मुंबई : नुकत्याच राजस्थान मधील उदयपुर शहरात झालेल्या फिडे रेटिंग लेकसिटी ओपन बुध्दिबळ स्पर्धेत विरारच्या मटिक अकादमी शाळेत नवव्या इयत्तेत शिकणाऱ्या एलेश त्रिपाठी याने शानदार कामगिरी करताना खुल्या गटात आठवा क्रमांक मिळवला. त्याने अपराजित राहताना ९ पैकी ७.५ गुण मिळविले. त्याने ६ लढती जिंकल्या .तर ३ सामने बरोबरीत सोडवले.रेटिंग श्रेणीत त्याचा दुसरा क्रमांक लागला.त्याला ६१ हजार रुपये रोख आणि आर्कषक चषक भेट देण्यात आला. भारतातील ५५ ० पेक्षा जास्त बुध्दिबळपटू या स्पर्धेत सहभागी झाले होते. प्रसाद घाटे एलेशचे प्रशिक्षक आहेत. तसेच अर्पित पांडे यांचे देखील मोलाचे मार्गदर्शन एलेशला मिळत आहे. गेल्या पाच वर्षांपेक्षा जास्त काळ तो बुध्दिबळ खेळत आहे.तामिळनाडू येथे झालेल्या १५ वर्षाखालील राष्ट्रीय बुध्दिबळ स्पर्धेसाठी त्याची महाराष्ट्र संघात निवड झाली होती. उदयपुर स्पर्धेतील एलेशच्या सुरेख कामगिरी बदल शाळेच्या मुख्याधापीका सीमा बहल यांनी त्याचे खास अभिनंदन केले आहे.
