Category: होम

पत्रकारांच्या सन्मान सोहळ्यात जेष्ठ पत्रकार एस. रामकृष्णन यांना जीवन गौरव

ठाणे : ठाणे जिह्यातील ग्रामीण भागातून आलेल्या जेष्ठ- श्रेष्ठ पत्रकारांच्या उपस्थितीत ठाणे जिल्हा पत्रकार संघाचा भव्य पत्रकार मेळावा मोठ्या दिमाखदार पद्धतीने संपन्न झाला. या मेळाव्यात ६० वर्षांपासून आजतागायत पत्रकारिता करणारे…

बित्तंबातमीच्या राजकीय संपादक स्वाती घोसाळकर यांना प्रदान

भारत गौरव राष्ट्रप्रेरणा पुरस्कार २०२४ मुंबई : लेक लाडकी अभियान महाराष्ट्र राज्य आयोजित भारत गौरव राष्ट्र प्रेरणा पुरस्कार 2024 वितरण सोहळा मोठ्या जल्लोषात मुंबई मराठी पत्रकार संघाच्या लोकमान्य सभागृहात पार पडला. यावेळी…

रोटरी क्लब ऑफ मुंबई पार्लेश्वर राज्य मानांकन कॅरम स्पर्धा

मुंबई : प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुल, विले पार्ले येथे सुरु असलेल्या रोटरी क्लब ऑफ मुंबई पार्लेश्वर व छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती जुहू यांच्या सहकार्याने आयोजित उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक पुरस्कृत ४ थ्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत पुरुष एकेरीच्या उपउपांत्य सामन्यात मुंबईच्या महम्मद घुफ्रानने पुण्याच्या रहिम खानला तीन सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत २३-६, १९-२३ व २५-१३ असे हरवून उपांत्य फेरीत प्रवेश केला. तर मुंबईच्या पंकज पवारने पुण्याच्या अभिजित त्रिपनकरवर तीन सेटमध्ये ४-२५, १४-१३, १६-१३ असा निसटता विजय मिळवून उपांत्य फेरी गाठली. पुरुष एकेरी उप उपांत्य फेरीचे इतर निकाल पुढीलप्रमाणे. संदीप दिवे ( मुंबई उपनगर ) वि वि अशोक गौर ( मुंबई ) २५-५, २१-७ प्रशांत मोरे ( मुंबई ) वि वि झैद अहमद फारुकी ( ठाणे ) २१-५, २१-१५ महिला एकेरी उप उपांत्य फेरीचे निकाल प्राजक्ता नारायणकर ( मुंबईत उपनगर ) वि वि उर्मिला शेंडगे ( मुंबई ) ५-१६, २५-६, २५-५ समृद्धी घाडीगावकर ( ठाणे ) वि वि मेधा मठकरी ( पुणे ) २५-०, २५-० श्रुती सोनावणे ( पालघर ) वि वि अंबिका हरिथ ( मुंबई ) १५-१०, २५-२२ काजल कुमारी ( मुंबई ) वि वि आकांक्षा कदम ( रत्नागिरी ) २५-१२, २४-१३

अमरावती किंवा उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ आम्हाला द्या-  आनंदराव अडसूळ

