ई -रिक्षामुळे माथेरानच्या पर्यटनात क्रांती घडणार का?
माथेरान : माथेरान मध्ये ई-रिक्षा सुरू झाल्यानंतर दळणवळणाचे एक नवीन पर्व सुरू होणार आहे या ई रिक्षांमुळे हात रिक्षा या कालबाह्य होणार असून हात रिक्षा ओडणाऱ्यांना एक सन्मानजनक व्यवसाय मिळणार…
माथेरान : माथेरान मध्ये ई-रिक्षा सुरू झाल्यानंतर दळणवळणाचे एक नवीन पर्व सुरू होणार आहे या ई रिक्षांमुळे हात रिक्षा या कालबाह्य होणार असून हात रिक्षा ओडणाऱ्यांना एक सन्मानजनक व्यवसाय मिळणार…
ठाणे : जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत शहापूर तालुक्यातील पाणीटंचाई बाबत जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद ठाणे छायादेवी शिसोदे यांच्या उपस्थितीत शहापूर पंचायत समिती सभागृहात पाणीटंचाई बाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हाधिकारी यांनी 31 मार्च 2024 पर्यंत टँकर ग्रस्त असलेल्या एकूण ९१ गाव पाड्याची माहिती घेतली. पुढील महिन्यात पाणी संबंधित येणाऱ्या समस्या त्यावर उपाययोजना करण्यासाठी पुढाकार घ्यावा अशा सुचना दिल्या. तसेच ग्रामीण भागातील ग्रामस्थांच्या जगण्यासाठी पाणी आवश्यक आहे त्यामुळे कोणताही ग्रामस्थ पाण्यावाचून राहता नये. ज्या गावात पाणी पातळी कमी होऊन पाणी टंचाई आढळून येण्याची शक्यता आहे त्या गाव पाड्यासाठी पंधरा दिवस आधी प्रस्ताव सादर करून एक दिवस आधीच टॅंकरने पाणी पुरवठा करण्यात यावा असे सांगितले. गावातील लोकसंख्या, गावातील हातपंप संख्या, विहीरीची संख्या आणि पाण्याच्या इतर पर्याय तपासून पुढील पंधरा दिवसांत शहापूर तालुक्यातील पाणी पुरवठा संदर्भात नियोजन करण्यात यावे अशा सुचना जिल्हाधिकारी यांनी उपस्थित सर्व ग्रामसेवकांना सांगितले. शहापूर तालुक्यात स्वच्छता प्रश्न महत्त्वाचा आहे. कचऱ्याची विल्हेवाट वेळोवेळी लावणे गरजेचे आहे. ओला कचरा व सुका कचरा वेगवेगळा करून विल्हेवाट लावण्यासाठी नियोजन करण्यात यावे. तसेच कचरा उचलला गेल्यानंतर व आधी असे फोटो काढून फोटो संकलन करण्यात आले पाहिजे. तसेच ग्रामसेवकांनी ज्या ठिकाणी ग्रामस्थ किंवा इतर कोणी कचरा टाकत असेल तर त्याच्यावर कारवाई करण्यात यावी असे यावेळी मार्गदर्शन करताना मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे यांनी सांगितले. यावेळी उपविभागीय अधिकारी भिवंडी अमित सानप, कार्यकारी अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मंडळ ठाणे तन्मय कांबळे, कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा विभाग प्रदीप कुलकर्णी, गटविकास अधिकारी पंचायत समिती शहापूर भास्कर रेंगडे, उप अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग पंचायत समिती शहापूर विकास जाधव, स्वच्छ भारत मिशन पंडित राठोड, तसेच पाणीपुरवठा व जलसंपदा विभागातील सर्व अभियंता शहापूर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक, शहापूर पंचायत समितीचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
अमेरिकेतील बाल्टिमोरच्या की ब्रिज परिसरात कंटेनर जहाजाची टक्कर झाल्यानंतर पूल पत्त्याच्या डेकसारखा कोसळला. पूल कोसळल्याचा व्हिडीओ ‘सोशल मीडिया’वर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. व्हिडिओमध्ये एक मोठे कंटेनर जहाज पुलाच्या खांबाला आदळताना…
