Author: bittambatami.com

महाराष्ट्रात आरएसएस अॅक्शन मोडवर

स्वाती घोसाळकर मुंबई :  लोकसभा निवडणूकीत महाराष्ट्रात भाजपासह महायुतीचे पाणीपत झाल्यानंतर आता राष्ट्रीय स्वयंसेवक (आरएसएस) अक्शन मोडवर आले आहे. आरएसएसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची महाराष्ट्रातील या अपयशाबाबत चिंतन बैठक झाली. तब्बल दोन तास चाललेल्या…

वस्तुनिष्ठ मुल्यमापन होण्याची गरज..

भारतीय जनता पक्षाच्या पिछेहाटीची कारणमिमांसा.. भाग १ विशेष लेखमालिका… अखेर १८ वी लोकसभा आता गठीत होणार हे निश्चित झाले आहे. निवडणुकीचे सर्व निकाल जाहीर झाले आहेत. विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी…

मे महिन्यात 1203 अनधिकृत झोपडयांवर अतिक्रमण विभागाची धडक कारवाई

नवी मुंबई : महानगरपालिका अतिक्रमण विभागाच्या वतीने अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणे यावर धडक कारवाई करण्यात येत असून पावसाळापूर्व कालावधीत मे महिन्यामध्ये आठही विभाग कार्यालय क्षेत्रातील अनधिकृत झोपडयांवर तोडक कारवाई करण्यात आलेली आहे. यामध्ये प्राधान्याने डोंगर पायथ्याशी असलेल्या संभाव्य दरडप्रवण क्षेत्रातील झोपडया हटविण्यात आलेल्या आहेत. महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार, अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त्‍ डॉ. राहुल गेठे यांच्या नियंत्रणाखाली आठही विभागांच्या सहा.आयुक्त्‍ तथा विभाग अधिकारी यांनी अतिक्रमित झोपडपट्टी हटाव मोहीम प्रभावीपणे राबविली असून मे महिन्यात 1203 इतक्या मोठया संख्येने अनधिकृत झोपडया हटविलेल्या आहेत. यामध्ये बेलापूर विभागात दुर्गानगर, पंचशिल नगर, बेलापूर उड्डाणपूलाखाली, से.28 येथील विठ्ठल मंदिराच्या बाजूला अशा एकूण 251 अनधिकृत झोपडयांवर तोडक कारवाई केलेली आहे. तसेच नेरुळ विभागात से.9 पाण्याच्या टाकीच्या बाजूला, महात्मा गांधीनगर बालाजी मंदिराच्या बाजूला अशा 90 अनधिकृत झोपडया हटविण्यात आलेल्या आहेत. वाशी विभागामध्ये हायटेन्शन वायरच्याखाली, मुंबई – पुणे मार्गालगत वाशी गाव टोलनाक्याच्या बाजूला अशा दोन ठिकाणच्या 818 अनधिकृत झोपडयांवर कारवाई करण्यात आलेली आहे. घणसोली विभागात पामबीच मार्गालगत साईबाबा मंदिराजवळील 27 अनधिकृत झोपडया तसेच ऐरोली विभागात ठाणे बेलापूर रस्त्यानजिक भारत बिजली कंपनी समोरील रेल्वे रुळांनजिक अनधिकृतरित्या वसलेल्या 15 झोपडयांवर तोडक कारवाई करण्यात आलेली आहे. दिघा विभागातही ईश्वरनगर आणि विष्णुनगर येथील 2 अनधिकृत झोपडया निष्कासित करण्यात आल्या आहेत. मे महिन्यात पावसाळा पूर्व कालावधीत नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात विविध विभागांतील 1203 अनधिकृत झोपडयांवर तोडक कारवाई करण्यात आली असून पावसाळी कालावधीत नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास दुर्घटना घडू नये म्हणून डोंगर पायथ्याशी असलेल्या दरड प्रवण क्षेत्रातील झोपडपट्टया हटविण्याकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे.

नवनियुक्त खासदार वर्षा गायकवाड यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

मुंबई : मुंबई काँग्रेस अध्यक्षा आणि उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदार संघातून विजयी झालेल्या प्रा. वर्षाताई गायकवाड यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली. लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी, “वर्षा गायकवाड ही माझी लहान बहिण आहे, तिला लोकसभेत पाठवणार”, हा शब्द दिला होता, तो त्यांनी खरा करून दाखवला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी वर्षा गायकवाड यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. महाविकास आघाडीच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांनी भाजपा उमेदवारांचा १६ हजारांपेक्षा जास्त मतांनी पराभव करून २००४ च्या विजयाची पुनरावृत्ती केली. याच मतदारसंघातून वर्षा गायकवाड यांचे वडील लोकनेते एकनाथराव गायकवाड यांनी विजय संपादन केला होता. २०२४ च्या निवडणुकीत काँग्रेस महाविकास आघाडीच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांनी भाजपा उमेदवाराचा दणदणित पराभव करत विजय खेचून आणला. यावेळी शिवसेना नेते श्री. अनिल परब, माजी मंत्री अस्लम शेख, डॉ. महेश पेडणेकर, संदीप नाईक, वीजू शिंदे आदी उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयांची महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केली पाहणी

ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयांची महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी नुकतीच पाहणी केली. रुग्णालयातील सोयीसुविधा आणि औषधोपचार यांच्यासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, असे प्रतिपादन आयुक्त राव यांनी या भेटीनंतर केले. सरासरी १२००च्या घरात असलेली बाह्यरुग्ण संख्या सध्या २२००च्या घरात गेली आहे. त्यामुळे विनामूल्य असलेल्या औषधोपचाराचा खर्चही वाढला आहे. हा जास्तीचा खर्च महापालिका तत्काळ उपलब्ध करून देणार आहे. तसेच, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आणि राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय येथील कायम पदांच्या भरतीसाठीही जलद कार्यवाही करण्यात येत असून लवकरच ही पदे भरली जातील, असे आयुक्त राव यांनी स्पष्ट केले आहे. महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी रुग्णालयातील सर्व विभाग, वैद्यकीय महाविद्यालय, वसतीगृह आणि परिसराची पाहणी केली. त्यानंतर, सर्व वरिष्ठ अधिकारी आणि विभाग प्रमुख यांनी बैठक घेतली. या बैठकीत, वैद्यकीय अधीक्षक डॉ. अनिरुद्ध माळगावकर यांनी रुग्णालय तसेच महाविद्यालय यांच्याविषयी सविस्तर सादरीकरण केले. बैठकीस, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त (आरोग्य) उमेश बिरारी, उपायुक्त (आस्थापना) जी. जी. गोदेपुरे, उपनगर अभियंता विकास ढोले, शुभांगी केसवानी, डीन डॉ. राकेश बारोट, डॉ. स्वप्नाली कदम आदी उपस्थित होते. रुग्णालयाच्या मजबुतीकरणासाठी राज्य सरकारने ६० कोटी रुपये मंजूर केले आहेत. त्यासोबत, नवीन विद्युत व्यवस्था, ट्रान्सफॉर्मर आदी सुधारणांसाठी, वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्थलांतरासाठी आणखी निधीची गरज भासणार आहे. त्या नेमक्या गरजा, त्याचा खर्च यांचा संपूर्ण आढावा घेऊन वाढीव खर्चाचा प्रस्ताव तयार करावा, असे निर्देश यावेळी आयुक्त राव यांनी दिले. वाढीव औषधसाठा, अपघात विभागाची क्षमतावृद्धी, अतिदक्षता विभागातील खाटांची वाढ आणि डॉक्टरांची उपलब्धता या तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्यासाठी निधीची कोणतीही कमतरता जाणवणार नाही, असे आयुक्त राव म्हणाले. तसेच, पार्किंग प्लाझामधील उपलब्ध वैद्यकीय सामुग्रीचा जास्तीत जास्त वापर रुग्णालयात करावा त्यासाठी डीन आणि अधीक्षक यांनी पार्किंग प्लाझामधील सामुग्रीची तत्काळ पाहणी करावी, असे निर्देशही आयुक्त राव  यांनी दिले. रुग्णालयावर असलेला अतिरिक्त भार लक्षात घेता डॉक्टर करत असलेल्या रुग्णसेवेबद्दल आयुक्त राव यांनी कौतुक केले. रुग्णांच्या तसेच विद्यार्थ्यांच्या माहितीचे संगणकीकरण करून ती व्यवस्था अद्ययावत करण्याबाबतही आयुक्त राव यांनी सूचना दिल्या. विविध परीक्षांमध्ये यश मिळवणाऱ्या निवासी डॉक्टरांचेही आयुक्त राव यांनी कौतूक केले. उत्तमोत्तम विद्यार्थी या महाविद्यालयात आले तर त्याचा फायदा रुग्णसेवेलाही होतो. त्यामुळे या विद्यार्थ्यांचा आपल्या अभिमान असल्याचेही राव यांनी सांगितले.