मुंबई : अमरावती किंवा उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ आम्ही लढणारच आणि त्यासाठी आम्ही सह्यांची मोहीम राबवणार असून त्या सह्यांची निवेदन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना देणार आणि आपली ताकद दाखवणार असे जाहीर प्रतिपादन शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी दादर येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीमध्ये केले. ते पुढे म्हणाले विद्यमान खासदार नवनीत राणा यांची जात प्रमाणपत्र अगदी भोगत असून हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे यावर लवकरच जजमेंट येऊन त्यांना पुन्हा निवडणुकीला उभे राहता येणार नाही. अमरावती लोकसभा मतदारसंघांमध्ये केलेल्या सर्वेनुसार तेथील जनता नवनीत राणा यांचे ढोंग माजीला कंटाळली असून त्यांना पुन्हा खासदार करणार नाही तसेच त्यांचे हे ढोंग लवकरच बंद होईल. परंतु शिवसेना भाजप युतीने   त्यांना पुन्हा एकदा संधी दिल्यामुळे अमरावती लोकसभा मतदारसंघातील जनतेमध्ये प्रचंड नाराज आहे. राणा यांचा प्रभावाकडून अमरावती लोकसभा मतदारसंघातील जनता त्यांचा सूड घेतल्याशिवाय राहणार नाही. उत्तर पश्चिम मतदारसंघांमध्ये आमची ताकद फार मोठ्या प्रमाणात असून आमच्या युनियनचे अनेक सभासद आणि कार्यकर्ते त्या ठिकाणी जोमाने कामाला लागले आहेत. तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही जागा आम्हाला सोडावी ती जागा आम्ही नक्कीच जिंकून दाखवू अशी माहिती त्यांनी या ठिकाणी दिली. या बैठकीमध्ये को-ऑपरेटिव बँक एम्प्लॉइज  युनियनचे सुनिल साळवी, प्रमोद पारटे, जनार्दन मोरे असंख्य र्कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाराष्ट्राचे दोन्ही संघ बाद फेरीत

५६ वी राष्ट्रीय पुरुष-महिला अजिंक्यपद खो-खो स्पर्धा दिल्ली : येथे सुरु असलेल्या 56 व्या पुरुष-महिला राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत महिला गटात तिसऱ्या सामन्यात महाराष्ट्राने इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस (आयटीबीपी) संघाचा पराभव करत वर्चस्व राखले. हि स्पर्धा करमाळी सिंग क्रीडांगण, बसंत लेन, रेल्वे काॅलनी, पहारगंज येथे १ एप्रिलपर्यंत रंगणार आहे. सकाळच्या सत्रात रंगलेल्या अ गटातील महिला सामन्यात आयटीबीपी  संघावर (54-10)  एक डाव 44  गुणांनी एकतर्फी धुव्वा उडवत विजय मिळवला. महाराष्ट्रा कडून अश्विनी शिंदे (3.10 मि. संरक्षण व 2 गुण), प्रियांका इंगळे (3.50 मि. संरक्षण व 10 गुण), काजल भोर (2.50 मि. संरक्षण व 4 गुण), पूजा फरगडे (12 गुण ),  अपेक्षा सुतार (२.४० मि. संरक्षण) यांनी चांगला खेळ केला. आयटीबीपी कडून  पुनमने (१ मि. संरक्षण) चांगला खेळ केला. महिला गटात महाराष्ट्राने उत्तर प्रदेशचा 26-14 असा एक डाव 12 गुणांनी पराभव केला. महाराष्ट्रा तर्फे काजल भोर  (3.20 मि.  संरक्षण व 4 गुण ),  प्रियंका इंगळे  (1.30, 2.10 मि.  संरक्षण  व 8 गुण ), सानिका चाफे 3.10 मि. संरक्षण ) यांनी चांगला खेळ करताना धमाकेदार विजय साजरा केला. तर उत्तर प्रदेश संघातर्फे  खुशबू  (1.10 मि. संरक्षण ), शिवानी (6 गुण ) यांनी चांगला खेळ केला. हे दोन्ही सामने जिंकून महाराष्ट्र संघ गटात अव्वल राहीला आहे. पुरुष गटात महाराष्ट्राने तामिळनाडूचा 28-10 असा दहा गुणांनी पराभव केला. महाराष्ट्रा कडून प्रतीक वायकर  (2.10 मि. संरक्षण ), अक्षय मासाळ (2 मि. संरक्षण ), लक्ष्मण गवस (नाबाद 1.30 मि. संरक्षण व 8 गुण ) यांनी उत्कृष्ट खेळ केला. तामिळनाडू कडून गिरी (1,  1 मि. संरक्षण व 4 गुण ), सुब्रमणी  (4 गुण) यांनाच  चांगला खेळ करता आला.

