Author: bittambatami.com

उन्हाळी सुट्टीसाठी मुंबईकरांची लालपरीला पसंती

मुंबई : उन्हाळी सुटीच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने जादा वाहतुकीचे नियोजन केले आहे. त्यानुसार उन्हाळी सुट्ट्यांच्या कालावधीत मुंबई विभागातील मुंबई सेंट्रल, परळ, कुर्ला, पनवेल, उरण या आगारांतून सरासरी ५० हजार प्रवाशांनी प्रवास केला आहे. उन्हाळी सुटीच्या दिवसांत गावाकडे जाण्यासाठी बस स्टँडवरील प्रवाशांची वाढणारी संख्या लक्षात घेता एसटी महामंडळाने यंदाही जादा फेऱ्यांचे नियोजन केले आहे. त्यानुसार अतिरिक्त बसच्या संगणकीय आरक्षणाला सुरुवात झाली असून मुंबई विभागात दिवसाला सरासरी ४४ हजार प्रवाशांची नोंदणी होत होती. मात्र, गेल्या दोन दिवसांत हा आकडा ५० हजारांच्या घरात गेला आहे. त्यात १३ एप्रिल रोजी ४८ हजार, तर १४ एप्रिल रोजी ५० हजार प्रवाशांनी एसटीने प्रवास केला आहे. त्यात ७५ वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या प्रवाशांना मोफत प्रवास, ६५ ते ७४ वय असणाऱ्या ज्येष्ठांना प्रवाशांना ५० टक्के सवलत आणि महिलांसाठी ५० टक्के सवलतीमुळे ही संख्या वाढल्याची माहिती एसटी विभागाकडून देण्यात आली आहे.

माजिवडा येथील अनधिकृत बांधकामांवर कारवाई

ठाणे : माजिवडा मानपाडा प्रभाग समिती कार्यक्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर आज महापालिकेने कारवाई केली. महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार अतिक्रमण विभागाच्या वतीने करण्यात आली. या कारवाईत मोघरपाडा, तलावाच्या शेजारी सुनिल सिंग (बांधकामधारक) यांचे चालु असलेले तळ + २ मजली आर.सी.सी. इमारतीचे बांधकाम निष्कसनाची कारवाई करण्यात आली.  इमारतीचे दुसऱ्या मजल्यावरील स्लॅबचे बांधकाम गॅस कटर व ट्रक्टर ब्रेकरच्या सहाय्याने तोडण्यात आले. शहरात होणाऱ्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरूच ठेवण्याचे निर्देश आयुक्तांनी संबंधित विभागाला दिले आहेत.

विद्यार्थ्यांची रॅलीव्दारे नवी मुंबईत मतदानाविषयी जनजागृती

नवी मुंबई : सार्वत्रिक लोकसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा याकरिता 150 – ऐरोली विधानसभा मतदारसंघ कार्यालय व 151 – बेलापूर विधानसभा मतदारसंघ कार्यालय यांच्यामार्फत मोठ्या प्रमाणात ‘स्वीप’ कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत विविध शाळा, महाविद्यालये यामध्येही मतदानविषयक जनजागृती करणारे वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमांमध्ये महानगरपालिकेच्या शाळांसह खाजगी शाळा, महाविद्यालये यांच्या विद्यार्थ्यांचा सहभाग घेतला जात आहे. अनेक नागरिकांपर्यंत एकाच वेळी पोहचणारा रॅलीसारखा उपक्रम मोठ्या प्रमाणावर राबविला जात जात असून शाळांमार्फत आपापल्या शालेय परिसरात प्रभातफेरी काढली जात आहे. ‘लोकशाहीचा बाळगू अभिमान – चला करुया हक्काचे मतदान’, ‘मी मतदान करणार – आपल्या देशाचे भविष्य घडवणार’ अशा स्वरुपाच्या घोषणा देत मतदान विषयक संदेश देणारे फलक उंचावत विद्यार्थी अत्यंत उत्साहाने रॅलीत सहभागी होत असून मतदानाचे महत्त्व पटवून देत आहेत. तसेच मतदान करण्याविषयी आवाहन करीत आहेत. 150 व 151 या दोन्ही विधानसभा मतदारसंघ निवडणूक कार्यालयामार्फत राबविण्यात येणा-या 25 ठाणे लोकसभा निवडणूकीच्या स्वीप कार्यक्रमात महापलिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शानानुसार नवी मुंबई महानगरपालिकेच्या सर्व 80 शाळांचा संपूर्ण सहभाग लाभला असून महानगरपालिकेच्या शिक्षण विभागामार्फत खाजगी शाळांनीही यामध्ये सहभागी होण्याकरिता कार्यवाही करण्यात आलेली आहे. खाजगी शाळा, महाविद्यालयांचाही यामध्ये उत्तम सहभाग लाभत आहे. 20 मे रोजी होणा-या ठाणे लोकसभा निवडणूकीत मतदानांची टक्केवारी वाढण्यासाठी सर्वत्र व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे.