जूनमध्येही मुंबईकर घामाघूम;

सकाळी पाऊस, तर दुपारी उन्हाने होरपळ मुंबई : गोव्यात दाखल झालेला मान्सून मुंबईत येण्यास १० जून उजाडण्याची शक्यता असतानाच बुधवारी सकाळी मुंबईत पाऊस झाला. यानंतर पडलेल्या कडक उन्हामुळे मुंबईकरांना चटके बसले. उकाड्याचे प्रमाण अधिक असल्याने जूनमधील पावसाऐवजी मुंबईकरांची घामाच्या धारांनी अंघोळ होत होती. गुरुवारी शहर आणि उपनगरात हलक्या ते मध्यम पावसाच्या शक्यतेसह सामान्य: आकाश ढगाळ राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. दुसरीकडे मान्सून वेळापत्रकानुसार दक्षिण कर्नाटक, दक्षिण आंध्र प्रदेशपर्यंत पोहोचल आहे. मान्सून पुढे सरसावण्यासाठी अनुकूल वातावरण आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पुणे दक्षिण, अहमदनगर दक्षिण, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, जालना, बीड, धाराशिव, लातूरपर्यंतच्या जिल्ह्यात व लगतच्या जिल्हा परिसरात मान्सून १० जूनपर्यंतच्या पाच दिवसांदरम्यान कधीही हजेरी लावण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी मान्सूनपूर्व जोरदार वळीव पावसाची दाट शक्यता आहे, असे हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी  बोलताना सांगितले.

मुंबई ‘आयआयटी’ ठरली क्यूएस रॅंकिंगमध्ये सर्वोत्तम;

१४९ वरून ११८ स्थानावर घेतली झेप मुंबई : जागतिक विद्यापीठांच्या क्यूएस रॅंकिंगमधील भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई (आयआयटी)च्या कामगिरीत सुधारणा झाली असून, संस्था १४९ वरून ११८ व्या स्थानावर पोहोचली आहे. ‘आयआयटीने १०० पैकी ५६.३ गुणांची कमाई करत आजवरची सर्वोत्तम कामगिरी केली आहे. पहिल्या १५० संस्थांच्या यादीत इतकी भरीव कामगिरी आयआयटीने प्रथमच केली आहे. विविध नऊ निकषांवर ‘आयआयटी’ची निवड करण्यात आली आहे. भारतातील ६१ टक्के विद्यापीठांचे क्यूएस क्रमवारीतील स्थान उंचावले आहे. त्यात दिल्ली ‘आयआयटी’ (१९७ वरून १५०व्या स्थानावर), बंगळुरू ‘आयआयएससी’ (२२५वरून २११ व्या स्थानावर), खरगपूर ‘आयआयटी’ (२७१ वरून २२२व्या स्थानावर), मद्रास ‘आयआयटी’ (२८५वरून २२७वर), दिल्ली विद्यापीठ (४०७वरून ३२८वर) या संस्थांचा समावेश आहे. एमआयटी सलग १३ व्या वर्षी प्रथम अमेरिकेतील ‘एमआयटी’ने सलग १३ वर्षे आपले स्थान अबाधित ठेवत प्रथम क्रमांक पटकावला. दुसऱ्या स्थानावर लंडनचे इम्पेरिअल कॉलेज (आधीच्या सहाव्या स्थानावरून दुसऱ्या) आहे. हार्वर्ड आणि ऑक्सफर्डने एकत्रितपणे तिसरा रँक मिळवला आहे. तर केंब्रिज दुसऱ्या स्थानावरून पाचव्या स्थानावर घसरले आहे. कोट आयआयटी’ची क्यूएसमधील कामगिरी ३१ गुणांनी सुधारली आहे. हे आमच्या शिक्षकांचे, विद्यार्थ्यांचे यश आहे. – प्रा. शिरीष केदारे, संचालक, आयआयटी आयआयटीचे गुण- शिक्षकांची प्रतिष्ठा –  ८६ सायटेशन –  ७९.१ शैक्षणिक प्रतिष्ठा – ५८.५ रोजगारक्षमता – ६४.५ सस्टेनिबीलिटी –  ५२.३ शिक्षक-विद्यार्थी रेशो – १४.४ इंटरनॅशनल फॅकल्टी – ४.३ इंटरनॅशनल रिसर्च नेटव – ५२.३ इंटरनॅशनल स्टुडन्टस – १.३

गेल्या ६ वर्षांपासून रखडलेल्या पूलामुळे

नागरिकांमध्ये  प्रचंड संताप आणि तणाव मुंबई : मरोळ ते साकीनाका भागातील कृष्णलाल मारवाह रोडलगतच्या पिकनिक पुलाचे बांधकाम गेली ६ वर्षे रखडले असून त्याची  दखल कुणीच घेत नसल्यामुळे स्थानिकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, याबाबत स्थानिक राजकीय कार्यकर्त्यांमध्येही काम न होण्यावरून आपापसात भांडणे तसेच तणाव अनुभवयाला मिळत आहे. यासंदर्भात स्थानिक नागरिकांनी एक मोर्चा काढून मुंबई महानगरपालिका व त्यांनी नियुक्त केलेल्या कंत्राटाराच्या विरोधात उत्सफूर्त मोर्चा काढला.  त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. त्याचबरोबर नागरिकांनी या पिकनिक पूलाचे काम लवकरात लवकर झाले नाही तर मात्र आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.

