ठाणे ः सध्या उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे आणि अधिक उष्णतेमुळे रक्तदान शिबिरांचे आयोजन होत नाही. त्यामुळे रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. रुग्णालयांतून ऑपरेशन्स, थॅलेसेमिया, डायलिसिस आणि गंभीर आजारांसाठी सातत्याने रक्ताची मागणी होत आहे. त्यामुळे सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत कै. वामनराव ओक रक्तकेंद्र, विष्णुनगर, नौपाडा, ठाणे (प.) येथे येऊन रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. रक्तदात्यांनी पुढाकार घेऊन सहभाग घ्यावा, असे आवाहन संस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *