Category: होम

छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त पहिल्यांदाच होणार शिवप्रदक्षिणा

ठाणे : छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त येत्या १४ मे रोजी ठाण्यातील तलावपाळी परिसरात ओबीसी प्रतिष्ठानच्या वतीने शिवप्रदक्षिणेचे आयोजन करण्यात आले आहे. स्वराज्याचे धाकले धनी अर्थात छत्रपती संभाजी महाराज यांची 14 मे रोजी जयंती आहे. ठाणे ओबीसी एकीकरण समिती, ओबीसी प्रतिष्ठानच्या वतीने ठाणे शहरातील मासुंदा तलाव, रंगो बापूजी गुप्ते चौक, चिंतामणी ज्वेलर्सच्या समोर छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी करण्यात येणार आहे. या जयंतीनिमित्त मासुंदा तलाव येथे अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून सायंकाळी ६ वाजता मासुंदा तलाव परिसरात शिवप्रदक्षिणा करण्यात येणार आहे. या प्रदक्षिणेत संभाजी राजांच्या पुतळ्याची मिरवणूक काढण्यात येणार असून ढोल ,लेझीम पथकासह हजारो नागरिक सहभागी होणार असल्याचे ओबीसी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रफुल वाघोले यांनी सांगितले.

बोगस बियाणे, खते व औषधे विक्री करताना आढळल्यास कडक कारवाई – दिपक कुटे

अनिल ठाणेकर ठाणे : बोगस बियाणे, खते व औषधे विक्री करताना कोणी आढळल्यास त्यांच्याविरूध्द कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दिपक कुटे यांनी दिला आहे. ठाणे जिल्ह्यातील सन २०२४ मधील खरीप हंगाम पूर्व आढावा सभा जिल्हा परिषदेच्या सभागृहात दि. ७ मे रोजी पार पडली. जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दिपक कुटे यांनी खते व बियाणे विक्रेत्यांनी कायदेशीर तरतुदींना अधिन राहून व्यवसाय करावा असे स्पष्ट केले. बोगस बियाणे, खते व औषधे विक्री करताना कोणी आढळल्यास त्यांच्याविरूध्द कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला. क्षेत्रिय कर्मचाऱ्याच्या मार्फत रँडमली शेतकऱ्यांनी खरेदी केलेल्या खतांचे तपासणी करुन माहिती घ्यावी व पावत्यांना न देता विक्री करणाऱ्या विक्रेते व व्यक्तीविरुध्द सदरील खते बोगस आहेत असे समजून पोलीस कारवाई करणेत येईल. सर्व विक्री केंद्रांची हंगामपूर्व १०० % तपासणी करण्याच्या सूचना जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी सर्व क्षेत्रिय अधिकाऱ्यांना दिल्या. खरीप २०२४ हंगामात खताची टंचाई भासणार नाही व शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्वक खते रास्त दरात मिळतील या संदर्भात सर्वतोपरी काळजी घेण्याबाबत सर्व उपस्थितांना सांगितले. खरीप हंगाम सुरळीत जावा याकरिता सर्व यंत्रणांनी एकत्रित काम करावे असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दिपक कुटे यांनी केले. ठाणे जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी रामेश्वर पाचे यांनी ठाणे जिल्ह्यासाठी १० हजार मेट्रिक.टन रासायनिक खतांचे आवंटन मंजूर झाल्याचे सांगितले. रासायनिक खतांचे शेतकऱ्यांना विक्री करतांना पॉस मशिनद्वारेच करावी. खत वाटप होत असताना शेतकऱ्यांना लिंकिंगच्या समस्येला तोंड देण्याच्या तक्रारी प्राप्त होतात, त्याकरिता अशा प्रकारच्या तक्रारीची गंभीर दखल घेण्यात येईल व खताबरोबर इतर अनावश्यक निविष्ठा शेतकऱ्यांना सक्तीने विकल्या जाणार नाहीत याबद्दल सर्व वितरकांना सक्त सूचना दिल्या. अन्यथा विक्रेत्यांविरूध्द कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला. जिल्ह्यामध्ये नॅनो युरिया व नॅनो डिएपी प्रभावीपणे वापराचे प्रोत्साहन देण्यासाठी विस्तार योजनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रोत्साहित करावे व त्याचा वापर वाढविण्याकरिता भर देण्यात यावा अशा सूचना सर्व क्षेत्रिय अधिकारी व उपस्थितांना दिल्या. यावेळी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दिपक कुटे, कृषि विकास अधिकारी रामेश्वर पाचे, उपविभागिय कृषि अधिकारी सुधीर नईनवाड, जिल्हा मृद सर्वेक्षण व मृदा चाचणी अधिकारी रूपाली काळे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर, मुरबाड या तालुक्यांचे तालुका कृषि अधिकारी, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक सचिन फुले, बाळासाहेब माने, कृषि अधिकारी, जिल्हा मृद चाचणी अधिकारी कार्यालय, ठाणे, पंचायत समिती कडील सर्व कृषि अधिकारी, खते- बियाणे उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी व जिल्हयातुन आलेले सर्व खते व बियाण्यांचे घाऊक विक्रेते उपस्थित होते. या सभेत IFFCO चे प्रतिनिधी निमिष पवार यांनी नॅनो युरीया व नॅनो डीएपी च्या वापराबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. नॅनो युरीयामुळे पिकांच्या उत्पन्नावर कोणत्याही प्रकारचा नकारात्मक परिणाम होत नसल्याचे व उत्पादकतेमध्ये वाढ व खर्चात बचत होऊन शेतकऱ्यांच्या एकूण उत्पन्नात वाढ होते. त्याचप्रमाणे पिकांच्या पौष्टीकतेमध्ये व गुणवत्तेमध्ये फरक पडतो. जमीन, हवा व पाणी यांची गुणवत्ता सुधारते. अशा प्रकारचे फायदे नॅनो युरीया व नॅनो डीएपीच्या वापरामुळे होतात अशी सविस्तर माहिती सभेत देण्यात आली.