 महाविकास आघाडीच्या उमेदवार दरेकर यांच्या सारथी बनल्या सुलभा गायकवाड

डोंबिवली – शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आले आहेत. अंबरनाथ तालुक्यातील गोरपे गावात ते उमेदवार वैशाली दरेकर यांच्यासोबत उपस्थित झाले असता गावात त्यांचे जंगी स्वागत झाले. यावेळी राऊत व दरेकर यांच्या गाडीच्या फ्रंट सीटवर बसलेल्या भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांनी सर्वांचेच लक्ष वेधले. ठाकरे गटाच्या उमेदवार दरेकर यांच्या प्रचारासाठी गायकवाड यांनी कंबर कसली आहे का ? त्या त्यांच्या सारथी झाल्या आहेत का? अशी एकच चर्चा आता रंगू लागली आहे. अंबरनाथ तालुक्यातील गोरपे गावात एका कार्यक्रमानिमित्त शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत मंगळवारी आले होते. तत्पूर्वी नेवाळी नाका येथे उमेदवार वैशाली दरेकर, शिवसेना उपनेते अल्ताफ शेख, कल्याण शहर प्रमुख शरद पाटील, हर्षवर्धन पाटील यांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी यांच्या वतीने राऊत यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. त्यानंतर कल्याण ग्रामीण मधील गोरपे गावात देखील जेसीबीच्या सहाय्याने फुलांची उधळण करत त्यांचे स्वागत करण्यात आहे. यावेळी राऊत यांच्या गाडीच्या फ्रंट सीटवर बसलेल्या महायुतीतील कल्याण पूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड या उपस्थित होत्या. त्यांनी साऱ्यांचेच लक्ष वेधले. याआधी देखील कल्याण मधील नववर्ष स्वागत यात्रेत वैशाली दरेकर यांची भेट घेत सुलभा यांनी त्यांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानंतर आता चक्क दरेकर यांच्या प्रचारातच सुलभा गायकवाड त्यांच्या सोबत दिसल्याने गायकवाड यांनी दरेकर यांच्या सारथी झाल्याचे पहायला मिळाले. यामुळे महायुती उमेदवाराच्या विरोधात असलेल्या उबाठा च्या वैशाली दरेकर यांच्या प्रचारासाठी गायकवाड यांनी कंबर कसली आहे का? अशी ही चर्चा सुरू झाली आहे.दरम्यान नेवाळी नाका येथे नेते संजय राऊत यांना प्रसार माध्यमांनी संवाद साधला… राऊत यांनी दोनच दिवसापूर्वी श्रीकांत शिंदे फाऊंडेशनमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता. काही लोकांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. त्यांना उपचाराची गरज आहे. उपचाराचा खर्च आम्ही देणार असा खासदार शिंदे यांनी पलटवार केला होता. त्यांच्या या टिकेला राऊत यांनी प्रतिउत्तर दिले आहे.

