Author: bittambatami.com

 अंधेरीतील गोखले-बर्फीवाला पुलाची जोडणी जूनअखेर

 अंतिम अहवाल रविवारपर्यंत सादर होणार मुंबई :अंधेरी पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पूल व सीडी बर्फीवाला पूल येत्या जूनअखेर जोडला जाणार आहे. पुलासाठी व्हीजेटीआयच्या अहवालानंतर आयआयटी मुंबईकडून रिपोर्ट मागविण्यात आला असून, येत्या रविवारपर्यंत अंतिम तो सादर होणार आहे. व्हीजेटीआयच्या अहवालाप्रमाणेच  पूल जोडणीचे काम होणार असून,  सुरक्षिततेसाठी, मजबुतीकरणासाठी आणि कमी वेळात जोडणीचे काम पूर्ण करण्यासाठी आयआयटीकडून काही पर्याय सुचविण्यात येणार आहेत. त्यानंतर लगेचच काम हाती घेऊन पुढील दोन-तीन महिन्यांत गोखले पुलाचा निर्णय मार्गी लागेल, असा विश्वास मुंबई पालिका प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे. गोखले पुलाच्या पुनर्बांधणीत, बर्फीवाला पुलाला गोखले पूल जोडून जुहू पर्यंतच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवला जाणार होता. मात्र, काही अभियांत्रिकी दोषांमुळे गोखले पुलाची उंची २.८ मीटरने अधिक वाढल्याने दोन पूल जोडण्याचा प्रयत्न फसला. या पार्श्वभूमीवर पालिकेने या समस्येवर उपाय सुचविण्यासाठी आयआयटी व व्हीजेटीआयचा सल्ला मागितला होता.  व्हीजेटीआयच्या अहवालात बर्फीवाला पूल चांगल्या स्थितीत असून, तो तोडण्याची आवश्यकता नसल्याचे म्हटले आहे. बर्फीवाला पुलाचे स्लॅब उंच करण्यासाठी जॅकचा वापर करून पुलाला गोखले पुलाशी जोडता येईल. पुलाचे चार स्तंभ खालून वर करण्याच्या अभियांत्रिकी तंत्राचा वापर करणे शक्य आहे, अशी शिफारस करण्यात आली आहे.  दरम्यान, पालिकेला स्वतःचा आराखडा तयार करता आला तरी तज्ज्ञांचा आणखी एक सल्ला म्हणून आयआयटीच्या प्राध्यापकांचे मार्गदर्शन यात समाविष्ट केले जाणार आहे. पुलाच्या संपूर्ण जोडणीत आयआयटी व व्हीजेटीआयचे तज्ज्ञ पाहणीसाठी उपस्थित राहतील याची काळजी घेतली जाणार आहे. नव्याने निविदा प्रक्रिया- १) गोखले व बर्फीवाला पुलाच्या जोडणीसाठी येणाऱ्या खर्चासाठी पालिका नव्याने निविदा करणार असून, ही प्रक्रिया एप्रिल महिन्यात पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जरी या कामाला सुरुवात झाली तरी जून अखेर हे काम पूर्ण करण्यासाठी कंत्राटदाराला मुदत दिली जाईल. ज्यामुळे नागरिकांसाठी पावसाळ्यात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार नाही. दुसऱ्या गर्डरचे कामही सुरू राहणार- २) या सगळ्यामध्ये गोखले पुलाच्या दुसऱ्या गर्डरसाठीचे साहित्य पोहोचत असल्याने तेही काम सुरू राहणार आहे. दुसऱ्या बाजूच्या गर्डरसाठी लागणाऱ्या ३२ स्पॅन पैकी जवळपास ५ स्पॅन मुंबईत पोहोचले आहेत. आता त्यांचे एकत्रीकरण करून कामाला सुरुवात केली जाणार आहे.

नायर रुग्णालयात एफओटी मशीन

मुंबई : नायर रुग्णालयातील श्वसनविकार विभागाला इंडियन ह्यूम पाईप कंपनी लिमिटेडच्या सीएसआर फंडातून अत्याधुनिक फोर्स्ड ऑसिलोमेट्री (एफओटी) मशीन मिळाले आहे. या सुविधेमुळे रुग्णांच्या श्वसन कार्यक्षमतेची चाचणी करणे अधिक सोपे होणार आहे. श्वसनविकाराच्या चाचणीदरम्यान रुग्णांना फुंकर मारण्यासाठी ताकद लावावी लागते, पण वयोमानामुळे ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना चाचणीदरम्यान फुंकर मारण्यात तेवढी सक्षमता नसते, पण मशीनमुळे फुंकर मारल्यानंतर श्वसननलिकेत असलेल्या अडथळ्यांचे निदान करता येणार आहे. तसेच श्वसननलिकेत असलेला दाब, दाह, सूज याचेही निदान होत असल्याने रुग्णावर तात्काळ उपचार करता येणार आहेत.

