Author: bittambatami.com

एक देश एक परवान्यामुळे शेतकऱ्यांना दर्जेदार खते मिळणार

एक देश एक परवान्यामुळे शेतकऱ्यांना दर्जेदार खते मिळणार रमेश औताडे मुंबई : सध्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये खत विक्रीसाठी वेगवेगळे परवाने घ्यावे लागतात. त्यामुळे कंपन्यांना अडचणी येतात आणि त्याचा फटका अप्रत्यक्षपणे शेतकऱ्यांनाच बसतो. एकच राष्ट्रीय परवाना प्रणाली लागू झाल्यास देशभर एकसारखी, दर्जेदार आणि योग्य दरातील खते शेतकऱ्यांना सहज मिळू शकतील. शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात घट होऊन पीक उत्पादन वाढावे, यासाठी खत व सूक्ष्म पोषक तत्त्वांच्या धोरणात बदल होणे गरजेचे असल्याचे मत  परिषदेत व्यक्त करण्यात आले. ५ व ६ फेब्रुवारी रोजी मुंबईतील नॅशनल स्टॉक एक्स्चेंज येथे ही दोन दिवसांची परिषद झाली. परिषदेत बोलताना भारत सरकारचे कृषी आयुक्त डॉ. पी. के. सिंह यांनी सांगितले की, शेतीची खरी ताकद माती, पीक आणि शेतकरी यांच्यात आहे. माती निरोगी नसेल तर उत्पादन वाढणार नाही. त्यामुळे संतुलित खत वापर आणि एकात्मिक पोषण व्यवस्थापन  शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. महाराष्ट्र शासनाचे मंत्री जयकुमार जितेंद्रसिंह रावल यांनी सांगितले की, सूक्ष्म खतांनी गेल्या अनेक वर्षांत पीक उत्पादन आणि गुणवत्तेत मोठी भर घातली आहे. शेतकरी, खत उत्पादक, बियाणे उद्योग आणि प्रक्रिया उद्योग यांनी एकत्र काम केल्यास शेती अधिक फायदेशीर होईल. सूक्ष्म खते, जैविक खते आणि विशेष खतांना जलद मंजुरी बनावट व निकृष्ट खते विकणाऱ्यांवर कडक कारवाई चांगल्या दर्जाच्या भारतीय खतांच्या निर्यातीला प्रोत्साहन नियम सोपे करून शेतकऱ्यांपर्यंत नव्या तंत्रज्ञानाचे फायदे पोहोचवणे एकूणच, या शिखर परिषदेत शेतकऱ्यांना योग्य खत, योग्य वेळी आणि योग्य दरात मिळावे, तसेच शेती शाश्वत व फायदेशीर व्हावी, यासाठी सरकार आणि उद्योगांनी एकत्र काम करण्याची गरज अधोरेखित करण्यात आली.

 केडीएमसी आयुक्तांची शास्त्रीनगर रुग्णालयास अचानक भेट

केडीएमसी आयुक्तांची शास्त्रीनगर रुग्णालयास अचानक भेट रुग्णांची केली आपुलकीने विचारपूस कल्याण:  कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी शनिवारी सकाळी साडेआठ वाजता डोंबिवली पश्चिम येथील शास्त्रीनगर सामान्य रुग्णालयाला अचानक भेट दिली. यावेळी त्यांनी रुग्णालयात दैनंदिन स्वरूपात केली जाणारी स्वच्छता, उपलब्ध औषध साठा, रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सेवा सुविधा इत्यादी बाबींचा आढावा घेतला तसेच रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांची आपुलकीने विचारपूसही केली. यावेळी त्यांनी नवजात अतिदक्षता विभाग, बालरोग अति दक्षता विभाग या विभागांची तसेच इतर विभागांची देखील  पाहणी केली त्याचप्रमाणे रुग्णालयात चालू असलेल्या दुरुस्ती कामाची देखील पाहणी केली.  महापालिका रुग्णालयातील रुग्ण काही वेळेस तातडीने इतर रुग्णालयात संदर्भित करावे लागतात यासाठी एसओपी तयार करण्याच्या सूचना त्यांनी उपस्थित वैद्यकीय अधिकारी यांस दिल्या. रुग्णालयाच्या ओपीडीमध्ये केस पेपर काढण्यासाठी त्याचप्रमाणे अपघात कक्षात  रोकड रक्कम देऊन केस पेपर काढण्याच्या प्रक्रियेस लागणारा वेळ पाहता, केस पेपर काढण्यासाठी क्यूआर कोड आधारित  प्रणालीचा अवलंब करण्याचे निर्देश त्यांनी उपस्थित डॉक्टरांना दिले तसेच रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सुविधेमध्ये कुठल्याही प्रकारची हयगय काय होता कामा नये असे स्पष्ट निर्देश त्यांनी उपस्थित वैद्यकीय अधिकारी यांना दिले. यावेळी शास्त्रीनगर सामान्य रुग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी  डॉ.सादिया पिंजारी, डॉ. विनोद दौंड, बालरोगतज्ञ डॉ. हेमराज देवरे उपस्थित होते.