आपटा ग्रामपंचायतीच्या सरपंचाविरोधात अविश्वास ठराव मंजूर

पनवेल : पनवेल तालुक्यातील व उरण विधानसभा मतदारसंघातील आपटा ग्रामपंचायतीच्या उद्धव ठाकरे गटाच्या सरपंच नाजनिन खलील पटेल यांच्या विरोधातील अविश्वास ठराव मंजूर झाला आहे. सरपंच नाजनिन पटेल यांच्या विरोधात १० मते, तर बाजूने केवळ तीन मते पडली. गेली अनेक वर्षे आपटा ग्रामपंचायतीवर शेकाप व अलिकडे काही वर्षे ठाकरे गट पर्यायाने महाविकास आघाडीचे वर्चस्व राहिले आहे, पण आता ही ग्रामपंचायत भारतीय जनता पक्षाच्या बाजूने झाली आहे. सरपंचाविरोधातील अविश्वास ठरावावर घेण्यात आलेल्या मतदानावेळी अप्पर तहसीलदार इंगळे, मंडल अधिकारी कारेगावकर, ग्रामविकास अधिकारी गणेश गायकर तसेच रसायनी पोलीस अधिकारी, पोलीस पाटील उपस्थित होते. त्याचप्रमाणे भाजप नेते, माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर घरत, भाजप केळवणे विभागीय अध्यक्ष मंगेश वाकडीकर, राजू पाटील, विद्याधर जोशी, प्रवीण काळबागे, दत्ता पाटील, अॅड. निलेश हातमोडे, अॅड. आकाश, ज्ञानेश्वर भोईर, दर्शन भोईर, लक्ष्मण बावधने, राजा देशमुख यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते. नाजनिन खलील पटेल यांच्या मनमानी कारभाराविरोधात ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांमध्ये नाराजी होती, याची दबक्या आवाजात पण मोठी चर्चा होती.  त्यामुळे अविश्वास ठराव मांडण्यात आला आणि त्यामध्ये नाजनिन पटेल विश्वास प्राप्त करू शकल्या नाहीत आणि अखेर त्यांच्यावर सरपंच पदावरून पाय उतार होण्याची नामुष्की आली.

भिवंडी लोकसभा मतदारसंघात एक खिडकी योजना कार्यान्वित

निवडणूक प्रचारासंदर्भातील परवान्यांसाठी ठाणे  – लोकसभा निवडणूक प्रचारासाठी सर्व प्रकारच्या परवाने घेण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी व सहा विधानसभा मतदार संघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात एक खिडकी योजना कार्यान्वित…

कामगार, अधिकारी, कर्मचाऱ्यांना मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी

ठाणे  : राज्यातील लोकसभा मतदारसंघात पाच टप्प्यात मतदान होणार आहे. या लोकसभा निवडणुकीत कामगार, अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी मिळणार आहे. तसेच निवडणुकीच्या कामासाठी नियुक्त…

जनसेवा रुग्णवाहिचे आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते लोकार्पण

राजीव चंदने मुरबाड : भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यंच्या 133 व्या जयंती दिनाचे औचित्य साधून अन्याय अत्याचार निर्मूलन समितीचे राज्य सरचिटणीस अण्णा साळवे यांनी गोर गरीब जनतेच्या सेवेसाठी  रुग्णवाहीका देऊन, त्या जनसेवा रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा आमदार किसन कथोरे यांच्या शुभहस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ करण्यात आला.यावेळी आमदार किसन कथोरे यांनी अण्णा साळवे यांचे विशेष कौतुक करत पाठीवर शाबासकीची थाप मारली. यावेळी आमदार कथोरे म्हणाले कि,मी अण्णाच्या मागे नाही तर अण्णा कायम सोबत आणि बरोबर आहे. या रुग्ण वाहिकेचा सर्व सामान्य गोर गरीब जनतेसाठी उपयोग झाला पहिजे असे बोलून अण्णा साळवे यांना आशीर्वाद देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या लोकार्पण सोहळ्यासाठी नगराध्यक्ष मुकेश विशे, सरचिटणीस नितीन मोहपे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुरेश बांगर, नगरपंचायत मुख्याधिकारी मनोज म्हसे, मोहन सासे,कांतीलाल कंटे,रवींद्र चंदने,रिपई प्रदेश उपाध्यक्ष महबूब पैठणकर, मुरबाड पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर,दीपक पवार, ऍड सचिन चौधरी, गुरुनाथ पवार, सुवर्णा देसले,दीपक खाटेघरे,कैलास देसले,शिवराम पवार, प्रकाश जाधव,नरेश देसले,नरेश मोरे, धनंजय थोरात, रवींद्र गायकवाड,यांच्या सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.या शुभ प्रसंगी सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांना समता सामाजिक फाऊंडेशनचे शंकर करडे, संजय बोरगे, लक्ष्मण पवार, दिलीप पवार, सुभाष जाधव यांच्या वतीने पेढे व पेन चे वाटप करण्यात आले.

