आधुनिक युगात योगशास्त्राचा मोठ्या प्रमाणावर प्रचार व प्रसार झालेला आपल्याला पहायला मिळतो. लोकांना आपल्या शरीराची मर्यादा ओलांडून आसन करण्याचा व सोशल मीडियावर त्याचे फोटो पोस्ट करण्याचा मोह आवरत नाही; परंतु ‘योगाभ्यास’ हा आसनापुरताच मर्यादित नसून त्याचा व्यासंग मोठा आहे. यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी याप्रमाणे शून्यापासून अनंतापर्यंत एकरुपता साधणारा अष्टांग योग हा जीवनाचा मार्ग आहे.
योगासनं शरीरासोबत मानसिक व कार्मिक पातळीवर समतोल साधण्यासाठी साह्य करतात. आसन केल्याने आपल्याला स्थिरता, लवचिकता व सर्व अवयव व रक्तवाहिन्यांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते व प्राणायामामुळे श्वासावर नियंत्रण राहते. मन शांत व एकाग्र होण्यास मदत होते. सोबत मनातील मल ( विपर्याय, विकल्प,अविद्या,अस्मिता(मी पणा), राग, द्वेष, अभिनिवेश( देहबुद्धी), संशय, आळस काढून टाकण्यास प्रत्याहार,धारणा, ध्यानामुळे साध्य होते.यम नियमाच्या अभ्यासामुळे सामाजिक व वैयक्तिक पातळीवर आपले आचरण चांगले ठेवता येते. आपल्या जगण्यात अर्थपूर्णता आणण्यास मदत होते ती कर्मयोगाची. अर्थात व्यक्तीचा शारीरिक, मानसिक, कार्मिक दृष्ट्या विकास घडवण्याचे सामर्थ्य व आधुनिक समस्यांचे उत्तर योगसाधनेत आहे. त्यामुळे प्रत्येकाने आयुष्य सुखकर करण्यासाठी योगाभ्यास सर्व अंगांना समजून घेणं गरजेचं आहे.

लीना पातले
योग प्रशिक्षक, क्रीडा शिक्षिका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *