Author: bittambatami.com

बोटिंगसुविधा उपलब्ध असलेल्या तलावांवर सुरक्षिततेची खबरदारी घ्यावी – सौरभ राव

  अनिल ठाणेकर ठाणे : गेट-वे येथे घडलेल्या बोट दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर महापालिका कार्यक्षेत्रातील बोटींग सुविधा उपलब्ध असलेल्या सर्व तलावांवर आवश्यक ती सुरक्षिततेची खबरदारी घेण्याच्या सूचना महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी  दिल्या आहे. महापालिका कार्यक्षेत्रात एकूण ३५ तलाव आहेत. त्यापैकी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या मासुंदा तलाव, उपवन तलाव व आंबेघोसाळे या  ठिकाणी नागरिकांच्या मनोरंजनासाठी पॅडल बोट व मशीन बोटींगची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आले आहे. मासुंदा तलाव येथे ३५ पॅडल बोट व २ मशीन बोट, उपवन तलाव येथे १६ पॅडल बोट व १ मशीन बोट तर आंबेघोसाळे तलाव येथे ४ पॅडल बोट व १ मशीन बोट उपलब्ध आहे.  सदरकामी ठेकेदारांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. बोटिंगसाठी येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून आवश्यक असलेल्या सर्व उपाययोजना अंमलात आणाव्यात तसेच बोटींगसाठी जाताना प्रत्येक नागरिकांस सेफ्टी जॅकेट परिधान करण्याची सक्ती करावी, जे नागरिक याला विरोध करतील त्यांना बोटिंग करण्यास देवू नये असे आदेशही महापालिका प्रशासनाने दिले आहेत. तसेच बोटीमध्ये बुयॉस रिंग रोप सेफ्टी जॅकेट ठेवणे याबाबतच्या सूचनाही संबंधित ठेकेदारांना देण्यात आल्या आहेत. आज  पर्यावरण्‍ विभागाच्या उपायुक्त डॉ. पदमश्री बैनाडे, मुख्य पर्यावरण अधिकारी मनिषा प्रधान यांनी बोटिंग सुविधा उपलब्ध असलेल्या तिन्ही तलावांना भेट देवून सर्व गोष्टींचा आढावा घेतला, व बोटिंगसंदर्भात कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा करु नये अशाही सूचना यावेळी संबंधितांना देण्यात आल्या.महापालिकेमार्फत वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचनांचे  बोटिंगसाठी येणाऱ्या नागरिकांनी पालन करावे असेही आवाहन आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे.

चटका लावून जाणारी निवृत्ती

भारताचा अव्वल ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विन याने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या कसोटी नंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्तीची घोषणा केली. रविचंद्रन आश्विन याच्या निवृत्तीच्या घोषणेने क्रिकेट रसिकांना धक्का बसला कारण त्याची निवृत्ती…

शंभर कोटी मुले हवामानबदलाच्या विळख्यात

जगभरातील शंभर कोटींहून अधिक, विशेषत: भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान, सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक आणि नायजेरिया अशा कमी विकसित देशांमध्ये राहणाऱ्या मुलांना हवामानबदलामुळे वाढत्या धोक्यांचा सामना करावा लागतो. त्यांना आधीच स्वच्छ पाण्याची अनुपलब्धता,…

“कायदे पतीकडून खंडणीसाठी नाही”; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

नवी दिल्ली :  लग्न हा व्यावसायिक करार नाही आणि कायद्यातील तरतुदी महिलांच्या कल्याणासाठी आहेत आणि त्यांच्या पतीला शिक्षा करण्यासाठी नाहीत, असं सुप्रीम कोर्टाने म्हटले. कायद्यातील कठोर तरतुदी महिलांच्या कल्याणासाठी आहेत आणि…

संसद चालवायची जबाबदारी सत्ताधाऱ्यांची – सुप्रिया सुळे

पुणे : संसदेचे कामकाज सुरळीत चालवण्याची जबाबदारी ही सत्ताधारी पक्षाची असते. त्यांनी पुढाकार घेऊन चर्चा केली पाहिजे पण दुर्दैवाने देशातील मायबाप जनतेला मला हे सांगावे लागेल की, यावेळी संसदेचे कामकाज सुरळीत चालवण्यात सरकार अपयशी ठरले आहे,…

मृत्यूची नौका…

  चालकाचे नियंत्रण सुटून नौदलाची स्पीड बोटीची प्रवासी फेरी बोटीशी टक्कर होऊन मोठा अपघात घडल्यामुळे मुंबईमध्ये चौदाजण मृत्युमुखी पडले. या दुर्घटनेमुळे क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करणे, बोटींवर पुरेशा प्रमाणात लाईफ…

वाल्मिक कराडसह आरोपींवर मोक्काची कारवाई होणारच !

नागपूर : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली असून याप्रकरणी आज राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सभागृहात निवेदन सादर केलं. हत्या प्रकरणातील आरोपी कोणाशीही संबंधित असतील तरी…

ठाणे जिल्ह्यात यंदाच्या वर्षात ७४ नव्या स्मार्ट अंगणवाड्या

ठाणे : ग्रामीण भागातील बालकांना अंगणवाडीत येण्याची आवड निर्माण व्हावी, त्यांचा शैक्षणिक आणि बौद्धिक विकास व्हावा यासाठी जिल्ह्यातील अंगणवाड्या स्मार्ट करण्याकडे जिल्हा परिषदेचा विशेष कल आहे. ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात…

कल्याणमध्ये आजमेरा सोसायटीतील रहिवाशांची मंत्रालयीन अधिकाऱ्याच्या अटकेसाठी निदर्शने

कल्याण : येथील पश्चिमेतील गोदरेज हिल भागात आजमेरा या उच्चभ्रूंच्या सोसायटीत बुधवारी रात्री घरात धूप अगरबत्ती लावण्यावरून वाद झाला. या वादाचे रुपांतर नंतर तुफान राड्यात झाले. या प्रकरणात या सोसायटीतील…