Category: होम

पंतप्रधान मोदींचे ठाकरेंवरील वक्तव्य निषेधार्ह – बैरीशेट्टी

अनिल ठाणेकर  ठाणे : शिवसेना  उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दलचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका भाषणात केलेले वक्तव्य हे अतिशय खालच्या पातळीचे असून निषेधार्ह आहे असे मत…

मला जिवंत गाडण्याचा नकली शिवसेनेचा प्लान !

पंतप्रधान मोदींचा ठाकरेंवर पुन्हा हल्लाबोल नंदुरबार : उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांचे नकली पुत्र असल्याची टीका केल्यामुळे महाराष्ट्रात रान उठलेले असतानाच पंतप्रधान मोदींनी नंदुरबार येथे पुन्हा ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका केली. ठाकरेंची ही नकली शिवसेना मला जिवंत गाडण्याची भाषा बोलत आहेत, असं विधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. या देशातील माता भगिनी माझं रक्षण करतील, याची या मंडळींना कल्पना नाही आहे. असे वक्तव्य मोदीं यांनी…

शरद पवार, ठाकरेंना मोदींची खुली ‘ऑफर’

नंदुरबार : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी लोकसभे नंतर काही पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील असे म्हटले होते. हाच धागा पकडत काँग्रेसमध्ये जाऊन मरण्यापेक्षा शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी भाजपाप्रणीत एनडीएत यावे त्यांचे स्वागत होईल अशी खुली…

उत्तर प्रदेशात ‘इंडिया’चे वादळ- राहुल

कन्नौज: उत्तर प्रदेशात भाजपाचा सर्वात मोठा पराभव होणार आहे, कारण उत्तर प्रदेशात इंडिया आघाडीचे वादळ येत आहे, असा दावा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केला आहे. ते उत्तर प्रदेशातील कन्नौजमध्ये आयोजित प्रचार सभेत बोलत होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधाला. ते म्हणाले, ” मोदींनी १० वर्षे अदानी आणि अंबानींचे नाव घेतले नाही, परंतु जेव्हा ते घाबरले तेव्हा त्यांनी त्यांच्या दोन मित्रांची नावे घेतली आणि सांगितले की, या आणि मला वाचवा. इंडिया आघाडीने मला घेरले आहे.” नरेंद्र मोदी यावेळी पंतप्रधान होणार नाहीत, असा दावाही राहुल गांधी यांनी केला. ते पुढे म्हणाले, “१० ते १५ दिवसात तुम्हाला दिसेल की, तुमची दिशाभूल करण्याचे प्रयत्न केले जातील, परंतु विचलित होऊ नका. आमचा मुद्दा भारतीय संविधानाचा आहे. या संविधानाने दलित आणि मागासवर्गीयांना अधिकार दिले आहेत.” नरेंद्र मोदींवर निशाणा साधत राहुल गांधी म्हणाले की, भाजपाने ठरवले आहे की, ते संविधान रद्द करणार आहेत, पण आम्ही हे होऊ देणार नाही. मतदानासह इतर अधिकारही संविधानानेच दिले आहेत. ही महात्मा गांधी आणि बाबासाहेब आंबेडकरांची देणगी आहे. तसेच, नरेंद्र मोदी २२ लोकांसाठी काम करतात, असेही राहुल गांधी म्हणाले. याचबरोबर, नरेंद्र मोदींनी या २२ लोकांचे १६ लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ केले आहे. नरेंद्र मोदींनी तुमचे किती कर्ज माफ केले आहे? असा सवाल करत हे केंद्र सरकार दलित, मागासवर्गीय, शेतकरी, मजूर यांचे नाही, असे राहुल गांधी म्हणाले.

भाजपाविरोधातील निवडणूक जनतेनेच आता हाती घेतलीय- वर्षा गायकवाड

मुंबई : मोदी सरकारने १० वर्षात सामान्य जनतेसाठी काहीही काम केले नाही पण अदानीसाठी काम केले. रेल्वे, विमानतळ, बंदरे, मोक्याच्या जमिनी त्यांना देऊन टाकल्या. वीजेच्या प्रिपेडमिटरसाठी नियम बदलले, धारावी पुनर्वसन प्रकल्पासाठी केवळ अदानींना फायदा व्हावा यासाठी…

केजरीवालांना जामीन

नवी दिल्ली: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांना अखेर आज सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजुर केलाय. लोकसभा निवडणूकीत प्रचार करण्याचा त्यांचा हक्क हिरावून घेता येणार नाहीत या निकषावर अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयानं दिल्लीच्या कथित मद्यधोरण प्रकरणात अंतरिम जामीन मंजूर केला आहे. हा जामीन १ जूनपर्यंत असेल. एन लकोसभा निवडणूकीच्या धामधुमित केजरीवलांना अटक केल्याने आधीच त्यांना सहानुभूती मिळत होती. आता…

मतदान जनजागृतीसाठी हिरानंदानी  परीसरात मतदार जोडो पदयात्रेस नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

ठाणे : ठाणे, लोकशाही बळकटीकरणामध्ये मतदारांचा सक्रिय सहभाग असणे अत्यंत आवश्यक असून प्रत्येक मतदाराने मतदान करावे यासाठी शुक्रवारी ठाणे शहरातील हिरानंदानी इस्टेट परिसरात मतदार जोडो पदयात्राचे आयोजन करण्यात आले होते.…

नैसर्गिक आपत्तीच्या काळात सर्व यंत्रणांमधील समन्वयासाठी

महापालिका, पोलीस, महावितरण यांचा एकत्रित नियंत्रण कक्ष १ जूनपासून कार्यान्वित होणार – आयुक्त सौरभ राव ठाणे,  नैसर्गिक आपत्तीच्या काळात सर्व यंत्रणांमधील समन्वय उत्तम असावा यासाठी महापालिका, पोलीस आणि महावितरण यांचा…

डॉ. नरेंद्र दाभोलकरांचे खुनी अंदुरे, कळसकरला जन्मठेप

पुणे : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र  दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणी सनातन संस्थेशी जवळीक असणाऱ्या सचिन प्रकाशराव अंदूरे आणि शरद भाऊसाहेब कळसकर यांना दोषी ठरवून त्यांना जनमठेप आणि पाच लाख दंडांची शिक्षा न्यायालयाने ठोठावली आहे. तर सनातनचे डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, विक्रम भावे आणि सनातनचे वकील असणाऱ्या  संजीव पुनाळेकर यांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. दरम्यान निर्दोष सुटेलेल्या या तीघांविरोधात उच्च न्यायालयात अपील करणार असल्याचे दाभोळकर यांची कन्या मुक्ता दाभोळक यांनी…

यामिनी जाधव यांचा भायखळा परिसरात रोड शो, कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी आता चौथ्या टप्प्यात प्रचाराचा जोर वाढला आहे. मुंबई, पुणे आणि मराठवाड्यातील काही मतदारसंघामध्ये जोरदार प्रचार सभा सुरू आहे. मुंबईतील दक्षिण मुंबई मतदारसंघातून यामिनी जाधव निवडणूक लढवत…