Author: bittambatami.com

तिकिटाची वाट न बघता उदयनराजेंचा प्रचाराचा धडाका सुरुच

सातारा : सातारा लोकसभेच्या उमेदवारीचा तिढा कायम असतानाच भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी लोकसभेच्या रिंगणात कोणत्याही परिस्थितीत उतरण्याची घोषणा केली आहे. उदयनराजेंना भाजपकडून उमेदवारी निश्चित असली, तरी जाहीर होण्याची वाट न बघता प्रचाराचा धडाका सुरूच ठेवला आहे. त्यांनी काल महाबळेश्वर, पाचगणीचा दौरा केल्यानंतर आज सुद्धा भेटीगाठींचा सिलसिला सुरुच ठेवला असून लोकांशी…

रामेश्वरम कॅफे स्फोटात भाजपा कार्यकर्ता ताब्यात

काँग्रेसचा सनसनाटी दावा बंगळूरु: काँग्रेसने आज भाजपावर खळबजनक आरोप केला आहे.  तपास यंत्रेणेकडून म्हणजेच ‘एनआयए’कडून बंगळुरु बॉम्बस्फोट प्रकरणात भाजप कार्यकर्त्याला ताब्यात घेण्यात आलं आहे, असा दावा काँग्रेसने केला आहे. काँग्रेसच्या अधिकृत ट्वीटर हँडलवरुन याबाबतचे…

निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रमास गैरहजर कर्मचाऱ्यांवर फौजदारी कारवाई – राजेंद्र क्षीरसागर

मुंबई : अशोक गायकवाड मुंबई उपनगर जिल्हा अंतर्गत लोकसभा निवडणूक २०२४ साठी जे नियुक्त अधिकारी व कर्मचारी निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रमास गैरहजर राहिले आहेत, त्यांच्याविरुद्ध लोकप्रतिधीत्व अधिनियम १९९१ अंतर्गत फौजदारी कारवाईचा बडगा उचलण्यात येणार असल्याची माहिती मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी दिली. मुंबई उपनगर जिल्हा अंतर्गत लोकसभा निवडणूक २०२४ साठी ५० हजार अधिकारी आणि कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून नियुक्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी निवडणूकविषयक विविध प्रकारच्या कामकाजासंदर्भातील ५ प्रशिक्षण कार्यक्रम झाले आहेत. या सर्व प्रशिक्षणांना संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांनी उपस्थित राहणे अनिवार्य असून गैरहजर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार लोकप्रतिधीत्व अधिनियम १९५१ अंतर्गत दंडात्मक फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी दिली. मुंबई उपनगर जिल्हा अंतर्गत लोकसभा निवडणूक २०२४ साठी सर्व नियुक्त अधिकारी आणि कर्मचारी यांनी नियोजित निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रमास हजर राहणे अनिवार्य असून यासंदर्भातील आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी होईल याची दक्षता सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घ्यावी असे आदेश निवडणूक शाखेमार्फत निर्गमित करण्यात आले आहेत.

आरती अंकलीकर-टिकेकर यांचे गायन

मुंबई : दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने पंडिता आरती अंकलीकर-टिकेकर यांचा गायन कार्यक्रम रविवार ७ एप्रिलला सायंकाळी पाच वाजता केंद्राच्या वा. वा. गोखले वातानुकूलित सभागृहात आयोजित कऱण्यात आला आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून संस्थेचे संस्थापक डॉ. एस. जी. जोशी यांच्या स्मरणार्थ डॉ. श्रीकृष्ण जोशी यांनी आयोजित केला आहे. यावेळी त्यांना तबल्यावर यती भागवत तर संवादिनीवर निरंजन लेले साथ देतील. अधिक माहितीसाठी संपर्क ०२२-२४३०४१५०. आपल्या सुरेल, मोकळ्या, घुमारेदार, ढंगदार आवाजाची जादू मैफलीत पसरविणाऱ्या पंडिता आरती अंकलीकर स्वरांचे सूक्ष्म दर्जेही ताकदीने ऐकवितात. बंदिशीची मांडणी त्या रेखीव आणि डौलदार करतात. या गायकीतील पुकार तीव्र आणि परिणामकारक आहे. स्वरात रमण्यापेक्षा तालक्रीडा, लयकारी, लयीच्या अंगाने रचना यांवर त्या भर देतात. अत्यंत प्रभावी, जोरकस, गणिती, अचूक, तयारीची लयकारी या गायकीत आहे. अत्यंत चैतन्यपूर्ण अशी अभिव्यक्ती या गाण्यात आहे. चपळ आणि सुरेल तान आहे. बंदिशींचे वैविध्य हे त्यांचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. अनेक वाग्गेयकारांच्या उत्तमोत्तम बंदिशी त्या आवर्जून सादर करतात व त्यामुळे त्यांची गायकी समृद्ध झाली आहे. या गायनातून प्रखर आत्मविश्वास, बुद्धिमत्ता, आक्रमकता प्रतीत होते. ख्यालाइतकीच ठुमरीही रंगविणाऱ्या काही गायिकांपैकी आरती अंकलीकर एक आहेत. त्यांनी सर्व गानप्रकार गाऊन विपुल यश प्राप्त केले आहे. त्यांनी पं. वसंतराव कुलकर्णी, गानसरस्वती किशोरी आमोणकर, पं. उल्हास कशाळकर व पं. दिनकर कायकिणी यांसारख्या दिग्गज कलाकारांचे मार्गदर्शन घेऊन आग्रा व जयपूर परंपरेची खासियत आत्मसात केली.