महापारेषणच्या बिघाडामुळे बदलापूर, अंबरनाथ परिसरात वीजपुरवठा बाधित

कल्याण : महापारेषणच्या पडघा ते अंबरनाथ दरम्यानच्या १०० केव्ही वाहिनीमध्ये बिघाड झाल्याने बदलापूर, अंबरनाथ आणि उल्हासनगर चारच्या काही भागांमधील महावितरणच्या ग्राहकांचा वीजपुरवठा बाधित झाला. रविवारी सकाळी सातच्या सुमारास झालेला बिघाड महापारेषणकडून दुरूस्त होईपर्यंत संबंधित भागात भार व्यवस्थापन करून वीजपुरवठा करण्यात आला. महापारेषणच्या पडघा उपकेंद्रातून अंबरनाथकडे येणाऱ्या १०० केव्ही उच्चदाब वाहिनीत रविवारी सकाळी बिघाड झाला. परिणामी या वाहिनीवरून वीजुपरवठा होणाऱ्या महावितरणच्या बदलापूर पूर्व आणि पश्चिम, अंबरनाथ पूर्व आणि पश्चिम तसेच उल्हासनगर चार उपविभागातील कांही भागांचा वीजपुरवठा बाधित झाला. महापारेषणकडून बिघाड शोधण्यासाठी युद्धपातळीवर काम सूरू होते. मात्र सायंकाळी पाच वाजेपर्यंत बिघाड दुरूस्त होऊ शकला नव्हता. त्यामुळे पडघा ते मोहने या उच्चदाब वाहीनीद्वारे उपलब्ध स्त्रोताच्या आधारे भार व्यवस्थापन करून बदलापूर, अंबरनाथ व उल्हासनगर चार उपविभागात चक्राकार पद्धतीने वीजपुरवठा सुरू होता. दरम्यान सायंकाळी साडेचारच्या दरम्यान मुख्य बिघाड निदर्शनास आला असून महापारेषणकडून सायंकाळी साडेपाचपर्यंत दुरुस्तीचे काम पूर्ण होऊन वीजपुरवठा पूर्ववत होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान गुरुवारी (२९ मार्च) रात्रीही महापारेषणच्या पडघा उपकेंद्रातील सीटीमध्ये बिघाड झाल्याने बदलापूर आणि परिसरातील महाविरतणच्या ग्राहकांचा वीजपुरवठा बाधित झाला होता.