राकेश कोकळे यांच्या पाठपुराव्यामुळे खड्डे भरण्यास सुरुवात

माथेरान : एमएमआरडीएच्या माध्यमातून मुख्य रस्त्यावर पर्यावरण पूरक क्ले पेव्हर ब्लॉक लावण्यात आले होते परंतु त्यातील काही निकृष्ट दर्जाच्या ब्लॉक्समुळे रस्त्याला जागोजागी खड्डे पडले होते त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करताना अनेक पर्यटक पडून जखमी झाले होते तर याच रस्त्यावरून वाहतूक करणाऱ्या साधनांना देखील त्रासदायक बनले होते याकामी येथील जागरूक नागरिक सामाजिक कार्यकर्ते राकेश कोकळे यांनी मुख्याधिकारी यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला होता अखेरीस त्यांच्या निवेदनाची दखल घेऊन मुख्याधिकारी राहुल इंगळे यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून या रस्त्यावर नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांमार्फत माती आणि खडी मध्ये हे खड्डे बुजवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. माथेरान मध्ये विकास कामे होत असताना ती कशा पद्धतीने पूर्ण केली जात आहेत ठेकेदार कामाला दर्जा देत आहे की नाही याबाबत नागरिकांनी सुद्धा जागरूक असणे गरजेचे आहे अनेकदा ठेकेदार कामांमध्ये चालढकल करत असतात कामे लवकरच आटोपून बिले काढण्याची घाई असल्यामुळे कामे तकलादू होत असतात यासाठी नागरिकांनी होत असलेल्या कामांवर बारकाईने लक्ष ठेवणे गरजेचे असल्याचे राकेश कोकळे यांचे म्हणणे आहे.

शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्या आणि माजी मंत्री मीनाक्षी पाटील यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. रायगड जिल्ह्यातील पेझारी या त्यांच्या मूळ गावी जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. तसेच त्यांच्या कुटूंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटील, आमदार भरतशेठ गोगावले, आमदार महेंद्र थोरवे तसेच शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते आणि पाटील कुटूंबातील सदस्य उपस्थित होते.

कपिल पाटील यांच्या उपस्थितीत मनसे व ठाकरे गटाचे कार्यकर्ते भाजपात

 भिवंडीत भाजपाला वाढता प्रतिसाद भिवंडी : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भिवंडी लोकसभा मतदारसंघात भाजपाला वाढता प्रतिसाद मिळत असून, केंद्रीय राज्यमंत्री व भाजपासह महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा उबाठा गट व मनसेच्या कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. या कार्यकर्त्यांचे भाजपात स्वागत करीत कपिल पाटील यांनी भिवंडी लोकसभा मतदारसंघात ५१ टक्के मते मिळविण्याचा निर्धार व्यक्त केला. भिवंडी तालुक्यातील कोपर ग्रामपंचायतीतील उबाठा गटातील ग्रामपंचायत सदस्य देवेंद्र दिपचंद्र घरत, कोमल राकेश पाटील, भाग्यश्री भारत पाटील, माजी उपसरपंच भालचंद्र शांताराम घरत, संगीता दिपचंद्र घरत, भारत गुरुनाथ पाटील यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी सर्वांचे भाजपामध्ये स्वागत करून आगामी लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या विजयाचा निर्धार केला. या वेळी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष छत्रपती पाटील, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष श्रीधर पाटील आदींची उपस्थिती होती. मनसेच्या भिवंडी तालुक्यातील खारबाव गाव व परिसरातील कार्यकर्त्यांनी भाजपाचा झेंडा हाती घेतला आहे. खारबावच्या उपसरपंच जयमाला पाटील, शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष दर्पण पाटील, घनश्याम कारभारी, अजय जाधव, मिलिंद खंडागळे यांच्यासह शेकडी कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत केले. या पक्षप्रवेशासाठी तालुकाध्यक्ष पी. के. म्हात्रे यांच्यासह भाजपाचे स्थानिक कार्यकर्ते योगेश पाटील, विजय मुकादम, देवा पाटील, प्रफुल्ल तांगडे यांनी पुढाकार घेतला. या वेळी भाजपाचे पदाधिकारी श्रीकांत गायकर यांचीही उपस्थिती होती.

मुंबईत आतापर्यंत १६.५१ टक्के नालेसफाई

 मेट्रिक टन गाळ काढण्याचे नियोजन मुंबई : पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची कामे पालिकेने सुरू केली आहेत. आतापर्यंत १५ दिवसांत म्हणजे १ एप्रिलपर्यंत १६.५१ टक्के नालेसफाई झाल्याचा दावा पालिकेने केला आहे. मिठी नदीची…

अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी ईव्हीएम यंत्र हाताळणी प्रशिक्षण संपन्न

146 ओवळा माजिवडा विधानसभा मतदार संघातील ठाणे : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्यानुषंगाने 25 ठाणे लोकसभा मतदारसंघांतर्गत, 146 ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघातील निवडणूकीच्या कामकाजासंदर्भात सहायक निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय, महामानव शिव…

स्वदेशी बनावटीच्या मोनोचे तीन डबे मुंबईत

उर्वरित नऊ मोनोरेल डिसेंबरपर्यंत ताफ्यात दाखल मुंबई : चेंबूर-जेकब सर्कल ‘मोनोरेल’ मार्गिकेवरील प्रवासी संख्या वाढविण्यासाठी आणि ‘मोनोरेल’ प्रकल्पास तोट्यातून बाहेर काढण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) प्रकल्पात दहा नव्या…

‘सेट’ परीक्षा ७ एप्रिलला

मुंबईतील २८ केंद्रांवर १४ हजार ४२६ परीक्षार्थी परीक्षा देणार मुंबई : सहाय्यक प्राध्यापक पदासाठीची राज्यस्तरीय पात्रता परीक्षा अर्थात ‘सेट’ परीक्षा रविवार, ७ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आली आहे. सावित्रीबाई फुले…

पाणी देयकाची ६५३ कोटींची थकबाकी माफ

कल्याण डोंबिवली पालिकेची एमआयडीसीकडील कल्याण : २७ गावांसह कल्याण डोंबिवली पालिकेची महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला देय असलेली पाणी पुरवठा देयकाची ६५३ कोटी ५६ लाखाची थकबाकी शासनाने माफ केली आहे. नियमितची…