इंग्लंड-आशिया इनडोअर क्रिकेट स्पर्धा

भारतीय पुरुष संघाला पराभवाचा धक्का कोलंबो : जागतिक इनडोअर क्रिकेट महासंघाच्या मान्यतेने सिलोन इनडोअर क्रिकेट असोशिएशन यांच्या पुढाकाराने इंग्लंड-एशिया कप इनडोअर क्रिकेट स्पर्धेत रंगत भरली जात असून काल भारतीय संघाला इंग्लंडकडून पराभवाचा धक्का सहन करावा लागला व भारत (२०.५ गुण) गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर फेकला गेला तर श्रीलंका (३५.५ गुण) व इंग्लंड (२१ गुण) अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या स्थानावर आहेत. या स्पर्धेत भारताला अजून एक सामना सिंगापूर विरुध्द खेळायचा असल्याने भारत अंतिम सामन्यात खेळताना दिसेल. इतर सर्व संघाचे साखळी सामने झाले असल्याने व त्यांना गुण वाढवण्याची कोणतीही संधी नाही. गुणतालीकेतील पहिले दोन संघ अंतिम सामना खेळातील. काल झालेल्या इंग्लंड विरुध्दच्या सामन्यात भारताचे खेळाडू प्रचंड दबावाखाली खेळताना दिसले. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना १६ षटकात ७५ धावा केल्या तर प्रती उत्तरादाखल…

मेट्रो १ ची दिवाळखोरी अखेर टळली

एमएमआरडीए फेडणार कर्जाची रक्कम मुंबई : वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रो १ मार्गिकेचे संचालन करणाऱ्या मुंबईमे ट्रो वन प्रायव्हेट लिमिटेड (एमएमओपीएल) कंपनी दिवाळखोरीत निघण्यापासून बचावली आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) या मार्गिकेचे कर्ज फेडणार असल्याची हमी दिल्याने आता या मेट्रो मार्गिकेच्या थकित कर्जप्रकरणी बँकांनी सुरू केलेल्या दिवाळखोरीच्या प्रक्रियेची याचिका राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणाने निकाली काढली आहे. त्यामुळे आता मेट्रो १ मार्गिका खरेदीचा एमएमआरडीएचा मार्ग माेकळा झाला आहे. मेट्रो १ मार्गिकेची खासगी-सार्वजनिक भागीदारी पद्धतीने बांधा-वापरा स्वामित्व घ्या आणि हस्तांतरित करा या तत्त्वावर उभारली होती. या मेट्रो मार्गिकेवरून जून २०१४ मध्ये प्रवाशांची वाहतूक सुरू झाली. मेट्रो १ प्रकल्पाच्या उभारणीसाठी २ हजार ३५६ कोटी रुपयांचा खर्च आला असून, त्यात रिलायन्स इन्फ्राची ७४ टक्के, तर एमएमआरडीएची २६ टक्के भागीदारी आहे. ही मेट्रो मार्गिका खरेदी करण्यासाठी काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारने मंजुरी दिली; मात्र एमएमआरडीएने स्वतःच्या निधीतून ही मेट्रो मार्गिका खरेदी करावी, अशी अट राज्य सरकारने घातली आहे. त्यानुसार एमएमआरडीएकडून मेट्रो १ मार्गिका खरेदीची प्रक्रिया सुरू करण्यात आली. बँकांनी या एकरकमी कर्ज फेडीच्या प्रस्तावाला अंतिम मंजुरी दिल्यानंतर एमएमओपीएलवरील दिवाळखोरीची प्रक्रिया टळली आहे. दरम्यान, याबाबत एमएमआरडीएच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. सहा बँकांचे १,७११ कोटी कर्ज १) एमएमओपीएलकडून संचालन केल्या जाणाऱ्या मेट्रो १ मार्गिकेवर सहा बँकांचे सुमारे १,७११ कोटी रुपयांचे कर्ज आहे. याबाबत एमएमओपीएल आणि बँका यांच्यामध्ये १५ मार्चला बैठक पार पडली होती. २) बैठकीत कर्जाची एकरकमी परतफेड करण्यावर तत्त्वतः सहमती झाली होती. त्यानंतर बँकांनी या एकरकमी कर्जफेडीला तत्त्वत: संमती असल्याचे १८ मार्चला पार पडलेल्या अन्य एका बैठकीत कळविले होते. ३) बैठकीतील निर्णयानुसार एमएमआरडीएने १० टक्के कर्जाची म्हणजेच सुमारे १७५ कोटी रुपयांची परतफेड बँकांना केली होती. यात सार्वजनिक क्षेत्रातील स्टेट बँक ऑफ इंडिया आणि आयडीबीआय बँकांचा समावेश आहे.