Category: होम

मतदानासाठी २० मे रोजी भरपगारी सुट्टी – अशोक शिनगारे

ठाणे : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी ठाणे जिल्ह्यात २० मे  रोजी मतदान होणार आहे. प्रत्येक मतदाराला मतदार करता यावे यासाठी लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१ च्या कलम १३५ ब नुसार भरपगारी रजा देय असल्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांनी दिले आहेत. या आदेशात म्हटले आहे की, ठाणे जिल्ह्यात २३ भिवंडी, २४ कल्याण आणि २५ ठाणे लोकसभा मतदार संघ आहेत. या तीनही मतदार संघात पाचव्या टप्प्यात सोमवार २० मे रोजी मतदान होणार आहे. या मतदारसंघांच्या मतदार यादीत समाविष्ट असलेल्या प्रत्येक मतदाराला मतदान करता यावे, यासाठी अशा सर्व मतदारांना लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१ च्या कलम १३५ ब नुसार भरपगारी रजा देय आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी जिल्ह्यातील सर्व आस्थापना प्रमुखांना त्यांच्या अधिपत्याखालील सर्व अधिकारी /कर्मचारी /रोजंदारी कर्मचारी यांना सोमवार दि. २० मे रोजी भरपगारी रजा मंजूर करण्याचे आदेश शर्ती/अटीस अधीन राहून देय आहे. १.  सदर आदेश हा शासकीय आस्थापना/खासगी आस्थापना/रोजंदारीवरील कर्मचारी आस्थापना/दुकाने/कंपनी/अशा सर्व आस्थापनांना लागू आहे. २. ज्या आस्थापनांमध्ये उक्त कामगारांचे अनुपस्थितीमुळे उक्त आस्थापनांना धोका निर्माण होऊ शकतो अथवा मोठ्या प्रमाणात तोटा होऊ शकतो अशा कर्मचाऱ्यांसाठी लागू नाही. ३. सदर आदेशाचे पालन न करणाऱ्या आस्थापना प्रमुख हे उक्त कलमाचे १३५ ब (२) नुसार कारवाईस पात्र राहतील. ४. हा आदेश हा अन्य जिल्ह्यात काम करणाऱ्या परंतु ठाणे जिल्ह्याच्या क्षेत्रातील मतदार यादीत नाव असलेल्या मतदारांच्या आस्थापना प्रमुखांनाही लागू होत आहे, असेही आदेशात म्हटले आहे.

ठाकरे गटाकडून वायकरांना नोटीस

मुंबई : ईडीकडून मनी लाँड्रिंग प्रकरणात माझ्यासहीत कुटुंबियांना अटक होण्याची भीती होती. ती टाळण्यासाठीच मनाविरुद्ध एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला अशी जाहीर कबुल देणाऱ्या रवींद्र वायकर यांना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून नोटीस बजावण्यात…

राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन

दिन विशेष श्याम ठाणेदार आज ११ मे, आजचा दिवस आपल्या देशात राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. भारतात १९९९ सालापासून दरवर्षी तंत्रज्ञान विकास महामंडळ ( टी डी बी )…

निवडणूक निकालानंतर मोबाईल रिचार्ज महागणार

सध्या देशात पार पडत असलेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल चार जून २०२४ रोजी लागणार असून त्यानंतर सामान्य माणसाला फटका बसण्याची शक्यता आहे. निकालानंतर मोबाईलचे रिचार्ज महागण्याची शक्यता आहे. नोव्हेंबर २०२१ नंतर…

जनमताचा आरसा दिसतोय

पैलू सुभाष लांडे देशातील सार्वत्रिक निवडणुकींमुळे वातावरण ढवळून निघत असताना हळूहळू जनमताचा कलही समोर येत आहे. त्यानुसार ‘एनडी’च्या विरोधात ‘इंडिया’ आघाडी सरस असल्याचे स्पष्ट होत आहे. विशेषत: शेतकरी, कामगार, विद्यार्थी…

डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल…

तब्बल १० वर्ष ८ महिने आणि २१ दिवसांनी दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा निकाल लागला असून त्यात दोन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा झाली आहे, तर उर्वरित तीन आरोपी…

ब्रिजभूषणवर महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी आरोप निश्चित

नवी दिल्ली : अखिल भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि भाजपा नेते ब्रिजभूषण शरण सिंहांच्या अडचणीत वाढल्या आहेत. महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी त्यांच्या विरोधात आरोप निश्चित करण्यात आले आहेत. दिल्लीतील राऊज रेवेन्यू…

सदावर्तेंना भारताबाहेरून धमकीचा फोन

मुंबई : आपल्याला भारताबाहेरून राहील नावाच्या व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी दिल्याचं सांगत अॅड. गुणरत्न सदावर्तेंनी भोईवाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. शरद पवार आणि दाऊद इब्राहिम कासकर यांच्याबद्दल माध्यमासमोर वक्तव्य केल्यानंतर हा धमकीचा फोन आल्याचा दावा सदावर्तेंनी केला. राहील नामक व्यक्तीने भारताच्या बाहेरून धमकीचा फोन केल्याची माहिती अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी दिली.  या संदर्भात गृहविभागाने देखील दखल घेऊन दहशतवाद विरोधी पथकाकडे याचा तपास द्यावा अशी मागणी सदावर्तेंनी केला. दरम्यान, अॅड. गुणरत्न सदावर्ते आणि त्यांच्या पत्नी जयश्री पाटील यांना सहकार खात्यानं मोठा दणका दिला असून एसटी को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालकपदावरून दोघांचीही गच्छंती करण्यात आली आहे.

छत्तीसगडमध्ये ६ नक्षलवाद्यांचा खात्मा

गडचिरोली : छत्तीसगढमधील बिजापूर जिल्ह्यातील गंगालूल पोलिस स्टेशनच्या हद्दीतील पीडिया जंगल परिसरात नक्षलवाद्यांशी झालेल्या  चकमकीत आतापर्यंत 6 नक्षलवादी मारले गेले आहेत. नक्षलवाद्यांच्या मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सुरक्षा रक्षकांनी नक्षलवाद्यांच्या टॉप कमांडर लिंगा आणि पापारावला यांना या जंगलात घेरल्याची माहिती आहे. बिजापूर जिल्ह्यातील गंगालूर पोलिस स्टेशन हद्दीतील पीडिया जंगल परिसरात सुरक्षा दल आणि माओवाद्यांमध्ये मोठी चकमक सुरू आहे. पीडिया जंगलात असलेल्या अनेक बड्या नक्षलवाद्यांना जवानांनी घेरल्याची माहिती आहे. दोन्हीकडून अजूनही अधूनमधून चकमक सुरू आहे. घटनास्थळावरून ठार झालेल्या नक्षलवाद्यांचे मृतदेह आणि शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. छत्तीसगडमधील तीन जिल्ह्यांतील जवान हे नक्षलविरोधी अभियानात सहभागी आहे. गांगलूर पोलीस स्टेशन हद्दीतील पीडिया भागातील जंगलात कट्टर नक्षलवादी कमांडर लिंगा, पापाराव आणि इतर मोठे नेते उपस्थित असल्याची माहिती सैनिकांना मिळाली होती. नक्षलवाद्यांच्या या समितीमध्ये डीकेएसझेडसी, डीव्हीसीएम आणि एसीएम कॅडरमधील बडे नक्षलवादीही आहेत. माहितीनंतर शेजारच्या दंतेवाडा, सुकमा आणि विजापूर जिल्ह्यांतील एसटीएफ, डीआरजी, सीआरपीएफ आणि कोब्रा बटालियनच्या 1200 जवानांनी संयुक्त कारवाई केली. जिथे शुक्रवारी सकाळी जंगलात झालेल्या भीषण चकमकीत सहा नक्षलवादी ठार झाले.