स्पोर्टींग क्लबचे सेंट्रल मैदान म्हणजे ठाण्याचे लॉर्ड्स

ठाणे : स्पोर्टींग क्लब कमिटीच्या  सेंट्रल मैदानाने गेल्या शंभर वर्षात ठाण्याच्या क्रिकेटची अनेक स्थितंतरे अनुभवली आहेत. मड, मॅट, आणि टर्फ अशा खेळपट्टयांवर क्रिकेटवेड्या ठाणेकरांनी आपले कौशल्य पणाला लावले. श्री आनंद भारती समाज संस्थेची स्थापना १९१० साली झाली. तर संस्थेची क्रिकेट शाखा १९१५ साली स्थापन झाली. स्पोर्टींग क्लब कमिटीच्या शताब्दी वर्षात आमच्या संस्थेच्या गौरव होत आहे त्याबद्दल आम्ही क्लबचे अध्यक्ष डॉ राजेश मढवी यांच्यासह  स्पोर्टींग क्लब कमिटीच्या सर्व पदाधिकारी आणि सदस्यांचे आभारी आहोत असे भावपूर्ण मनोगत श्री आनंद भारती समाजाचे सचिव विवेक मोरेकर यांनी व्यक्त केले. स्पोर्टींग क्लब कमिटीतर्फे सीकेपी सभागृहात शताब्दी वर्षाचा सांगता सोहळा अनेक मान्यवर, क्लबचे सदस्य यांच्या उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. त्याप्रसंगी सचिव विवेक मारेकरी बोलत होते.  पुष्पगुच्छ, क्लबचे बोधचिन्ह असलेली टोपी, चांदीची मुद्रा यावेळी सर्वाना भेट देण्यात आली. यावेळी ठाण्याचे माजी खासदार राजन विचारे, आमदार संजय केळकर, माजी आमदार निरंजन डावखरे, क्लबचे जेष्ठ सदस्य दिलीप[ रणदिवे, मुकुंद सातघरे,  क्लबचे माजी अध्यक्ष मुरलीधर मढवी, सुषमा मढवी, हेमांगी नाईक यांचे डॉ राजेश मढवी यांनी स्वागत केले. कार्यवाहक दिलीप धुमाळ, सहकार्यवाहक सुशील म्हापुसकर, अतुल फणसे, , किशोर रणदिवे, किशोर ओवळेकर, योगेश महाजन आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. जेष्ठ सदस्य  प्रल्हाद नाखवा यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  केले.

8वी राज्य मानांकन कॅरम स्पर्धा  

अभिजित – काजलला प्रथम मानांकन मुंबई : श्री दत्तराज चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने हॉटेल मंगलम नरसोबावाडी कोल्हापूर  येथे सुरु होणाऱ्या ८ व्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत पुरुष व महिला गटात अनुक्रमे पुण्याच्या अभिजित त्रिपनकर व मुंबईच्या काजल कुमारीला प्रथम मानांकन देण्यात आले आहे. स्पर्धेतील पुरुष एकेरी गटात २५६ तर महिला एकेरी गटात ४४ खेळाडूंनी भाग घेतला आहे. शनिवार दिनांक ८ जून २०२४ रोजी सकाळी ९.३० वाजता पुरुष एकेरी गटाने स्पर्धेला सुरुवात होणार आहे. तर महाराष्ट्र कॅरम असोसिशनच्या युट्युब चॅनलवरून या सामन्यांचे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. स्पर्धेतील मानांकन पुढीलप्रमाणे. पुरुष एकेरी : १) अभिजित त्रिपनकर ( पुणे ) २) विकास धारिया ( मुंबई ) ३) झैद फारुकी ( ठाणे ) ४) पंकज पवार ( मुंबई ) ५) प्रशांत मोरे ( मुंबई ) ६) रहिम खान ( पुणे  ७) संदीप दिवे ( मुंबई उपनगर ) ८) सागर वाघमारे ( पुणे) महिला एकेरी : १) काजल कुमारी ( मुंबई ) २) प्राजक्ता नारायणकर ( मुंबई उपनगर ) ३) अंबिका हरिथ ( मुंबई ) ४) आकांक्षा कदम ( रत्नागिरी ) ५) उर्मिला शेंडगे ( मुंबई ) ६) केशर निर्गुण ( सिंधुदुर्ग ) ७) अंजली सिरीपुरम ( मुंबई ) ८) प्रीती खेडेकर ( मुंबई)