महापालिका आयुक्त डॉ.इंदु राणी जाखड़ यांनी घेतला विकास कामांचा आढावा

कल्याण : विस्तारीत मुंबई नागरी पायाभूत सुविधा प्रकल्प अंतर्गत कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात ३६० कोटी रुपयांची रस्त्याच्या कॉक्रीटीकरणाची कामे प्रगती पथावर आहेत. यात एमएमआरडीए मार्फत २४ रस्त्यांची व महापालिकेमार्फत ७ रस्त्याची कामे करण्यात येत आहेत. याच बरोबर रिंगरोडचे पुढील सेगमेंट ३ चे काम हाती घेण्यात येत आहे. सदर कामात भेडसावणा-या विविध अडचणीचा आढावा घेऊन पावसाळयापूर्वी जास्तीत जास्त कामे पूर्ण करण्याच्या दृष्टीने महापालिका आयुक्त डॉ. इंदु राणी जाखड़ यांनी नुकतीच सर्व सबंधितांची आढावा बैठक घेतली. सदर बैठकीत या कामातील बाधित बांधकामांच्या निष्कासनाबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश संबंधित उप आयुक्त व प्रभागाचे सहा. आयुक्त यांना तसेच भूसंपादन, जागेच्या अडचणीसंदर्भात नगररचना विभागाच्या सहा. संचालक दिशा सावंत यांना देण्यात आले. डोंबिवली येथे महानगर गॅस मार्फत करण्यात येणा-या खोदाईबाबत मोठया प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्याने संबंधित सर्व कामे पुढील आठ दिवसात कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करण्याचे निर्देश आयुक्त डॉ.इंदु राणी जाखड़ यांनी महानगर गॅसच्या प्रतिनिधीना दिले. तसेच या कामात असलेले विद्युत टान्सफॉर्मर,जल/मलवाहिन्या यांच्या अडचणी संदर्भात एकमेकांच्या सहकार्याने मार्ग काढण्याच्या व सदर काम कालबध्द पध्दतीने करण्याबाबत सूचना संबधित अभियंत्याना देवून पावसाळयापूर्वी जास्तीत जास्त प्रमाणात कामे पूर्ण करण्याचे निर्देश संबंधितांना देण्यात आले. सदर बैठकीस कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शहर अभियंता अनिता परदेशी, एमएमआरडीएचे अधिक्षक अभियंता कोरगावकर, अरविंद ढाबे, भगवान चव्हाण, लोकेश चौसष्ठे, कार्यकारी अभियंता देवरे, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या सहा. संचालक नगररचना दिशा सावंत, कार्यकारी अभियंता जगदीश कोरे, मनोज सांगळे, शैलेश मळेकर, शैलेश कुलकर्णी, परिमंडळ उप आयुक्त प्रसाद बोरकर व रमेश मिसाळ, संबधित प्रभाग  क्षेत्र अधिकारी, प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार संस्थेचे प्रतिनिधी व इतर अधिकारी उपस्थित होते.

काँग्रेसची गॅरंटी महिलांना लखपती करणार

जाहीरनाम्यात पाच न्याय आणि २५ गॅरंटी जाहीर नवी दिल्ली- महिलांना वर्षाला एक लाख रुपयांची मदत देण्याची गॅरंटी देणारा निवडणूक जाहीरनामा आज काँग्रेसने प्रसिध्द केला. या जाहीरनाम्यात पाच न्याय आणि २५…

मतदार जनजागृतीसाठी रविवारी सायकल रॅली –  एम देवेंदर सिंह

अशोक गायकवाड रत्नागिरी : मतदार जनजागृतीसाठी रविवारी सायकल रॅलीत सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी केले आहे. मतदान जनजागृती करण्यासाठी ‘स्वीप’ अंतर्गत मतदार जनजागृतीकरिता जिल्हा प्रशासनाच्यावतीने रविवार दि. ७ एप्रिल रोजी सकाळी ६.३० वा. पोलीस मैदान येथून सायकल रॅली चे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीमध्ये शासकीय, निमशासकीय कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी केले आहे. रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी दि. ६ एप्रिल, ४ वाजेपर्यंत नाव नोंदणी करावी. या रॅलीसाठी जिल्हाधिकारी सिंह, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी सहभागी होणार आहेत. अधिक माहितीसाठी जिल्हा नियोजन समिती लेखाधिकारी उमेश मगदूम यांना संपर्क-९१७२७०९१७२ करावा.

