नागरिकांमध्ये प्रचंड संताप आणि तणाव
मुंबई : मरोळ ते साकीनाका भागातील कृष्णलाल मारवाह रोडलगतच्या पिकनिक पुलाचे बांधकाम गेली ६ वर्षे रखडले असून त्याची दखल कुणीच घेत नसल्यामुळे स्थानिकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, याबाबत स्थानिक राजकीय कार्यकर्त्यांमध्येही काम न होण्यावरून आपापसात भांडणे तसेच तणाव अनुभवयाला मिळत आहे.
यासंदर्भात स्थानिक नागरिकांनी एक मोर्चा काढून मुंबई महानगरपालिका व त्यांनी नियुक्त केलेल्या कंत्राटाराच्या विरोधात उत्सफूर्त मोर्चा काढला. त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. त्याचबरोबर नागरिकांनी या पिकनिक पूलाचे काम लवकरात लवकर झाले नाही तर मात्र आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.