  ठाण्याच्या संस्कृतीचे वैभव असणाऱ्या ११ व्या संस्कृती आर्ट फेस्टिव्हलचे उद्घाटन

ठाण्याच्या संस्कृतीचे वैभव असणाऱ्या ११ व्या संस्कृती आर्ट फेस्टिव्हलचे उद्घाटन नृत्य, कला, संगीताची पर्वणी असणाऱ्या संस्कृती आर्ट फेस्टिव्हलला सुरुवात – मंत्री प्रताप सरनाईक अनिल ठाणेकर ठाणे : ठाण्याच्या सांस्कृतिक वैभवाचे प्रतीक असलेल्या ११ व्या संस्कृती आर्ट फेस्टिव्हलचे उद्घाटन  दिमाखात पार पडले. छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देत या फेस्टिव्हलची सुरुवात करण्यात आली, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. यावेळी ठाण्याच्या महापौर शर्मिला पिंपलोळकर आणि उपमहापौर कृष्णा पाटील, ठाण्याचे पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे, ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त  सौरभ राव यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. यंदा फेस्टिव्हल हा ‘कला संगमाची विठ्ठलवारी’ या संकल्पनेवर आधारित आहे. ढोल ताशांच्या गजरात आणि टाळ मृदुंगाच्या निनादात विठू माऊलीच्या भक्तिभावात भव्य शोभा यात्रा काढण्यात आली. शोभा यात्रेत सादर होणारे मर्दानी खेळ प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत होते. भव्य दिव्य शोभा यात्रेस ठाणेकरांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. उपवन तलावाच्या शीतल प्रवाहात आणि विठुमाउलीच्या सानिध्यात प्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित आनंद भाटे यांच्या सुरेल स्वरांनी आजची संध्या मंत्रमुग्ध झाली. जणू काही इथेच पंढरी अवतरल्याचा भास होत होता. आपल्या सर्वांचे लाडके दादा उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या स्मृतिप्रित्यर्थ फेस्टिव्हलमध्ये कलादालनाला त्यांचे नाव देत त्यांना आदरांजली वाहण्यात आली आहे. ७ फेब्रुवारी रोजी ज्येष्ठ गायक आनंद शिंदे आणि आदर्श शिंदे ही पिता-पुत्राची जोडी शिंदेशाही या कार्यक्रमातून रसिकांची मने जिंकली. ८ फेब्रुवारी रोजी बॉलीवूडचे सुप्रसिद्ध गायक शान यांच्या सुमधुर आवाजाने सुरेल संध्या रंगली. ९ फेब्रुवारी रोजी तारक मेहता फेम कवी व अभिनेते शैलेश लोढा यांची काव्य मैफल रंगणार आहे. याच बरोबर ज्येष्ठ कथ्थक नृत्यांगना मंजिरी देव, ज्येष्ठ अभिनेत्री सुधा चंद्रन, ओडिसी नृत्यांगना सुजाचा मोहपात्रा, भरतनाट्यम् कलाकार दीपक मुजुमदार अशा दिग्गजांचे सादरीकरण होणार आहे. तसेच लोकनृत्य, शास्त्रीय नृत्य, सुफी संगीत, भारूड, पोवडा, अभंग आदींचा सुंदर मिलाफ फेस्टिव्हल मध्ये रसिकांना अनुभवता येणार आहे. याचबरोबर विविध कार्यशाळा, धाडसी खेळांचे प्रात्यक्षिक, चित्रप्रदर्शनाचाही समावेश आहे. विविध खाद्य स्टॉलवर ठाणेकरांना रुचकर मेजवानीचा स्वाद घेता येईल. ठाणेकरांनी संस्कृती आर्ट फेस्टिव्हलमध्ये सहभागी होऊन विविध कलांचा मनमुराद आनंद घ्यावा, असे आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले.

