या संस्थेचे हे ८० वे पुष्प आहे. यानिमित्ताने ‘मी पाऊस पाहिला’ हा स्पर्धक कवींचा काव्यसंग्रह प्रकाशित होणार आहे. तो सुद्धा ८० पानांचा आहे. शिवाय या उपक्रमात महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल करणाऱ्या प्रज्ञावंतांना प्रत्यक्ष कलाकृती सादर करून आदरांजली वाहिली जाते. याही उपक्रमाचे हे ८०वे पुष्प आहे. निसर्गकवी ना. धों. महानोर आणि कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांचे याच महिन्यातील स्मृतिदिनाचे निमित्त घेऊन त्यांच्या ‘अजंठा’ या चित्रपटातील पाऊस गीतावर ३० कलाकार येऊन गीतांजली अर्पण करणार आहेत. या अभिनव कार्यक्रमाची संकल्पना आणि निर्मिती संस्थेच्या संचालिका नंदिनी पाटील यांची असून
लेखन, दिग्दर्शन संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष नंदकुमार पाटील यांनी केलेले आहे. ‘मी पाऊस पाहिला’ या शिर्षकात हा कार्यक्रम सादर केला जाणार आहे. चित्रपट निर्माते, पर्यावरण तज्ञ, संपादक डॉ. किशोर भोईर यांच्या स्मृतिदिनाचे निमित्त घेऊन ‘मी पाऊस पाहिला’ ही स्पर्धा घेण्यात आली होती. त्या निमित्ताने याच नावाचा काव्यसंग्रह प्रकाशित होणार आहे. हा काव्यसंग्रह निवृत्त पोलीस अधिकारी आणि आदर्श गृहिणी शुभांगी जौंजाळ यांना अर्पण केला जाणार आहे. कार्यक्रमाला डॉ. कामिनीदेवी देसाई यांचे मार्गदर्शन लाभलेले आहे. या रंगारंग कार्यक्रमात चंचल कांबळे, पूजा मंत्री, खुशी जाधव यांची नृत्य अदा पाहायला मिळणार आहे. रविकिरण पाटील, प्रीतम शिंगे, ज्ञानेश्वर भगत, संजना जाधव, मंजुषा साष्टे यांचा स्वरसाज प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणार आहे. या संपूर्ण कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी ज्योती शिंदे, सविता जाधव, प्रिया राजपूरकर, सावित्री कदम यांच्यावर सोपवलेली आहे. अमित सोळंकी हे संगीत समन्वयक तर रोहन वानखेडे यांची प्रकाशयोजना या कार्यक्रमाला लाभलेली आहे. पुस्तक प्रकाशन आणि ‘ते आज काव्य झाले’ ‘मी पाऊस पहिला’ या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ येथे होणार आहे. हा कार्यक्रम विनामूल्य आहे.
००००००