योगेश सोनावने, सिद्धि शिर्के यांनी सुवर्णपदक

१९वी राष्ट्रीय माऊंटन बाईक सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धा मनाली रत्नोजी, ऋतिका गायकवाड यांना रौप्यपदक हरयाणा : पंचकुला, हरयाणा येथे सुरु झालेल्या १९व्या राष्ट्रीय माऊंटन बाईक सायकलिंग स्पर्धेत गत स्पर्धेत सर्वसाधारण विजेतेपद पटकावणा-या महाराष्ट्राच्या सायकलपट्टूंनी या स्पर्धेच्या पहिल्या दिवशी दोन सुवर्ण आणि दोन रौप्यपदक पटकावताना पहिला दिवस गाजवला. पहिल्या दिवशी सर्व वयोगटातील एक्ससीटी (क्रॉस कंट्री टाईम ट्रायल) प्रकारामधील स्पर्धा संपन्न झाल्या. सब ज्युनिअर बॉईज या वयोगटात नाशिकच्या योगेश सोनावने याने ५१ मि. ४१.२४५से अशी विक्रमी वेळ देत या स्पर्धेतील महाराष्ट्राचा दबदबा कायम राखला. तब्बल पाच मिनीटे उशिराने स्पर्धा संपवनारा पश्चिम बंगालचा सत्यदिप सुनामने ५६ मि ५३.२५१ से. वेळ देत रौप्यपदक तर हिमाचल प्रदेशच्या युगल ठाकुरने ५७ मि. ३१.११४ से वेळेसह कांस्यपदक मिळवले. वुमेन ज्युनिअर वयोगटात महाराष्ट्राच्या मुलींनी निर्विवाद वर्चस्व राखले. चिंचवडच्या प्रतिभा ज्युनिअर कॉलेजची आंतरराट्रीय सायकलपट्टू सिद्धी शिर्के हिने या वयोगटात ४९ मि १३.४६४ से वेळ नोंदवताना सुवर्णपदकाला गवसनी घातली तर महाराष्ट्राचीच पुण्याची आंतरराष्ट्रीय सायकलपट्टू मनाली रत्नोजी हिने ५० मि. ०६.१८९ से. वेळ नोंदवत रौप्यपदकावर आपले नांव कोरले. कर्नाटकची करेन मार्शलने ५९ मि. ३०.४९४ से. नोंदवताना या गटातील कांस्यपदक मिळवले. नाशिकचीच  आंतरराष्ट्रीय सायकलपट्टू ऋतिका गायकवाड हिने वुमेन ईलीट वयोगटात १ ता. ११ मि. ४७.३६३ से. वेळ देताना रौप्यपदक मिळवले, या वयोगटात कर्नाटकच्या स्टार नारझरी हिने १ ता. १० मि २९.९९३ से वेळ देत सुवर्णपदक पटकावले तर मध्य प्रदेशच्या संध्या मोर्य हिने १ ता १४ मि ४५.६८९ से वेळ देत कांस्य पदक मिळवले.

उल्हासनगरमध्ये तंत्रज्ञान आणि सुविधांनी परिपूर्ण गोशाळा

उल्हासनगर : उल्हासनगर येथील स्वामी शांतीप्रकाश आश्रमात गोशाळा हे भाविकांसाठी अनेक वर्षांपासून श्रद्धेची ठिकाण असून आता ही गोशाळा तंत्रज्ञान आणि सुविधांनी परिपूर्ण बनविली जात आहे. अशा प्रकारच्या सुविधा देणारी ही ठाणे जिल्ह्यातील एक वैशिष्ट्यपूर्ण गोशाळा असल्याची माहिती स्वामी देवप्रकाश महाराज यांनी दिली. स्वामी शांतीप्रकाश आश्रमातील राधेश्याम गोशाळेत स्वामी देवप्रकाश महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली उल्हासनगर- 5 येथील स्वामी शांतीप्रकाश मंदिरात बांधलेल्या गोशाळेत अनेक वर्षांपासून 1700 गायींची सेवा केली जात असून गायी सोबतच कबुतर, पक्षी देखील आहेत. तेथे सेवा दिली जाते. सामान्य दिवशी कोणीही व्यक्ती पवित्र वातावरणात असलेल्या गोठ्यात जाऊन गाईंना गवत, केळी इत्यादी खायला घालू शकते. तेथे गवत, केळी, भाज्या इत्यादींची विशेष स्वच्छता केली जाते आणि विशेष पौष्टिक आहारही दिला जातो. गाई नेहमीच्या नित्यक्रमानुसार, गायींसाठी येथे आयोडीन पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून दिले जाते. गेल्या काही दिवसांपासून ही गोशाळा अत्याधुनिक पद्धतीने बनविली जात असून गाईच्या सेवेसाठी लागणारे गवत किंवा खाद्यपदार्थ सहज पोहोचवण्यासाठी ट्रॉली उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.गोरक्षण आणि उपचारासाठी दोन डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे. या उपक्रमावर लक्ष ठेवण्यासाठी 23 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.

दोन तारखेपर्यंत भाजपविरोधात  मजबूत आघाडी उभी करणार !

ॲड. प्रकाश आंबेडकर यांची पत्रकार परिषदेत माहिती मुंबई : या लोकसभेमध्ये आमचा प्रयत्न होता की, भाजपच्या विरोधात मजबूत आघाडी व्हावी. पण दुर्दैवाने आम्हाला जशी आघाडी पाहिजे तशी होत नाही. विविध…