 केडीएमसी क्षेत्रात साकारणार ऑटिझम व्हिलेज

केडीएमसी क्षेत्रात साकारणार ऑटिझम व्हिलेज कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा एक आगळावेगळा उद्यान प्रकल्प कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीने एक आगळा वेगळा प्रकल्प साकारला जात असून यामध्ये आता महापालिका क्षेत्रातील बारावे रिंग रोड लगत  परिसरात ऑटिजम व्हिलेज साकारले जात आहे. हे ऑटिजम व्हिलेज व्हिलेज सुमारे   १२७७२ चौ मी इतक्या परिसरात तयार होत असून ऑटिजम व्हिलेज अंतर्भूत असलेल्या उद्यानात एका बाजूस ऑटिजमग्रस्त मुलांसाठी ऑटिजम व्हिलेज आणि दुसऱ्या बाजूला सर्वसामान्य नागरिकांसाठी उद्यान साकारले जात आहे. या ऑटिजम व्हिलेज मध्ये स्वमग्नता असणाऱ्या मुलांसाठी  संवेदी उद्यान, संवेदी मार्ग, संवेदी खेळाची उपकरणे, ध्यान केंद्र, उपचार केंद्र आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या आहेत. यामुळे महापालिका आणि एमएमआर रिजन मधील ऑटिजम रुग्णांना थेरेपी सुविधा उपलब्ध होणार आहे . उर्वरित भागात भव्य उद्यान , आधुनिक कारंजे, बास्केटबॉल कोर्ट ,एम्म्पोथिएटर, मियावाकी जंगल, स्केटिंग रिंग,  जॉगिंग आणि सायकलिंग ट्रॅक, कॅफेटेरिया , टॉयलेट, सोलर सिस्टम अशा विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे हे ऑटिझम व्हिलेज मेरी रियालिटी या  विकासकांमार्फत अमिनिटी टीडीआर मधून तयार होत असून महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी याठिकाणी पाहणी करून २ एप्रिल रोजी जागतिक ऑटिझम जागरूकता दिनाला   या  ऑटिझम व्हिलेजचे लोकार्पण होण्याच्या दृष्टीने कामकाज पूर्ण करण्याबत संबंधितांना निर्देश दिले. तसेच दर सप्ताहात स्थळपाहणी करून आढावा घेतला जाईल असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. यावेळी सहा संचालक  नगररचना संतोष डोईफोडे, मुख्य उद्यान अधीक्षक संजय जाधव व विकासक सुदेश मोर्यांनी, जय लालवानी, सुनील पुनेजा, दिलीप पाठारे व कन्सल्टंट सूरज पाटील उपस्थित होते.

  नाशिक महापालिकेच्या प्रभावी नियोजनामुळे रस्ते चकाकले

नाशिक महापालिकेच्या प्रभावी नियोजनामुळे रस्ते चकाकले नाशिक मनपाची कचरा व्यवस्थापनात मोठी झेप हरिभाऊ लाखे नाशिक : शहरातील स्वच्छता, सार्वजनिक आरोग्य आणि पर्यावरण संरक्षण अधिक प्रभावी करण्याच्या उद्देशाने नाशिक महापालिकेने प्रत्यक्ष कचरा संकलन व वर्गीकरण व्यवस्थेत मोठी झेप घेतली आहे. कचरा व्यवस्थापन हे केवळ संकलनापुरते मर्यादित न ठेवता, ते मोजमापयोग्य, उत्तरदायी आणि नागरिक केंद्रित प्रणाली म्हणून विकसित करण्यासाठी मनपाने सुसूत्र, नियोजनबद्ध आणि परिणामाभिमुख मोहीम राबवली आहे. मनपाच्या अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आलेल्या या उपक्रमात तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, काटेकोर निरीक्षण आणि प्रत्यक्ष अंमलबजावणीचा समन्वय साधण्यात आला. या मोहिमेमुळे शहरातील ओला व सुका कचरा वर्गीकरणात अल्पावधीतच ठोस सुधारणा दिसून आली आहे. उपक्रमाचा पहिला टप्पा म्हणजे तंत्रज्ञानाधारित रिअल टाइम देखरेख प्रणाली. मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन आपत्कालीन नियंत्रण कक्षातून दररोज सरासरी ८० हन अधिक कचरा संकलन वाहने आणि कचरा-संवेदनशील ठिकाणांची थेट व्हिडिओ कॉलद्वारे तपासणी करण्यात आली. यात वाहनातील ओला सुका कचरा वर्गीकरण, मनुष्यबळ उपलब्धता, मार्ग व वेळापत्रक पालन, ब्लॅक स्पॉटची स्थिती तपासून तत्काळ सुधारात्मक कारवाई करण्यात आली. यामुळे कचरा मिश्रणावर नियंत्रण मिळाले असून, कार्यप्रणालीत पारदर्शकता वाढली आहे. दुसऱ्या टप्प्यात अतिरिक्त आयुक्तांनी स्वतः शहरातील विविध वॉडर्डामध्ये दैनंदिन पाहणी सुरू केली. पायलट वॉर्डासह महत्त्वाच्या भागांना भेटी देत वाहननिहाय वर्गीकरण, ब्लॅक स्पॉट, सार्वजनिक व सामुदायिक शौचालयांची स्वच्छता तसेच नागरिकांच्या तक्रारींचा प्रत्यक्ष आढावा घेण्यात आला. यामुळे प्रशासकीय निर्णय जलद आणि प्रभावीपणे घेणे शक्य झाले. तिसऱ्या टप्प्यात साप्ताहिक आढावा व कामगिरी मूल्यमापन यंत्रणा राबविण्यात आली. विभागीय स्वच्छता निरीक्षक, स्वच्छता निरीक्षक, कंत्राटदार, घनकचरा प्रकल्प व्यवस्थापक, जनजागृती आणि उपद्रव शोध पथकांच्या उपस्थितीत कामगिरीचा आढावा घेण्यात आला. यामुळे जवाबदारी निश्चित होत कार्यक्षमतेत लक्षणीय सुधारणा झाली. ५३ ब्लॅक स्पॉट निर्मूलन चार स्तरांवरील पडताळणी, ब्लॅक स्पॉट निर्मूलन, घरोघरी जनजागृती, झोपडपट्टी मोहिमा आणि कडक दंडात्मक कारवाईच्या माध्यमातून शहरातील ६० पैकी ५३ ब्लॅक स्पॉट पूर्णपणे निर्मूलित करण्यात आले आहेत. परिणामी रस्ते स्वच्छ होऊन, नागरिकांचा सहभाग लक्षणीयरीत्या वाढला आहे. पायलट वॉर्डमुळे वर्गीकरणात झेप प्रत्येक विभागात एक पायलट वॉर्ड निवडून राबविण्यात आलेल्या धोरणामुळे सुरुवातीला २० ते ३० टक्के असलेले कचरा वर्गीकरण सातत्यपूर्ण निरीक्षणांमुळे ६५ टक्क्यांहून अधिक पातळीवर पोहोचले. अवघ्या दोन महिन्यांत या मोहिमेचे सकारात्मक आणि ठोस परिणाम दिसून आले.

ठाणेकरांनी अनुभवली सुदेश भोसलेंच्या आवाजातील `नजाकत’!

ठाणेकरांनी अनुभवली सुदेश भोसलेंच्या आवाजातील `नजाकत’! सुयश व्याख्यानमालेत उलगडला ५० वर्षांच्या कारकि‍र्दीचा प्रवास ठाणे : चित्रपट व संगीत क्षेत्रातील तब्बल ५० वर्षांहून अधिक समृद्ध कारकि‍र्दीत १९ पार्श्वगायक व २८ अभिनेत्यांचे…

महाराष्ट्रात पीएम-ई-बस सेवा योजना फक्त कागदावरच, अद्याप एकही बस सेवेत नाही-वर्षा गायकवाड

महाराष्ट्रात पीएम-ई-बस सेवा योजना फक्त कागदावरच, अद्याप एकही बस सेवेत नाही-वर्षा गायकवाड नवी दिल्ली : पंतप्रधान-ई-बस सेवा योजना ही केंद्रातील मोदी सरकारची योजना महाराष्ट्रासाठी तर कागदावरच दिसत आहे. या योजनेअंतर्गत,…

 कामात निष्काळजीपणा दाखवल्यास ठेकेदारावर कठोर कारवाईचा इशारा

कामात निष्काळजीपणा दाखवल्यास ठेकेदारावर कठोर कारवाईचा इशारा कुमार आयलानी यांनी कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या बांधकामाची केली पाहणी उल्हासनगर : रविवारी आमदार कुमार आयलानी यांनी कल्याण-अंबरनाथ रस्त्यावर सुरू असलेल्या रस्त्याच्या बांधकामाची प्रत्यक्ष पाहणी…

 लता मंगेशकरांच्या गीतातील विचार समजल्यास जीवन समृद्ध

लता मंगेशकरांच्या गीतातील विचार समजल्यास जीवन समृद्ध बहुआयामी गायिका डॉ. मृदुला दाढे-जोशी यांचे मत ठाणे, दि. ८ (प्रतिनिधी) : स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर या आपल्या सर्वांच्या भावविश्वाचा अविभाज्य भाग आहेत. लतादीदींच्या…

एप्सटीन फाइल्स प्रकरणी कल्याणमध्ये काँग्रेसचा चक्का जाम

एप्सटीन फाइल्स प्रकरणी कल्याणमध्ये काँग्रेसचा चक्का जाम पंतप्रधान मोदींच्या राजीनाम्याची मागणी कल्याण : कल्याण मध्ये एप्सटीन फाइल्सच्या मुद्द्यावरून काँग्रेस आक्रमक भूमिकेत आली असून, कल्याण पश्चिममध्ये युवक काँग्रेसकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी…