Author: bittambatami.com

राज्यात पाच वर्षांत ॲट्रॉसिटीचे गुन्हे वाढले

परभणी : अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा म्हणजेच ॲट्रॉसिटी अंतर्गत मागील पाच वर्षांत राज्यात विविध परिक्षेत्रामध्ये दाखल झालेल्या या गुन्ह्यांचा आलेख हा चढताच राहिल्याचे आकडेवारीतून दिसून येत आहे. यंदा जुलै अखेरपर्यंत राज्यात…

लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे दातृत्व आदर्शवत – शरद पवार

अशोक गायकवाड पनवेल : पैसे मिळवता येतात, पण त्या पैशांचा आपल्या दातृत्वाने सदुपयोग कसा करायचा याचा आदर्श लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सगळ्यांसमोर ठेवला आहे, असे गौरवोद्गार रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी संस्थेच्या हनुमान विद्यालयाच्या नुतनीकृत इमारतीच्या उद्घाटनावेळी काढले. या इमारतीसाठी ७५ लाख रुपयांची देणगी दिल्याबद्दल लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा जाहीर सत्कार या कार्यक्रमात करण्यात आला. या वेळी त्यांनी विद्यालयाच्या विकासासाठी आणखी २५ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. सातारा जिल्ह्याच्या खटाव तालुक्यातील निढळ येथे रयत शिक्षण संस्थेच्या हनुमान विद्यालयाची नुतनीकृत इमारत रायगडचे माजी खासदार आणि रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या ७५ लाख रुपयांच्या देणगीतून उभारण्यात आली आहे. या नुतनीकृत इमारतीचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या हस्ते तसेच वर्गखोल्या, विविध कक्ष, ऑफिस यांचे उद्घाटन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यासह उपस्थित अन्य मान्यवरांच्या हस्ते झाले. या वेळी संस्थेचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले की, लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी या कामाला प्रोत्साहन देण्यासाठी नेहमीप्रमाणे मुक्तहस्ते मदत केली. ते सातारला रयत शिक्षण संस्थेचे चार वर्षे विद्यार्थी होते. कर्मवीर अण्णांचा कमवा आणि शिका हा कार्यक्रम होता, त्यामध्ये त्यांनी एक वर्ष काम केले. चार वर्षे या ठिकाणी राहून शिक्षण पूर्ण केले आणि संस्थेमध्ये शिक्षक म्हणून काम केले. वर्ष, दोन वर्षे इथे काम केल्यानंतर त्यांच्या भागामध्ये नवी मुंबईत ते गेले. तिथे काम करायला सुरुवात केली. नंतरच्या काळामध्ये व्यवसायामध्ये पडले आणि या क्षेत्रात कष्ट करून सगळ्यांना बरोबर घेऊन प्रचंड यशस्वी झाले. त्या यशाचाच परिणाम संस्थेचे कोणतेही नवीन काम असले आणि ते हजर असले तर मला खात्री असते की आता या कामाला जो काही अडथळा किंवा कमतरता आहे त्यातून मार्ग निघेल. आजपर्यंत मला आकडा लक्षात नाही. मागे एकदा मी माहिती घेतली होती की, संस्थेला त्यांच्याकडून सहाय्य किती झाले असेल? जो आकडा एक वर्षापूर्वीचा माझ्याकडे होता तो शंभर कोटींचा होता. माझ्या मते या राज्यात कोणत्याही शैक्षणिक क्षेत्रामध्ये देणगीदार असतात. तरीपण त्यांच्यात सातत्य नसते. वर्षानुवर्ष मदत करत असतात, देणगीदार असतात, मात्र स्वतःच्या शाळेपुरते हे दातृत्व ते दाखवत असतात. रामशेठ यांचे वैशिष्ट्य हे आहे की, आम्ही लोक आदिवासी भागात गेलो. संस्थेची शाखा त्या ठिकाणी आहे. सगळे काम बघितले. काही कमतरता जाणवल्यावर रामशेठ यांना सांगितले की इतके पैसे जाहीर करा. त्यानुसार त्यांनी अशा अनेक शाखांमध्ये अर्थसहाय्य केलेले आहे. पैसे मिळवता येतात, पण त्या पैशांचा सदुपयोग कसा करायचा याचा आदर्श रामशेठ यांनी सगळ्यांसमोर ठेवला आहे. म्हणून याही शाखेला त्यांनी अर्थसहाय्य करण्याचा निर्णय घेतला. त्याबद्दल मी त्यांना अंतःकरणापासून धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो. निढळ गावचे सुपुत्र तथा रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी यांच्या पुढाकारातून आणि संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी दिलेल्या ७५ लाख रुपये देणगीतून इमारतीचे नूतनीकरण करण्यात आले आहे. राज्याला दिशादर्शक ठरणारी शाळेची अद्ययावत आणि सर्व सुविधांनी युक्त इमारत निढळमध्ये उभारण्यात आली आहे. संगणक कक्ष, ग्रंथालय, डिजिटल वर्ग, सुसज्य स्टाफरूम, बोलक्या भिंती, मुख्याध्यापक कक्ष, रंगरंगोटी, नवीन बेंचेस, अत्याधुनिक डिजिटल बोर्ड अशा अनेक सुविधा विद्यार्थी आणि शिक्षकांना देण्यात आल्याची माहिती संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी यांनी या वेळी दिली. या कार्यक्रमात लोकनेते रामशेठ ठाकूर, हनुमान विद्यालयाचे मुख्याध्यापक जगदीश निर्मळ, माजी विद्यार्थी विजय जाधव, कला शिक्षक प्रदीप कुंभार यांचा विशेष सत्कार करण्यात आला तसेच स्पर्धा परीक्षेत यशस्वी झालेल्या आणि विशेष प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करून संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी यांच्या दूरदृष्टीचे कौतुक केले. कार्यक्रमास संस्थेचे व्हॉईस चेअरमन अ‍ॅड. भगीरथ शिंदे, सचिव विकास देशमुख, कुलगुरू डॉ. ज्ञानदेव म्हस्के, आमदार विश्वजीत कदम, आमदार शशिकांत शिंदे, माजी आमदार प्रभाकर घार्गे, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य प्रभाकर देशमुख, अ‍ॅड. रवींद्र पवार, डॉ. सदाशिव कदम, डॉ. विठ्ठल शिवणकर, सांगली दक्षिण विभागीय चेअरमन डॉ. एम.बी. शेख, संस्थेचे सहसचिव डॉ. शिवलिंग मेनकुदळे, डॉ. राजेंद्र मोरे, जनरल बॉडी सदस्य वाय.टी. देशमुख, विभागीय अधिकारी नवनाथ जगदाळे, पीआरओ बाळासाहेब कारंडे यांच्यासह पदाधिकारी, रयत सेवक आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जिजामाता नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ (रजि.), काळाचौकी, मुंबई वर्ष-७२ वे सुशील मनोज साळसकर – अध्यक्ष मंगेश घेगडे – सरचिटणीस संदिप मेंगडे – खजिनदार 0000

देशभर ७०० कोटी वृक्ष लावण्याचा पर्यावरण संकल्प

रमेश औताडे मुंबई : पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी वृक्ष लागवड व त्याचे संवर्धन करणे गरजेचे आहे. त्यामुळे प्रत्येक भारतीयाने ५ वृक्ष जर लावले तर ७०० कोटी वृक्ष लागवड होऊ शकते. त्यामुळे या पर्यावरणीय जनजागृतीसाठी इको फ्रेंडली लाईफ या सामाजिक संस्थेने देशभर वृक्ष लागवड संकल्प केला असून स्वतः २६ हजार ७०० वृक्ष महाराष्ट्र व गोवा या राज्यात लाऊन पर्यावरण वाचविण्याचा संकल्प केला आहे. अशी माहिती पर्यावरण बचाओ आंदोलनाचे प्रणेते व इको फ्रेंडली लाईफ चे संस्थापक अध्यक्ष अशोक एन. जे. यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी बोलताना अशोक एन जे म्हणाले, भारतात तरुण वर्ग जास्त प्रमाणात आहे. त्यांना सोबत घेत हि जनजागृती सुरू आहे.  बेरोजगारी, गुन्हेगारी, व्यसनाधीनता, अंधश्रद्धा आणि फसवणूक अशा अनेक समस्यांमध्ये  खितपत पडलेल्या समाजाला बाहेर काढायचे असेल तर तरुणांच्या हाती पर्यावरण रक्षणाची जवाबदारी दिली पाहिजे असे अशोक त्यांनी सांगितले. ७०० कोटी झाडे लावण्याचा महासंकल्पामध्ये  तरूण वर्ग सहभाग घेत आहे. त्यांनी घेतलेला पर्यावरण रक्षणाचा वसा इतर तरूणांनीही घ्यावा म्हणून हा पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यासाठी हे पर्यावरण  जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे.

पाकव्याप्त काश्मीरमधील लोकांनी भारतात सामील व्हावे- राजनाथ सिंह

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी  संरक्षणंत्री राजनात सिंह यांनी रामबन या विधानसभा मतदारसंघात रॅलीला संबोधित केले. यावेळी त्यींन पाकव्याप्त काश्मीवर भाष्य केलं. सोबतच त्यांनी पाकव्याप्त काश्मीरमधील जनतेला थेट भारतात सामील होण्याचे…

अजितदादांनी शस्त्र खाली ठेवणं योग्य नाही – छगन भुजबळ

नाशिक : अजित दादा आमचे कॅप्टन आहेत. अजित दादांनी शस्त्र खाली ठेवणं योग्य नाही. ते बारामतीतूनच निवडणूक लढवतिल असा विश्वास राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केला.…

मुंबई उपनगर संघाची निवड

 राज्यस्तरीय एरियल स्पोर्ट्स स्पर्धा मुंबई : येत्या १३ ते १५ सप्टेंबर रोजी आडगाव, नाशिक येथे एरीयल स्पोर्ट्स असोसिएशन- महाराष्ट्र यांच्यातर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेसाठी मुंबई उपनगर जिल्हा संघाची निवड करण्यात आली आहे. या संघात बोरीवली (पश्चिम) येथील सुविद्या प्रसारक संघ आणि बीमा नगर एज्युकेशन सोसायटी या संस्थेच्या ८ खेळाडूंची निवड झाली आहे. या दोन्ही संस्थांमध्ये प्रमुख प्रशिक्षिका व राष्ट्रीय पंच सौ. संचिता देवल यांच्या मार्गदर्शनाखाली हे खेळाडू सराव करतात. सहाय्यक प्रशिक्षक आशिष देवल हे देखील कार्यरत आहेत. हे दोघेही “मल्लखांब लव” या संघाच्या माध्यमातून मल्लखांब, एरियल स्पोर्ट्स, जिमनॅस्टिक, योगा व भारतीय व्यायामाचे नियमित प्रशिक्षण वर्ग चालवतात. गेल्या राज्य स्पर्धेप्रमाणे या स्पर्धेत यंदा देखील मुंबई उपनगरचे खेळाडू चांगली कामगिरी करतील अशी खात्री आहे. या राज्य स्पर्धेतून झाशी येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ निवडण्यात येणार आहे. निवड झालेले खेळाडूं मुली :- नॅशनल डेव्हलपिंग ग्रुप ( ८ ते ११ वर्ष मुली ) १) जिआना  रजक २) शिवाई पोवार मिनी ग्रुप (१२ ते १४ वर्ष मुली ) १) सान्वी सावंत २) आर्या जाधव ज्युनियर ग्रुप ( मुली ) १) अमोलिका श्रोत्री मुलांमध्ये :- मिनी ग्रुप (१२ ते १४ वर्ष मुले ) १) शौर्य नाईक सब ज्युनियर ग्रुप (१५ ते १७ वर्ष मुले ) १) निरंजन अमृते ज्युनियर ग्रुप (१८ ते २० वर्ष मुले  ) १) द्वारकाधीश पाटील

धनंजय मुंडेंवर राजू शेट्टी, बच्चू कडू, संभाजीराजेंचा जोरदार हल्लाबोल

परभणी : कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, आमदार बच्चू कडू आणि स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष छत्रपती संभाजीराजे यांनी जोरदार हल्लाबोल केलाय. पावासाच्या तडाक्यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या या तिन्ही नेत्यांनी…

वंचितचा विधानसभेसाठी नवा फंडा !

मुंबई : आगामी निवडणूकीसाठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी नवा फंडा लढविला आहे. सर्व आदीवासी संघटनांना एकत्र आणून आता केवळ राखीवच नाही तर खुल्या जागांवरही वंचित आघाडी उमेदवार उभे…

 गणेशोत्सवानिमित्त मेट्रोच्या विशेष वाढीव फेऱ्या

पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या मागणीला यश   मुंबई : गणेश उत्सवात नागरिकांचे प्रवासात हाल होऊ नयेत यासाठी मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मेट्रोच्या फेऱ्या वाढवण्याची मागणी महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड आणि एमएमआरडीएला केली होती. त्या अनुषंगाने नागरिकांसाठी रात्रीच्या वेळेत अधिक फेऱ्या आणि विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. ११ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर, २०२४ या कालावधीत अंधेरी (पश्चिम) आणि गुंदवली या दोन्ही टर्मिनल्सवरून शेवटची मेट्रो ट्रेन रात्री ११ ऐवजी रात्री ११.३० वाजता सुटेल. गणेशोत्सवात रात्री उशीरापर्यंत सहभागी झालेल्या भाविकांना आपापल्या घरी पोहोचता यावे, हा या विस्तारित सेवेचा उद्देश आहे. याबद्दल बोलताना मंत्री लोढा म्हणाले “महाराष्ट्रातील प्रत्येक कुटुंबात गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मुंबई शहरातील सार्वजनिक उत्सव मंडळांचे सुंदर देखावे पाहण्यासाठी भक्त रात्री उशिरापर्यंत बाहेर फिरतात. २४ तास सुरु असलेल्या मुंबईमध्ये भक्तांची घरी जाण्याची गैरसोय होऊ नये म्हणून आम्ही मेट्रो सेवेच्या वेळेत आणि फेऱ्यांमध्ये बदल केले आहेत. या वाढीव फेऱ्यांमुळे गर्दी विभागली जाण्यास मदत होईल, सुव्यवस्था राखली जाईल आणि प्रत्येकाला सणाचा आनंद घेता येईल. विस्तारित सेवांचा तपशील: अंधेरी (पश्चिम) आणि गुंदवली टर्मिनल्सवरून शेवटच्या ट्रेनची वेळ ३० मिनिटांनी वाढवण्यात येणार आहे. दोन्ही टर्मिनल्सवरून अतिरिक्त मेट्रो ट्रेन रात्री ११.१५ आणि ११.३० वाजता सुटतील. गुंदवली ते दहिसर (पूर्व) आणि अंधेरी (पश्चिम) ते दहिसर (पूर्व) या स्थानकांदरम्यान चार वाढीव फेऱ्या सुरु केल्या जातील. या विस्तारामुळे प्रमुख स्थानकांवर एकूण २० अतिरिक्त फेऱ्या चालवल्या जातील. या वाढीव फेऱ्यांचा तपशील खालीलप्रमाणे: १. गुंदवली ते अंधेरी (पश्चिम): रात्री १०:२०, १०:३९, १०:५० आणि ११ वाजता (४ सेवा) २. अंधेरी (पश्चिम) ते गुंदवली : रात्री १०:२०, १०:४०, १०:५० आणि ११ वाजता ( ४ सेवा) ३. गुंदवली ते दहिसर (पूर्व): रात्री ११:१५ आणि ११:३० वाजता (२ सेवा) ४. अंधेरी पश्चिम ते दहिसर (पूर्व): रात्री ११:१५ आणि ११:३० वाजता (२सेवा) ५. दहिसर (पूर्व)  ते अंधेरी पश्चिम : रात्री १०:५३, ११:१२, ११:२२ आणि ११:३३ वाजता (४ सेवा) ६. दहिसर (पूर्व) ते गुंदवली : रात्री १०:५७, ११:१७, ११:२७ आणि ११:३६ वाजता (४स ेवा) 00000