Author: bittambatami.com

आरटीई प्रवेशासाठी १५ हजार ४३० अर्ज, ३१ मेपर्यंत मुदत – बाळासाहेब राक्षे

ठाणे जिल्ह्यातील ६४२ शाळांत ११ हजार ३७७ जागा अनिल ठाणेकर ठाणे : आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रीया ऑनलाईन पद्धतीने दिनांक १७ मे पासून सुरु करण्यात आलेली आहे. आरटीई प्रवेशासाठी ३१ मेपर्यंत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून ठाणे जिल्ह्यात २९ मेपर्यंत ११ हजार ३७७ जागासाठी १५ हजार ४३० अर्ज प्राप्त झाले आहेत. सन २०२४-२५ या वर्षासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन शिक्षणाधिकारी प्राथमिक बाळासाहेब राक्षे यांनी केले आहे. प्रवेश प्रक्रीयेच्या कामकाजासाठी गठित केलेल्या पडताळणी समितीने प्रवेश पात्र बालकांचे प्रवेशाकरिता आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची पडताळणी करण्यात येणार असल्याने पडताळणी समितीस पुरेसा वेळ देणे आवश्यक असल्याने ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याची अंतिम दिनांक ३१ मेपर्यंत असून पालकांनी मुदतीत अर्ज भरणे आवश्यक आहे. ३१ मे नंतर मुदतवाढ देण्यात येणार नाही. सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाकरिता आरटीई २५% ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेंतर्गत सर्व पंचायत समिती व महानगर पालिका मध्ये एकूण ६४२ पात्र शाळा असून एकूण ११ हजार ३७७ रिक्त जागा उपलब्ध आहेत. तरी पालकांना ऑनलाईन प्रवेश अर्ज मुदतीपूर्वी भरण्याची काळजी घ्यावी व पालकांनी आरटीई पोर्टलवर सूचनांचे वेळोवेळी अवलोकन करावे असे आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथमिक) बाळासाहेब राक्षे यांनी केले आहे.

सोने-चांदी महागल्याने कांचीपूरम साड्याही महागल्या

दिवसेंदिवस सोन्या चांदीच्या दरात मोठी वाढ होत आहे. वाढत्या सोन्या-चांदीच्या दराचा मोठा फटका ग्राहकांना बसत आहे. सोन्या चांदीच्या वाढत्या किमतींमुळे जगभरात ब्रोकेड वर्कसाठी प्रसिद्ध असलेल्या कांचीपूरमच्या सिल्क साड्या महागल्या आहेत.…

निष्काळजीपणा आणि बेपर्वाईमुळेच दुर्घटनांची मालिका

विशेष श्याम ठाणेदार मागील आठवडा हा महाराष्ट्रासाठीच नव्हे तर देशासाठी घातक ठरला कारण या आठवड्यात एका पाठोपाठ एक अशा अनेक दुर्घटना घडल्या आणि त्यात मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली.…

आश्वासनांचा पाऊस आणि रोजगाराचा चिखल

पैलू शिवाजी कराळे मनमोहन सिंग पंतप्रधान तसेच नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान झाल्यानंतर दर वर्षी एक-दोन कोटी लोकांना रोजगार देण्याचे जाहीर केले; परंतु दोघांनाही ते जमले नाही. आता राहुल गांधी केंद्र…

शरद पवारांनी बोध घेणे गरजेचे…

२ जुलै २०२३ रोजी अजित पवारांनी आपले काका आणि महाराष्ट्रातील जाणते नेते शरद पवार यांना जाहीर सोडचिठ्ठी दिली. तेव्हापासून काका आणि पुतण्या एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करीत आहेत. त्यातील एक महत्त्वाचा…

भाजपला अडचणीत आणणाऱ्या राणे बंधूना आवरा-आनंद परांजपे

अनिल ठाणेकर ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आपली भूमिका पक्षाच्या बैठकीत मांडली आहे. असे असताना भुजबळसाहेबांबद्दल निलेश राणे यांचे ट्विट करणे चुकीचे आहे. खरतर निलेश राणे…

‘एपीएमसी’त जुन्नर हापूसचा हंगाम

नवी मुंबई : वाशीतील मुंबई कृषी उत्पन्न फळ बाजारात मेअखेर कोकणातील हापूसचा हंगाम संपताच जुन्नर आंबा हंगामाला सुरुवात होते. बाजारात सध्या ३ ते ४ गाड्या दाखल होत आहेत. प्रतिडझन जुन्नर आंब्याला ५०० ते ९०० रुपये…

म्हाडाच्या अतिधोकादायक इमारतींच्या यादीची प्रतीक्षा

मुंबई : पावसाळ्याच्या आधी दक्षिण मुंबईतील उपकरप्राप्त इमारतींचे सर्वेक्षण करत मे महिन्याच्या मध्यावर अतिधोकादायक इमारतींची यादी जाहिर करणे म्हाडाच्या मुंबई इमारत दुरूस्ती आणि पुनर्रचना मंडळाला क्रमप्राप्त असते. त्यानुसार दरवर्षी मे महिन्याच्या मध्यमावर ही यादी जाहिर…