ऐन युद्धाची सुरुवात होत असताना महापराक्रमी, महावीर अर्जुन त्याचे प्रख्यात गांडीव धनुष्य खाली टाकून श्री कृष्णापुढे उभा राहिला आणि म्हणाला की, “हे जगन्नियंत्या, मला जिकडे तिकडे माझी भावंडे, काका मामा…
विशेष श्याम ठाणेदार आज १ एप्रिल आजचा दिवस संपूर्ण दिवस जगात एप्रिल फुल म्हणून साजरा केला जातो. फुल ( fool ) म्हणजे मूर्ख. या दिवशी लोक एकमेकांना मूर्ख बनवतात. आपणही…
प्रासंगिक स्वाती पेशवे जगण्यातील ताणतणाव ही काही आजची गोष्ट नाही. तणावांमागील कारणे वेगळी असली तरी त्याने कधीच माणसाची साथ सोडलेली नाही, हेही खरेच. त्याच्या प्रभावाखाली जगणारा समाज कधी कधी निखळ…
अखेर प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी केली घोषणा मुंबई :बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार म्हणून सौ. सुनेत्रा अजित पवार यांच्या नावाची घोषणा प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी पत्रकार परिषदेत केली. महायुतीच्या माध्यमातून या अगोदरच रायगड मतदारसंघातून सुनिल तटकरे तर शिरुर मतदारसंघातून शिवाजीराव आढळराव पाटील या दोन उमेदवारांची अजितदादा पवार यांनी घोषणा केली होती. आणि आज प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी राष्ट्रवादीच्या कोट्यातील परभणी मतदारसंघात रासपचे महादेव जानकर यांची उमेदवारी तर त्यानंतर बारामती लोकसभा मतदारसंघातून सौ. सुनेत्रा अजित पवार यांच्या उमेदवारीची घोषणा केली. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून परभणी लोकसभेची जागा राष्ट्रीय समाज पक्षाला (रासप) देण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला असल्याची माहितीसुद्धा सुनिल तटकरे यांनी दिली. राष्ट्रीय समाज पक्षाला जागा देताना महायुतीचे उमेदवार म्हणून महादेव जानकर हे निवडणूक लढवणार असून त्यांनी महाराष्ट्रात धनगर समाजाची एक चळवळ, आरक्षणाचा लढा उभा केला आहे. त्यांचे योगदान समाजासाठी मोठया प्रमाणात असल्यानेच परभणीची उमेदवारी घोषित करत असून अतिशय चांगल्या फरकाने ते विजयी होतील असा विश्वास सुनिल तटकरे यांनी यावेळी व्यक्त केला. हा निर्णय घेताना परभणी जिल्हयातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली आहे. राजेश विटेकर, बाबाजानी दुर्रानी, प्रतापराव देशमुख यांच्यासोबत राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांची प्रदीर्घ चर्चा केली आहे. त्या चर्चेनंतर आज महादेव जानकर हे महायुतीचे उमेदवार असतील अशी घोषणाही सुनिल तटकरे यांनी केली. राजेश विटेकर हे अतिशय चांगले पदाधिकारी आहेत. मागील निवडणुकीत त्यांचा थोडाशा फरकाने पराभव झाला आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणूनही त्यांनी उत्तम काम केले आहे. त्यामुळे त्यांच्यामार्फत एका तरुण कार्यकर्त्याला सन्मानपूर्वक योग्य ती संधी देण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्लमेंटरी बोर्ड नक्की घेणार आहे अशी माहितीही सुनिल तटकरे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना सांगितले. या पत्रकार परिषदेला रासपचे नेते महादेव जानकर, क्रीडामंत्री संजय बनसोडे, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे आदी उपस्थित होते.
स्थानिकांची मागणी माथेरान : श्रमिक हातरीक्षा चालकांच्या ताब्यात ई रिक्षा द्याव्यात असे सुप्रीम कोर्टाने निर्देश दिलेले असताना देखील सनियंत्रण समितीच्या हेकेखोर वृत्तीमुळेच सध्या पायलट प्रोजेक्टवर केवळ ठेकेदाराला पोसण्यासाठी या समितीने ई रिक्षाचा ठेका दिलेला असून दस्तुरी ते माथेरान रेल्वे स्टेशन दरम्यान प्रति माणसी ३५ रुपये दर आकारण्यात येत आहे.सहा ते सात मिनिटांत हे अडीच किलोमीटर अंतर ई रिक्षाच्या प्रवासासाठी लागते.तर शालेय विद्यार्थ्यांना शाळेत ने आण करण्यासाठी फक्त पाच रुपये इतका माफक दर ठेवण्यात आला आहे. विशेष म्हणजे काही महिने येथील शासकीय अधिकारी कर्मचारी वर्गाला दस्तुरी माथेरान दस्तुरी या प्रवासासाठी दर दिवसाला केवळ पाच रुपयांत मासिक पास देण्यात आले होते. ज्यांना लाख रुपये मासिक पगार मिळतो अशा शासकीय अधिकारी वर्गाला ही सवलत देण्यात आल्यामुळे अनेकदा ३५ रुपये दर भरणाऱ्या प्रवाशांना ताटकळत उभे राहावे लागत होते. परंतु या शासकीय अधिकारी वर्गाला नागरिकांच्या तक्रारी वरून या सुविधे पासून बंद करण्यात आले आहे.ज्या ज्या शासकीय कर्मचाऱ्यांना इथे शासकीय खोल्या उपलब्ध आहेत अशी मंडळी सुध्दा नेरळ अथवा कर्जत याठिकाणी राहून ई रिक्षाच्या साहाय्याने नोकरीसाठी येतात. तर येथील निमशासकीय कर्मचारी सुध्दा आपल्या स्वतःच्या खोल्या असताना माथेरान परीसरात वास्तव्यास आहेत.काही दिवसांनी जवळपास वीस नवीन ई रिक्षांची सेवा उपलब्ध होणार आहे. यासाठी आरटीओ ने या ई रिक्षाचे परवडणारे दर निश्चित केल्यास सर्वाना सोयीस्कर होऊ शकते अशी मागणी जोर धरू लागली आहे.
माथेरान : खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांचे मावळ लोकसभा मतदार संघात उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पहिल्यांदाच कर्जतमध्ये शिवसेनेच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आले. कर्जत – खालापूर मतदारसंघात आमदार महेंद्र थोरवे साहेब यांच्या नेतृत्वात श्रीरंग आप्पा बारणे यांना बहुसंख्य मताने निवडून देण्यास शिवसैनिक सज्ज आहेत. सलग दोनदा खासदारकीचा प्रदीर्घ अनुभव पाठिशी असणारे आणि पाच वेळा संसदरत्न पुरस्कार प्राप्त झालेले एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेले बारणे यांनी मागील लोकसभा निवडणुकीत जवळपास दोन लाखांपेक्षा अधिक मतांनी विजय संपादन केला होता. याही वेळेस त्यांना विकास कामाच्या जोरावर आणि समस्त शिवसैनिकांच्या बळावर पुन्हा एकदा विजयश्री मिळवून देण्यासाठी कर्जत खालापूर मतदार संघातील शिवसैनिक सज्ज झाले असून श्रीरंग बारणे कर्जतमध्ये आले असता त्यांचे शिवसेनेच्यावतीने जोरदार स्वागत करण्यात आले. बाळासाहेब भवन येथे आयोजित छोटेखानी कार्यक्रमाच्या सुरुवातीला महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी औक्षण केल्यावर जिल्हाप्रमुख संतोष भोईर यांनी बारणे यांना हॅट्रिक करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. यावेळी शिवसैनिक मोठया संख्येने उपस्थित होते.