शासकीय कर्मचाऱ्यांना पोस्टल बॅलेटपासून वंचित ठेवू नये –  संजय घाडीगावकर

अनिल ठाणेकर ठाणे : एप्रिल २०२४ मध्ये व्यावसायिक पूर्व परिक्षेकरिता सुपरवायझर राहिलेल्या शिक्षक, शासकीय कर्मचारी यांना पोस्टल बॅलेटपासून वंचित ठेवू नये, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख संजय घाडीगावकर यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे पत्राद्वारे केली आहे. एप्रिल २०२४ महिन्यात शासनाने व्यावसायिक शिक्षणासाठी ज्या पूर्व परीक्षा आयोजित केलेल्या होत्या, त्या पूर्व परीक्षांना काही शिक्षक, शासकीय कर्मचारीवर्ग  सुपरवायझर म्हणून त्यांचे कर्तव्य बजावत होते. परिणामी त्यांना एप्रिल २०२४ मध्ये पोस्टल बॅलेट करिता फॉर्म भरून देता आले नाहीत. त्या दिवशीचे निवडणूक प्रक्रियेचे ट्रेनिंगही त्यांना घेता आले नाही. म्हणून अशा शिक्षकांना आणि शासकीय कर्मचाऱ्यांना आपण नोटिसा, मेमो बजावले होते. त्यांनी या नोटिस व मेमों यांना लेखी उत्तर दिल्यानंतर आपणास वस्तुस्थिती अवगत झालेली असतानाही असे शिक्षक आणि शासकीय कर्मचारी यांना पोस्टल वोटिंग पासून आपण वंचित ठेवत आहात ही बाब अयोग्य आहे सदरची बाब ही अतिगंभीर असून कोणत्याही व्यक्तीला त्याचे मतदानाचे  राष्ट्रीय कर्तव्य बजावण्यापासून वंचित ठेवणे हे नक्कीच लोकशाहीला धोकादायक आहे. लोकशाहीच्या या उत्सवात निवडणूक आयोगाकडून याप्रकारे कृत्य घडणे ही बाब लोकशाहीसाठी अत्यंत घातक आणि मारक आहे. ज्या शासकीय कर्मचारी तथा शिक्षकांना पोस्टल वोटिंग साठी वंचित राहावं लागलेले आहे त्यांना निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी  यांच्या  मार्फत तातडीने संपर्क साधून पोस्टल मतदान करण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्यात यावी, असे संजय घाडीगावकर यांनी राज्य निवडणूक आयोगाला पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.

आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्व यंत्रणांचा समन्वय आवश्यक-किशन जावळे

अशोक गायकवाड रायगड :रायगड जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता मान्सून काळात येणाऱ्या पाऊस, पूर, वीज तसेच अन्य आपत्तींचे व्यवस्थापन करण्यासाठी सर्व यंत्रणांचा समन्वय आवश्यक आहे. आपत्ती काळात तात्काळ संपर्क करून…

अल्पसंख्यांक याच मातीतील, जीडीपीमध्ये त्यांचा वाटा मोलाचा

अनिल देसाई यांचे मत मुंबई : अल्पसंख्यांक याच मातीतील असून जीडीपीमध्ये त्यांचा वाटा मोलाचा आहे. मात्र अल्पसंख्यांकांना गेली दहा वर्षे सर्व क्षेत्रात डावलले जात असून त्यांचा आहार, पोषाख, चालीरीती यांबाबतही…

तळोजामधील गृहसंकुलाचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार

खारघर : तळोजा घोट कॅम्पमधील अरिहंत अनायिका सोसायटीमध्ये गेल्या पाच वर्षांपासून पाणी समस्या आहे. पाणी समस्यांविषयी सिडको आणि पनवेल महापालिकेकडे पत्रव्यवहार करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्यामुळे सोसायटीमधील मतदारांनी लोकसभा…

ठाणे परिसरात बेकायदा बांधकामांचे पेव

ठाणे : ठाणे पालिका क्षेत्रात अनधिकृत बांधकामांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यात या अनधिकृत बांधकामांवरून पालिका प्रशासनावर होणारी टीका टाळण्यासाठी प्रशासनाकडून या बांधकामांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. असे असताना देखील…

घोडबंदर घाटात रस्त्याचे काम रखडले

ठाणे : मुंबईहून ठाणेमार्गे वसई विरार, गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर मार्गावर नागमोडी घाट रस्ते आहेत. त्यामुळे घाटात अनेकदा वाहने बंद पडणे, तसेच पावसाळ्यात पाणी साचल्यामुळे पडणाऱ्या खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडीत भर…

‘…मग तुझ्या पोराला निवडून का आणला नाही?’

जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवर हल्लाबोल ठाणे : अजित पवार आता सगळ्यांना डोस देत सुटलेत, तुला पाडीन, तुला पाडीन करतायेत, मग तुझ्या पोराला निवडून का आणला नाही? लोकशाहीत एवढा माज कसला…

‘नाराज होऊ नका, मोदींसाठी निवडणुकीचे काम करा’

भाजपचे राष्ट्रीय संघटनमंत्री बी.एल.संतोष यांचा ठाण्यातील पदाधिकाऱ्यांना संदेश ठाणे : ठाण्यातील जागेवरून भाजपमधील काही नेत्यांसह पदाधिकारी नाराज असल्याची चर्चा असतानाच, भाजपचे राष्ट्रीय संघटनमंत्री बी.एल.संतोष यांनी शनिवारी ठाण्यातील प्रमुख नेत्यांसह पदाधिकाऱ्यांची…