‘मातोश्री’ची सुपारी फडणवीसांनीच दिली !

किरीट सोमय्यांचा खळबळजनक दावा मुंबई- मातोश्री आणि तत्कालीन शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांचे भ्रष्ट्राचार बाहेर काढण्याचे आदेश दिल्लीतून आले होते. स्वत: देवेंद्र फडणवीसांनीच मला हे आदेश अमंलात आणण्याबाबत सांगतिले होते, अशा…

सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे यांची उमेदवारी जाहीर होताच म्हात्रेंच्या गोदामांवर एमएमआरडीएकडून कारवाईचा बडगा

भिवंडी:भिवंडी लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांची उमेदवारी गुरुवारी जाहीर करण्यात आली आहे. म्हात्रे यांची उमेदवारी जाहीर होताच त्यांच्या आर के लॉजी वर्ल्ड या गोदाम संकुलावर एम एम आर डी ए कडून कोणतीही नोटीस न बजावता कारवाई करण्याचा घाट घालण्यात आला. सुरेश म्हात्रे यांचा बांधकाम व्यवसाय असून त्यांच्या कंपनीच्या माध्यमातून येवई येथे आर के लॉजी पार्क नावाने गोदाम संकुल उभारले आहे .या बांधकामावर गुरुवारी सायंकाळी कोणतीही नोटीस न बजावता सिल करण्याच्या कारवाईसाठी  एम एम आर डी ए चे अधिकारी पोलिस फौजफाटा घेऊन दाखल झाले.यावेळी सुरेश म्हात्रे यांच्या भागीदार सहकाऱ्यांनी संपूर्ण तालुक्यातील गोदाम बांधकामांना संरक्षण देण्यासाठी शासनाने अध्यादेश काढले आहेत त्यानुसार सर्व बांधकाम संरक्षित करण्यासाठी प्रस्ताव दाखल केला असल्याचे व उच्च न्यायालयातून स्थगिती आदेश घेतली असल्याची माहिती दिली त्यानंतर कारवाई करण्यासाठी आलेले एमएमआरडीएचे अधिकारी रित्या हाती माघी परतले. मी उभ्या केलेल्या गोदाम व्यवसायातून ९० हजार युवकांना रोजगार उपलब्ध करून दिला असून तालुक्यात अनधिकृत गोदाम व्यवसाय भ्रष्ट्राचाराची जननी कपिल पाटील यांनीच घातली आहे, असा आरोप सुरेश म्हात्रे यांनी केला आहे.एम एम आर डी ए राजकीय दबावातून कारवाई करीत असून जिनके घर शिसेके होते है ओ दुसरे के घर पर पत्थर नहीं फेका करते अशा शब्दात सुरेश म्हात्रे यांनी भाजपा उमेदवार कपिल पाटील यांच्यावर पलटवार केला असून निवडणूक लढतांना समोरासमोर येऊन लढा अशा कारवाया करून पाठीत खंजीर खुपसल्यासारखे नका करू असा इशारा म्हात्रे यांनी कपिल पाटलांना दिला आहे.

नितीन बानुगडे-पाटील यांची मुलुख मैदानी तोफ नालासोपाऱ्यात धडाडणार!

महाविकास आघाडीचा आज कार्यकर्ता मेळावा विरार : ‘भारत जोडो, निर्भन बनो` या अभियानांतर्गत महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा ‘महामेळावा आज सायंकाळी ६.३० वाजता आयोजित करण्यात आला आहे. नालासोपारा (पश्चिम) येथील तानिया बँक्वेट हॉलमध्ये होणाऱ्या या महामेळाव्याला शिवव्याख्याते तथा शिवसेना उपनेते नितीन बानुगडे-पाटील संबोधित करणार आहेत, अशी माहिती शिवसेना पालघर जिल्हाप्रमुख पंकज देशमुख यांनी दिली आहे. आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीकरता पालघर लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ‘संघर्षकन्या` भारती कामडी यांची उमेदवारी जाहीर केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ३ एप्रिल रोजी भारती कामडी यांच्या नावाची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर हा मेळावा होत आहे. दरम्यान; भारती कामडी यांचा पालघर लोकसभा ‘गावभेट दौरा सुद्धा आज सकाळी ९ वाजल्यापासून आयोजित करण्यात आलेला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पालघर लोकसभा मतदारसंघाकरता प्रथमच आश्वासक महिला उमेदवार घोषित केला आहे. अन्य पक्षांच्या तुलनेत शिवसेनेने या मतदार संघात आघाडी घेतली आहे.  या पार्श्वभूमीवर ‘भारत जोडो, निर्भन बनो` या अभियानांतर्गत महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा होणारा हा ‘महामेळावा` सामान्य नागरिक व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकरता प्रेरणादायी व ऊर्जा देणारा असेल. तसेच परिवर्तनाची नांदी देणारा ठरणार आहे, असा विश्वास जिल्हाप्रमुख पंकज देशमुख यांनी व्यक्त केला आहे.